Skip to main content

विडंबन

ही ही तिची गाथा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 05/07/2010 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
नंदन यांची अप्रतिम गाथा वाचल्यावर त्यावर केशवसुमारांचे विडंबन येण्याची वाट पाहिली. ते न दिसल्यामुळे स्वतःच एक प्रयत्न करायचे ठरवले. ही महिला दहा बारा वर्षांनी मोठी आहे. तिची लेकरे आता कॉलेजात जातात, आर्थिक परिस्थिती सुधारली आहे आणि तिचे स्टेटसही उंचावले आहे. वि़डंबन म्हणजे विनोद म्हणजेच विसंगती अधिक अतीशयोक्ती हे होणारच. त्यातून माझा पहिलाच प्रयत्न. तेंव्हा ह.घ्या.
काव्यरस

(अनावर)

लेखक अडगळ यांनी गुरुवार, 01/07/2010 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
शुचि यांची क्षमा मागून http://www.misalpav.com/node/12985 एखाद्या मन्द पहाटे ,पाठ सामानाने वाकली असताना कंडक्टर माणकासारख्या गर्द लाल डोळ्यांसहीत तारवटलेला असताना, एका पायाने दुसरा पाय खाजवत, तो लाल डबा डेपोतून येताना पहायचाय. एखाद्या तेलकट , कळकट कढईत, कालचा पिवळट वडा आपले पोट उघडून, नव्यानेच वर्तुळे गिरवीत असेल , त्याला ताजा समजून खायचाय. जमलं तर कधी केबिनीत रात्री बदली डायवरच्या जागेवर झोपयचय. सुसाट हायवेवर वाजवून घ्यायचं आहे हाड न् हाड खरं सांगायचं तर जिवंत पोहोचू असं वाटतच नाही , एवढ्याश्या केबिनीत माण्सं , फण्सं, पोती , डायवर मावतच नाही.
काव्यरस

(वळ)

लेखक अर्धवट यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
उप्पर मेरा एक.. हातात हात घेवुन आम्ही चालायचो ती एका रुळावर पाय ठेवायची अन् मी दुस-या रुळावर पाय ठेवायचो तोल संभाळत चालत असतांना बोलत असतांना "बाबांना आधी तुच सांगायचं" एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो हळुच दाराआडुन, कधीतरी तिचा बाप बघुन गेला माझ्या मात्र पाठिवर आता "वळ" दुखतायत जोरात - पाय टु केस.

(गळ)

लेखक मोहन यांनी शुक्रवार, 25/06/2010 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमचाही एक प्रयत्न. वाहत्या गंगेत ... कोणे एके काळी गळ टाकून मासे पकडायचा आमचा छंद कधी बसमधे ,कधी कॉलेज कट्टयावर तर कधी चौकात प्रत्येकाचा गळ वेगवेगळा गळ जास्त मासे मोजकेच पण छंदात आम्ही धुंद एकमेका सहाय्य करायचा पंथ हार मानायची नव्हती , होतोच बेधुंद मासा गावायला धीर लागतो जरा जाग येवून पाहतो तर मासेपारधी गळ विकून बांधलेले दिसले दावणीला मी मात्र आताशा करतोय समुपदेशन ... मासा टू मासा मोहन
काव्यरस

घो(स)ळ

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 25/06/2010 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
च्यायला या नान्याने सगळ्यांनांच झपाटलय.... हातात हात घेवुन आम्ही झपाटायचो ती एकाच्या मानगुटीवर बसायची अन् मी दुस-याच्या अंगात यायचो झाडावर लटकत लोंबत असतांना बोलत असतांना असंच सगळ्यांना झपाटायच एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो पुनर्जन्माच्या फेर्‍यातून कधीतरी तिचा आत्मा मुक्त झाला मी मात्र मारत आहे त्याच गावातून झपाटण्यासाठी चकरा.... बॉडी टु बॉडी. ---कंदिलकुमार सहजरावांच्या सल्ल्या नुसार जळ्ळा तो शिर्षकात आणलेला आहे.

