Skip to main content

विनोद

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

प्रेमाची चाणक्यनीती (अर्थात मुली पटवायचे डावपेच)

लेखक चाणक्य यांनी शनिवार, 27/04/2013 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक राजा चाणक्यनीती प्रेमात येते कशी उपयोगी प्रेम जरी ह्रुदयाचा खेळ खेळता डोक्याने यश निर्भेळ चाणक्य सांगतो काही युक्त्या येती फळा जर भावना सच्च्या सर्वात आधी हे जाण तू प्रेमास तुझिया प्रमाण तू दुसरा करीतो म्हणोनी केले प्रेमवीर असे पराभूत झाले जी तुला बहू आवडे प्रेमाचे तिला असे वावडे काय करशील अश्या प्रसंगी? ऐक सांगतो युक्ति जंगी विषय हलके टाळ तू बुद्धिचातुर्य दाव तू स्वप्निल गोष्टीस नकोच थारा जुळतात कुठे त्या शोध तारा असेल काय जे प्रिय तिला त्यात असावी गति तुला काम जरासे वेळ घेते जुळता तारा गति येते स्वप्नील पाखरू जर असेल ते कविता करायचे शिकून घे कार्य समजू नको सोपे स्वप्ने आवरणे काम मोठे ये
काव्यरस

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 15/04/2013 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
शिष्य़ः प्रणाम गुरुजी गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत. गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात. शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात? गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू ..... शिष्य़ः गुरूजी. गुरूः आठवलं, ऐक.

माय ईंग्लिश वॉल्कींग..!

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 12/04/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात.. पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते.. माझे आईवडील अश्यांपैकीच एक.. काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला...

तारे तोडण्याची स्पर्धा

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 09/04/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका सत्तेतल्या प्रसिध्द नेत्याने दुष्काळाविषयी अश्लाघ्य विधाने करुन तारे तोडले नंतर लाईट जाण्याविषयीही तारे तोडले , मग त्याला उत्तर म्हणुन दुसर्‍या नेत्याने तारे तोडले . एकुणच राजकीय लोकांची ही तारे तोडण्याची स्पर्धा फार जुनी आहे असे नुकतेच एकाने कळवले ...." ब्रेड्बटर परवडत नाही तर केक खावा " असे कोणतरी फ्रान्सची राणी भुकेल्या गरीब जनतेला म्हणाली होती म्हणे . असो तर तारे तोडण्याच्या स्पर्धेतील स्पर्धकांच्या वाक्यांचे हे कलेक्षन ! तळटीप : १) ज्येष्ट नेत्यांनी वापरलेल्या अश्लाघ्य शब्दांचा वापर टाळावा २) दिग्गीराजांची विधाने येथे देवु नयेत ...स्पर्धा २ नंबर साठी चालु आहे. ३) जे वा

नायक क्रमांक एक

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 02/04/2013 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया. निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा. शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा! निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते? शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते.

अंड्याचे फंडे ४ - फेक आनंद

लेखक साळसकर यांनी रविवार, 31/03/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणखान आटोपून अंड्या दुकानात परतला अन पाहतो तर आपला गण्या लॅपटॉप उघडून त्यावर लागला होता. फेसबूकच दिसेल या अपेक्षेने नजर टाकली तर त्याचे "मीच तुझी रे चारोळी" नावाची मराठी वेबसाइट उघडून त्यातील कवितांचे रसग्रहण चालू होते. "तुला रं गण्या कधीपासून हा छंद?" या प्रश्नावर माझ्याकडे न पाहताच मंद स्मित देऊन तो आपल्याच कामात व्यस्त. दहा पंधरा मिनिटांनी त्यानेच मला आवाज दिला, "अंड्या, ही कशी वाटते बघ.. ऐक हं.. ऐन दुपारी.. नदी किनारी.. फेसाळलेल्या.. लाटांना पाहूनी.. तुझ्याच आठवणीत.. माझ्याच मनाने.. घेतली भरारी.. वगैरे वगैरे.. वगैरे वगैरे.. "चांगली भरारी आहे राव, भिडली अगदी मनाला.

सहाशेपन्नास रुपये, पिडा - चोर अन शीलाकी बुद्धिमानी

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 29/03/2013 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
आलेल्या नवीन वर्षापासून माझे ग्रह तरी १८० अंशात फिरले असावेत किंवा तारे तरी ! कारण भर दिवसा डोळ्यासमोर तारे चमकण्याचे प्रसंग नवीन वर्षात वरचेवर यायला लागलेत हो ! एक निस्तरते तोवर दुसरंच काही तरी समोर उभं ठाकलंय, असंच सारखं होऊ लागलंय. काय विचारू नका ससेहोलपट, …पायाखाली फटाक्यांची माळ लावावी तसं. अगदी खुळ्याची चावडी अन मीराबाईची मशीद अशी गत झालीये बघा ! आता तुम्ही म्हणाल असं काय बॉ आभाळ कोसळलंय तुमच्यावर ? अहो, आभाळ कोसळलं तर पाण्यात तरी उडी मारता येते. इथे आम्ही ना तळ्यात ना मळ्यात अशी बिकट अवस्था झालीय. सुरुवात झाली ती नवीन वर्षाच्या प्रथम चरणात, म्हणजे पहिल्याच सप्ताहात.

अंड्याचे फंडे २ - फर्स्ट क्लास

लेखक साळसकर यांनी शुक्रवार, 29/03/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
"अंड्याचे फंडे - २" कडे वळायच्या आधी "अंड्याचे फंडे -१" खाली दिलेल्या लिंकवर जाऊन क्लीअर करू शकता. अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या - http://misalpav.com/node/24341 घाईत असाल तर तसे नाही केले तरी चालेल, कारण दोन्ही लेखांचा आपसात काडीचाही संबंध नाही. ती लिंक देण्याचे प्रयोजन वाचकांची सोय नसून स्वताच्या लेखाची जाहिरात हे आहे. .................................................................................................................................................... आपली मुंबई लोकल आणि भरगर्दीची वेळ.