विडंबन
<घोगरा>
ह्या विडंबनाचा कच्चा माल इथे आहे:
हा घोगरा नक्की चोंबडा आहे
माझी पक्की खात्री आहे
तू जेव्हा कधी कॅफेत येतोस
माझ्याशी गुजगोष्टी करतोस
हा घोगरा पचकतो
नक्की हा आपल्या गोष्टी ऐकतो
चोरून ऐकतो वरून बोंबलतो
लक्षलक्ष चिकण्याकळ्या निरखतो
अंगोपांगी आरस्पानी निरखतो
टप्पोर्या पोरी 'बरोब्बर' घुमवतो
सुगंधाच्या आठवणींचे उसासे टाकतो
नक्कीच!! नक्कीच!!
कारण आजकाल हा रोज बहकतो
आजकाल घोगरा रोज पचकतो ....!!!
काव्यरस
हिंदीतून मराठीकडे
मराठीतून हिंदी चित्रपटांची गाणी तयार करता येतील काय?
उदा
तुला पाहिले तर जाणवले मला सजणी,
प्रेम असते हे वेडे सजणी
(तुझे देखा तो ये जाना सनम)
बघा प्रयत्न करुन......
काव्यरस
(born impetuous....! झेप हविये झेप....!
चित्र जालावरून साभार
(वर्षाव)
छ्या छ्या, आजकाल बायका दारू पिऊ लागल्या. बीयर, वाईन आणि लिकरमधला फरक तरी कळतो का त्यांना? निदान दारू पिऊन मिपावरती धागे तरी टाकू नयेत. धागे कसले, कॉकटेलमध्ये भिजून ओल्यागिच्च झालेल्या कागदी स्ट्रॉ. आजकाल त्याही मिळत नाहीत. माझ्याकडे एक शेवटची स्ट्रॉ आहे ती टाकून देतो. मग बघतोच उंटाची पाठ कशी मोडत नाही ते.
----------------------------------------------------------------------------------------------
लाहोल बिलाकुवत. तौबा तौबा. या काफरांची ही मिजाज! हे अल्ला परवरदिगार, आता तूच माझं रक्षण कर रे बाबा या रावणी पिठल्यापासून.
(मृगजळाचे अनधिकृत बांधकाम )
ग्रेस याच्या अनेकरंगी , गूढगर्भ प्रतिमांचा गिलावा सामान्य व्यक्ती आणि प्रसंगावर मारून केलेलं हे बांधकाम
पिशवीतून घेऊन कोबी ,
चंद्राचा साजण आला
गात्रात उमटली ओवी
भाजीचा प्रश्न निवाला
फेकून विडीचा पावा,
दारात उभा गिरिधारी
क्षितीजाला आधण आले
तुज प्रीत चहाची भारी.
कापता दु:ख कांद्याचे,
डोळ्यातून चंद्र गळाले,
कोबीची हिरवी माया
डाळीचे मोती झाले.
खाऊन चिऊचे घास,
शयनाला साजण गेला,
अन उष्टी आवरताना
शबरीचा जीव रमेना
मालवता दीप घराचे
रक्तात फुले कोरंटी,
ओट्यावर लाजून हसली
ती कढईची वेलांटी.
काव्यरस
आजचा शहाणपणा..........
***"दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही." ***
---------------------------------------------------------------------
"ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे
याचा विचार करण्यात वेळ न घालवता,
ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा."
---------------------------------------------------------------------
*लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं
तर.........
तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात...
---------------------------------------------------------------------
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला ते शिकवतात की ,
' प्रत्येक स्त्रीला
(कोलंबसाचे गर्वगीत)
हजार कात्र्या आम्हा परजु दे, कर्तनयोगे त्या, आम्हाला कुरतडू दे सारे,
विवस्त्र कवटी आज होवू दे, टक्कल पार्याचे, गळू दे व्यर्थ भार सारे.
तैलसुरा प्राशुन माजले , तण डोईवरचे ,
जणु की कवड्यांच्या कविता,
आणि ग्रासिले मुख दाढीने , ओठ मिश्याखाली ,
लोपला नभाआड सविता.
क्षौरवीरा तव सुसाट कर्तन असेच चालू दे,
खुलो नक्षी डोक्यावरती,
मान गळ्यातून निघो कालवे भगव्या पाण्याचे,
नापिता, कळ आली भलती.
ही कानाची पाळी ठेवा , नीट खिश्यामध्ये
शिवुन घ्या जा नाक्यावरती,
नापित आम्ही शस्त्र फिरवतो प्राणकराराने,
जराशी माफ करा गलती.
चला झाडू द्या शुभ्र कापडे, केसांनी मळली ,
आण बे, चुना नि गायपुडी.
वीस टाळकी बारा दाढ्या
काव्यरस
हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा
आमची प्रेरणा पुन्हा एकदा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
हा दारूच्या 'फुल'पात्रांचा दोष असावा
पेगलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा
कधीतरी दारूची भाषा तिला कळावी
कधीतरी मज पेग तिने ही मग मागावा
ग्लास-क्वार्टर ह्या दोन्हीही मापामध्ये
पीण्याचा सारांश कसा सांगा बसवावा
किती पेग मी पिऊन झाले तरी न मजला
कधीच हा तळ या पिंपाचा ना लागावा
उगाच चर्चा पील्यावर केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा
उद्या सकाळी उतार्यास ही घ्यावी थोडी
मेंदूमधला मुंग्यांचा दंगा थांबावा
आज गटारी मुहुर्त उत्तम आहे "केश्या"
एक आयडीया, घरीच
मिसळपाव