मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...
चिखलात प्राणी लोळतात, आंघोळ करतात, आणि अंगाला चिखल लावुन घेतात. मला आंघोळ आवडत नाही. प्राण्यांच्या अंगाला लागलेल्या चिखलामुळे उन्हापासुन संरक्षण होते असे मास्तर म्हणतात. संरक्षणवरुन आठवलं, प्रिडेटर पिक्चर मध्ये अर्नोल्ड शिवाजीनगर ने स्वत:ला चिखल लावून घेतला म्हणून तो प्रिडेटर त्याला पाहू नाही शकला. पण लोकांनी अर्नोल्ड शिवाजीनगरला लक्षात ठेवला आणि चिखलाला विसरले. मग चिखल उतरल्यावर अर्नोल्ड शिवाजीनगरची धुलाई झाली. असो चिखलामुळे असे रक्षण होते. पण तोच चिखल आपल्या अंगाला लागला की आईचा मार मिळतो. आईपासुन रक्षण बाबापण नाय करु शकत. आणि बाबांचे आईपासुन रक्षण देव पण नाइ करु शकत. म्हणुन मला देवपण नाय आवडत. पण मी मंदिरात जातो, तिथे प्रसाद मिळतो आणि घंटा पण वाजवायला मिळते. घंटेचा आवाज मस्त येतो. पण कानाखाली आवाज आला की कान लाल होतो. लाल रंग मला आवडतो. मला रंग खेळायलाही आवडतं. मला होळीही आवडते. होळीत चिखलात माखायला आवडतं. पण मग डाग पडतात कपड्यांवर. आईला टाइड आवडते, सर्फ एक्सेल आवडत नाही आणि म्हणुन मला गर्लफ्रेंड नाही. आईला कोणीतरी सांगा रे की दाग अच्छे होते हैं
वाचने
2595
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय म्हणतात ते
खिक !
In reply to काय म्हणतात ते by स्पंदना
डोळे पाणावले ती उपमा पाहून.
In reply to काय म्हणतात ते by स्पंदना
विनोद कुठशिक आहे , हे लिहिलं
आपलं सदस्यनाव सार्थ केलंत
आईपासुन रक्षण बाबापण नाय करु
:D
@आईला टाइड आवडते, सर्फ
खाली यत्ता ल्ह्यायची र्हायली
हे प्रतिसाद पाहून मला अतीव दु