<<टेंगूळ>>

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शुक्रवार, 25/06/2010 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांच्या रुळावरुन भल्याभल्यांच्या मालगाड्या धडधडत निघुन गेल्या..आमचीही मालगाडी..धडतधडत नाही तर धडपडत.. दात ओठ खात आम्ही नेहेमीच भांडायचो.. ती लाटणे फेकुन मारायची अन मी ते चुकवायचो.. तोल न सांभाळुन बोलत असताना भांडत असताना.. डोक्यावरती आलेली टेंगळ्यांना ती रोज रात्री आयोडेक्स चोळायची.. आज सकाळीच नटुन सवरुन घालुन हिरवी साडी ती निघुन गेली..वटपौर्णिमेला.. मायला ही अशी ही दिसु शकते तर..! मी विचार करतोय ..कपाळावरचे टेंगुळ दाबत दाबत.. स्त्री वर्गाला वटपौर्णिमेच्या शुभेच्छा! - योगेश
काव्यरस

पळ

लेखक सहज यांनी शुक्रवार, 25/06/2010 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थातच मित्रवर्य नानाजी यांची रुळ व मराठी जालीय खूळ खोडी काढून आम्ही असेच बुंग्गाट सुटायचो तो त्याच्या संस्थळावर अन मी दुसर्‍याच्या संस्थळावर पहारा ठेवायचो अश्याच खोड्या काढताना निस्तारताना, कधी आय्डी शेयर करताना अजुन एक ब्लॉग आपणच काढायचा एकमेकांना सांगून खळाखळा हसायचो लिव्हरेजच्या निसरड्या वाटेवरुन कधीतरी त्याची हवा निघुन गेली मी मात्र वसुलि करत आहे अजुन सोनेरी द्र्व्याच्या अमलेत सोमवार टू रविवार
काव्यरस

( फौल ) : स्पॅनिश व्हर्शनसह ...

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 25/06/2010 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
काल अवलियांनी त्यांचे 'रुळ' हे काव्य मिपावर टाकुन मॅच सुरु झाल्याची शिट्टी वाजवली आणि त्यानंतर एक से एक महारथी मैदानात उतरले आणि त्यांनी धडाधङ गोल मारुन अगदी बाजार उठवला. पण आम्ही काल जरा 'इंज्युयर्ड' असल्याने बेंचवरुनच हे सामने पाहिले, आज आमच्याअ फिजियोने आम्हाला फिट घोषीत केले अहे व आम्ही मैदानात उतरलो आहोत ...
काव्यरस

(रुल)

लेखक केसुरंगा यांनी शुक्रवार, 25/06/2010 02:36 या दिवशी प्रकाशित केले.
अवलियांनी टाकलेल्या रुळांवरुन बर्‍याच विडंबन गाड्या गेलेल्या बघितल्या आणि आम्हाला मात्र आमच्या घरातला 'रुल' आठवला! ;) रिमोट हातात घेवून आम्ही भांडायचो ती एका बटणावर हात ठेवायची अन् मी दुस-या बटणावर हात ठेवायचो टिव्ही बघत चरत असतांना बडबडत असतांना असंच संध्याकाळभर भांडायचो एकमेकांना हलकेच धमकावुन सांगायचो एचबीओ चॅनेलवरुन शेवटी 'तसल्या' शोची वेळ निघुन गेली मी मात्र मारत आहे त्याच रिमोटवरुन हवरटासारख्या चकरा... चॅनेल टु चॅनेल. -केसुरंगा
काव्यरस

मूळ

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 25/06/2010 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज बरेच वेळाने मिपावर आलो आणि बघतो तर काय विडंबनाचा पाऊस... सगळी विडंबने वाचता वाचता एका स्थळावर आमचा मूळापासून केलेला बंदोबस्त आठवला प्रतिसादाला प्रतिसाद देत आम्ही खेचायचो तो एका मुद्यावर पाय ठेवायचा अन् मी दुस-या मुद्यावर पाय ठेवायचो काड्या करत खरडत असतांना 'जीबोल'त असतांना सहज जालावरचा टिआरपी ही संभाळायचो एकमेकांना हलकेच व्यनितुन सांगायचो संपादकांनी कंटाळून कधीतरी त्याचा आयडि बंद केला मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.