Skip to main content

विडंबन

हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 07/08/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी कधीतरी मज भात मसालेही समजावा घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा युगे बदलली काळ बदलला किती बघा हा पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा करू कशाला घरी परतल्यावर मी कामे पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा अता तरी संपावी इतिहासाची चर्चा धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा अजून किती मी

(चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 07/08/2010 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मिपावरच्या पौगंडी विचारसरणीच्या लेखनाची परखड टीका केशवसुमार यांनी एक समर्थ विडंबन लिहून केली. ती वाचून शब्दांच्या गुणसूत्रांचाच दोष वगैरे कारणं देण्यापेक्षा तसल्या लेखकांनी आत्मपरिक्षण करावं असं आम्हाला वाटलं. (ते लोकांनी करण्याआधी आपणच केलेलं बरं, नाही का? कारण काही काही वेळा सिगार हा फक्त सिगार असतो) त्यातून या स्वडंबक कवितेचा जन्म झाला. प्रेरणा अर्थातच अभ्यंकरांची उत्तम कविता.
काव्यरस

(हा रात्रीच्या जागरणाचा दोष असावा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 06/08/2010 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्धची 'हा शब्दांच्या गुणसूत्रांचा दोष असावा' ही गजल वाचतात आमच्या विडंबनाच्या गुणसूत्रांच्या दोषाने लगेच डोके वर काढले नसते तरच नवल, ईर्षाद!
काव्यरस

(बघ त्याची आठवण येते का?)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 05/08/2010 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
चिरमुरे अन खोबरं ट्रॉलीत उभारून खा बघ त्याची आठवण येते का? हात लांबव , फळीखालून काढ उरलेली वर्गणी, इवलासा पेग पिऊन टाक. बघ त्याची आठवण येते का? वार्‍यावर झुलणारे धुराचे ढग नाकात घे, धूर पी , तल्लीन हो. नाहीच आवडलं काही तर खाली उतर , राऊंडात ये, ते चेकाळलेले असतीलच , पायात पाय तुडवत नाचत रहा. मोरया ओरडेल कोणीतरी , बघ त्याची आठवण येते का? मग चालू लाग , उरलेल्या नोटा मोजून घे, पीत रहा नोटा संपेपर्यंत , त्या संपणार नाहीतच , शेवटी परत ये , वाटेत घसरु नकोस, ट्रॉली विसरु नकोस , पुन्हा त्याच ट्रॉलीत ये. आता वरचा बोर्ड बघ , बघ त्याची आठवण येते का? कानाखाली वाजेल , तोल सावर , पोलीस असेल, ओशाळून कान

चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही !

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 05/08/2010 05:17 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा गेले १-२ दिवसातले सैपाकाचे धागे आणि संदिप खरे यांची अप्रतिम कविता चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही ! जरा चुकीचे, जरा बरोबर खर्डू काही ! चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! नव्या-नव्यां ह्या किती आयडी बघ धाग्यातुन - आजच आहे आला म्हणतो खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! हवेहवेसे 'शतक' तुला जर हवेच आहे नकोनकोते हलके चावट खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! उगाच वळसे प्रतिसादांचे देत रहा तू उडले नाहीत धागे तोवर खर्डू काही चला दोस्तहो सैपाकावर खर्डू काही ! तुफान पाहुन धाग

धागा धागा अखंड दळूया

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 04/08/2010 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले..
काव्यरस

पराक्रमी असा मी : हझल

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 03/08/2010 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
पराक्रमी असा मी : हझल माझ्या मनात नाही, कसलाच भेद येतो पोटात भूक त्याच्या, जेवून मीच घेतो ना लोभ,मोह,माया, नाहीच लालसाही उष्टे,जुने-पुराने वाटून दान देतो त्याच्या खुजेपणावर, त्यानेच मात केली टुणकण उडून गजरा, वेणीत खोचते तो आधार लेखनीला खंबीर मेज आहे सोडून मेज केवळ खुर्चीस का लढे तो? प्रेमात सावलीच्या सुर्यास पारखा मी अंधार ही अताशा संगे मलाच नेतो उद्रेक धूर्ततेचा आता अपार झाला, तो लावतो शिडी अन, उंटीण चुंबते तो ना साम्यवाद रुजला, नाही समाजवादी तो धन्यवाद केवळ पंजास आवडे तो ते गाडगिळ असो वा, अथवा टिळक, मुटे ते नावात एक धागा का अभय आढळे तो?
काव्यरस

माझ्या 'गोव्या'च्या पुडीत

लेखक अडगळ यांनी मंगळवार, 03/08/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
(कै . कवी बोरकर आणि त्यांचे वाचक , मागितली तरी क्षमा करणार नाहीतच , म्हणुन मग क्षमा न मागताच लिहीतो.) माझ्या 'गोव्या'च्या पुडीत, गड्या, तुतारी वाजते, नसानसातून जणू , ब्रम्ह फुगडी खेळते. माझ्या संभाजी बिडीत, झाले केवड्याचे श्वास, फुले मेंदूत मोगरा, दिवेलागणीचे भास, माझ्या मनाच्या मातीत, फुले तंबाखूचे मळे, झाले आभाळ चुन्याचे, दाढेआड चंद्र खेळे. माझ्या रस्श्याच्या वाटीत, मटणाचा महामेरू, पोटा लागली तडस, चला फुलचंद मारु. माझ्या जगत्या कुडीत, आले माहेराला सारे, घ्यावा जीवाचा जोगवा, सारी उघडली दारे.
काव्यरस

जाये तो जाये कहां

लेखक संतोषएकांडे यांनी रविवार, 01/08/2010 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो. पूर्वी दहा बारा वेळा गेलोय, तरी दिल्ली तशी माझ्या साठी नविनच. तिथे असलेल्या गुजराथ भुवन किंवा महाराष्ट्र भुवनच्या स्वस्त आणी मस्त अ‍ॅकोमोडेशनल फॅसीलीटीज मी आधीच यूज केल्या असल्यामूळे अ‍ॅकोमोडेशनची काळजी नव्हती.सकाळी साडेदहाच्या सुमारास स्टेशनावरुन मी सरळ गुजराथ भुवनला पोहोचलो. नव्या नियमा प्रमाणे माझ्या सरकारी आईकार्डाची झॅरोक्स घेवून मी काउंटरवर लाइनीत उभा राहीलो. अर्ध्या तासानी नंबर आला.रीसेप्शनीस्टनी रजीस्टर माझ्यापूढे केले.