Skip to main content

विनोद

चलती का नाम कोरोला...

लेखक जुईचे फूल यांनी शुक्रवार, 01/11/2013 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, "नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय." तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. "आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं! कधी घ्यायची गाडी?" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला.

मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही

लेखक निरु यांनी गुरुवार, 31/10/2013 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
मला मकर संक्रांत हा सण आवडत नाही. आता हे वाचून तुम्हाला वाटलं असेल, आला... आणखी एक पर्यावरणवादी आला. आता हा पतंग, मांजा, त्या पतंगांसाठी होणारी वृक्षतोड आणि पतंगांचा कचरा यावर छान लांबलचक भाषण देणार आणि महा बोर करणार.... नाही!!! काळजी करू नका. माझा तसला कसलाही उद्देश नाही. माझा विरोध त्या पतंगांना किंवा त्या वृक्षतोडीला किंवा खरं सांगायचं तर मकर संक्रांतीच्या निमित्ताने होणाऱ्या अपेयपानाच्या (दारू पिणे याला सभ्य मराठी भाषेत 'अपेयपान' म्हणतात) पार्ट्यांनाही माझा विरोध नाही.

हे राम...!!

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 05/10/2013 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
पाच वाजत आलेले अन हापिसातल्या निम्म्या अर्ध्या स्टाफला बाहेरचे वेध लागलेले. अशा कातरवेळी काळेनाना क्लार्क केबिनमध्ये घुसले अन घुटमळत उभे राहिले. ‘का हो, नाना ?’ मी ऑफिसचा चार्ज घेऊन जेमतेम एक महिना झालेला. तेवढ्यात नानांच्या भिडस्त स्वभावाचा मला बराचसा अंदाज आलेला. ‘मॅडम..डिविजन वरून फोन आला होता...’ ‘हं, काय ?’ ‘ते..उद्या गांधी जयंती ना ?’ ‘हो. मग ?’ ‘नाही, म्हणतात सकाळी सातला ऑफिसात झेंडावंदन करा..’ ‘गांधीजयंतीला झेंडावंदन ? आणि सकाळी सातला ?’ बापरे, सकाळी उठलं कि पळत सुटावं लागणार ! शिवाय सकाळच्या प्राणायामाला फाटा द्यावा लागणार, ते वेगळंच... मी मनात विचार केला. नाना गंभीर.

मित्रास पत्र (सन 2045- एक झलक)

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 04/10/2013 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब. र. ता. दिनांक : 8 जानेवारी 2045 प्रिय मित्रा , आज 8 जानेवारी 2045. बघता बघता ८० वय झाले . जुलै २०१३ साली तारेची अखेर झाली आणि २०२३ साली पोस्ट ऑफिस चे ब्यान्केत रुपांतर झाले . पत्र पाठवणे वगैरे कालबाह्य झाले म्हणून सरकारने पोस्त ऑफिसच बंद करायचा निर्णय घेतला .

जिम कॉर्बेट उद्यानात आमचा फेरफटका

लेखक सस्नेह यांनी बुधवार, 18/09/2013 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
कालपासून वर्गावर नवीन सर आले. मराठी विषयाला. आता सातवीचं मराठी म्हणजे काय जादा अवघड नाय. पण त्यांनी एकदम डायरेक्ट निबंधच लिहायला सांगितल्यावर माझी नाही म्हटलं तरी जरा फाटलीच. निबंध म्हणजे माझा वीक प्वाइंट ! सरांनी विषय दिला, ‘शालीमार बागेतील फेरफटका ‘. शालीमार बाग ? गावातल्या सगळ्या बागा आमच्या पायांना सू-परिचित. त्यातल्या एकाच बागेला नाव आहे. दे.भ. सोमूअण्णा नगरकर बाग.

नवे सदस्य , साहीत्य आणि प्रतिसाद

लेखक खटासि खट यांनी गुरुवार, 05/09/2013 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
( जी नावं या लेखात आली आहेत ती अत्यंत आदरणिय आहेत. या सर्वांबद्दल अतीव आदर आहे. एक विनोदी कल्पना म्हणून या सर्वांची माफी मागून हे धाडस करू पाहत आहे ). मराठी साहीत्य नेटवर लिहीता यायला लागल्यापासून फटाफट साहीत्य आणि खटाखट प्रतिक्रिया यांचा जालावर इतका सुकाळ जाहला कि मुद्रीत साहीत्य वाचण्यास अनुक्रमे फटाफट आणि खटाखट यांच्यापाशी समय शिल्लक न राहीला. फटाफट खटाखट इतके छान चालले कि लेखक कम प्रकाशक आणि प्रतिसादक कम टीकाकार कम साहीत्यिक हे कुठल्याही दडपणाविना मोकळे होऊ लागले.

भारतीय सणांमागचे (खरे) शास्त्र !!

लेखक ब़जरबट्टू यांनी रविवार, 01/09/2013 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच एक लेख डोळ्याखालुन गेला, भारतीय सण हे शेतक-यांसाठी नाही...आमचेपण हेच मत आहे,. पण मग हे सण नेमके कुणासाठी असावे, या प्रश्नाचे उत्तर शोधून काढल्याशिवाय आम्हाला चैन पडेना, . अखेर सगळे पट मांडुन ह्या प्रश्नाचे उत्तर आम्ही शोधून काढले आहे. आमच्या घोटुन घोटून, खोदून खोदुन (निट वाचा, पा नाहीये) केलेल्या या अभ्यासावरुन आम्ही जाहीर करतोय की सण हे " आय टी" मधील लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच योजिले आहेत… नको नको, एव्हड्यात आम्हाला दंडवत घालू नका व आमचा उदो उदो पण करु नका, आम्ही अतिशय संशोधन करूनच हे भाष्य केलेय बरं का… विचार न करता कोकलायला आम्ही काय दिग्गी आहोत का ?

" अचानक"

लेखक कैलास गायकवाड यांनी शुक्रवार, 30/08/2013 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं... आणि अचानक लाईट गेले . असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं. अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली. आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं ) उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? ) --- पायात चप्पल घातली .

गंप्या आणि अजान

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 11/08/2013 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
गंप्या भल्या पहाटे पक्षी निरीक्षणास निघाला ,तो जेव्हा गावाबाहेर पडला तेव्हा त्याला एका झोपडी बाहेरील कोंबड्याच्या दडब्यातून काही आवाज आला ,त्याने तेथे थांबून ऐकण्यास सुरुवात केली,तेथे एक कोंबडी ,कोंबड्यास म्हणत होती ,अहो लवकर उठा ,तुम्हाला आरवायचे नाही का ?तुमच्या शिवाय लोक उठतील कसे?त्यावर कोंबडा आळसावत म्हणाला अग आता माझे काम मशीद वाले कर्णे लावून अजान देवून करतात ,मला मस्त झोपू दे ,गंप्या हसत ह्सत पुढे निघाला थोड्याच वेळात गंप्या जंगलात पोचला ,नुकताच सूर्योदय झाला होता,गंप्या एका झाडा खाली बसून आपल्या दुर्बिणीने पक्षी निरीक्षण करू लागला एवढ्यात त्याच्या कानावर एका पोपटीणीचा आवाज आला ,अहो जर