Skip to main content

विडंबन

मीपावरती मी पितरांचा कौल काढला नवा

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 28/09/2010 11:41 या दिवशी प्रकाशित केले.

काल रात्री घासूगुर्जीचा स्वप्नांचा कौल  आणि आमच्या कशे कावळे येती आणिक...या विडंबनाला शुचितैनि दिलेला प्रतिसाद वाचून झोपलो, पण नेहमी सारखी गाढ झोप काही येईना, मध्यरात्री

कशे कावळे येती आणिक...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 27/09/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो.. कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती साप काल मज स्वप्नी दिसला फणा काढुनी उभा राहिला जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती सकाळ होता मिपा उघडले मुखपृष्ठावर काक पाहिले कळली नंतर जलावरती मज पितरांची महती लगे एक मी भटजी धरला शीधा दक्षीणे त्याला पुजला उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती अनुभव तुमचा सांगा मजला ह्यासाठी मी धागा रचीला फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती

हिंदूर

लेखक सन्जोप राव यांनी रविवार, 26/09/2010 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसेंची अप्रतिम सिंदूर आणि आसपासच्या समाजात साचत चाललेली समृद्ध अडगळ यांची मनात गल्लत झाल्याने उमटलेले हे काही वेडेवाकुडे नि:शब्द होत गेलो, मजबूर होत गेलो हिंदू वाचुवाचूनी हिंदूर होत गेलो ठिणग्या विझून गेल्या, पिकल्या जरी मिशाही हसले पुन्हा नेमाडे मी धूर होत गेलो धारा न अमृताच्या पानेच ही सहाशे डोळ्यात नीज येता मगरुर होत गेलो ही कोसलाबिढारे वाचून पाठ होती 'हिंदू' जुन्या बाजारी - मी शूर होत गेलो स्मरणातुनी पुसेना पुसता कथा 'खंड्या'ची काहीच वाचवेना, मी दूर होत गेलो
काव्यरस

तु आणि मी (मिसळपाव स्टाईल!)

लेखक इंटरनेटस्नेही यांनी शुक्रवार, 24/09/2010 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपावच्या इतिहासात प्रथमच खफ वरील साहित्य इथे प्रकाशित करतो आहे. आपण धाग्याचा खफ अनेकदा झालेला पाहिला असेल पण ही अशी ही पहिलीच वेळ असावी की आम्ही खफचाच धागा करुन एक प्रकारे बॅकवर्ड इंटीग्रेशन केले आहे. तरी कोणत्याही पुर्वग्रहदुषित नजरेने आमच्या सदर धाग्याचा आस्वाद घ्यावा आणि प्रतिक्रियांचा पाऊस त्यावर पाडावा ही न्रम विनंती. हे साहित्य आमचे एकट्याचे नसुन आमच्या ह्या योजनेत अभावितपणे सहभागी झालेल्या श्री नावातकायआहे, श्री भेन्डिबाजार, श्री कुक, श्री स्वानंद व सौ.

सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो,

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 22/09/2010 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
सल्ल्यासाठी विजूभाऊनी, इथ फोडिला टाहो, प्रतिसादातून पडती लाथा, श्रोते ऐका हो ! त्याच्या धाग्याचीच वाट आज लावली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! गंगेवानी निर्मळ होतं, असं पुण्य गाव सुखी समाधानी होतं, रंक आणि राव त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! अशा गावि आला एक चालू जालवंत महाचालू म्हणती त्याला, कुणी म्हणे चंट त्याला पुण्यामंन्दी नोकरी हि लागली कशी वाचकांनी त्याची लाज काढली! स्वस्त घरासाठी त्यांन शोधाशोध केली हवेशीर कोठी एक पाहण्यात आली पण अट मालकानं, अशी घातली कशी वा

(पाल बोले सरडीला )

लेखक अडगळ यांनी बुधवार, 22/09/2010 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
पाल बोले सरडीला , जळले गं अंग, अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग. ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग. सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई, नासकवणीसाठी , घरभर घाई , जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.
काव्यरस

(तथास्तु !!)

लेखक चेतन यांनी सोमवार, 20/09/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
अनुप्रियाची तथास्तु !! वाचुन विडंबन करावे असे वाटले नाही (खर तर तसा कवितेचा विषय विडंबावा असा बिल्कुल नाही आहे ) तरिपण रिकामा वेळ असल्याने थोडासा हा नराधमपणा....
काव्यरस

माझ्या झोपेची झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी ज
काव्यरस

(बाम लावला ग सखे बाम लावला)

लेखक अडगळ यांनी शनिवार, 11/09/2010 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
जे गाणं ऐकल्यावर अर्धा किलो झंडूबाम खावून जीव द्यावा असं वाटलं , त्या गाण्यावर नृत्य करणार्‍या रबरी माकडहाडवाल्या मलैका अरोरा खान यांना सादर समर्पित : विचित्र खाज दाटली , अभद्र ही तिथी, मंदमती हात हे रिमोट शोधती, दोन प्रहरी का गं उगी टिव्ही लावला ? बाम लावला ग सखे बाम लावला. गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने, बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने, बदनामीचा जणू इव्हेंट जाहला.
काव्यरस