Skip to main content

विडंबन

जाहिरातीरेक!!! (जाहिरातने व्यापून व्यापून थोड्याश्याच उरलेल्या उर्वरीत जगाची गोष्ट!)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 11/10/2010 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
(आजचे युग हे जाहिरातींचे युग आहे हे मान्य. पण जाहिरात करण्याला स्थळ, काळ, वेळ यांचे कसलेच बंधन उरले नाहीए. आजकाल जाहिराती अगदी कुठेही दिसतात. चित्रपटात, त्यातल्या गाण्यांत, वर्तमानपत्रात, बातम्यांच्या ब्रेक मध्ये, सिरियल्सच्या ब्रेकमध्ये, होर्डींग्ज वर, पुलांवर, भिंतींवर, रिक्षेवर, घरांवर, भींतींवरल्या घड्याळांमध्ये, टी शर्टांवर, लहान मुलांच्या चॅनेल्सवर, वाहनांवर, कॅलेंडरवर, मुलांच्या वह्या-पुस्तकांवर, कॅरी बॅग्जवर, बस स्टंण्ड्वर, एस. टी.

बंडू आणि मुखपुस्तकातले उरोजकर्क स्थितीसंदेश!

लेखक नगरीनिरंजन यांनी रविवार, 10/10/2010 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपुर्वीची गोष्ट. शनिवारची सकाळ, म्हणजे तसे दहा वाजून गेलेले, पण तरीही ती सकाळच. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत ऑफिसात इमर्जन्सी रिलीजवर काम करून, आयटीतला माणूस झोपू शकेल तितपत, ढाराढूर झोपलेला बंडू रस्त्यावरच्या वाहनांच्या कर्कश कलकलाटाने जागा झाला. बिछान्यावर पडल्या पडल्याच त्याने कानोसा घेतला. स्नेहलता आयटीत असल्यामुळे स्वयंपाकघरातून पोहे-उप्पीट वगैरेचा खमंग वास येणे शक्य नाही हे माहिती असूनही उगाचच वेडी आशा लावून त्याने एक खोल श्वास घेतला.

भसभसून उसळे नरड्यामधुनी धार

लेखक शहराजाद यांनी शुक्रवार, 08/10/2010 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियाली यांच्या भेसूर अमानवी काव्याच्या धाग्यावर बऱ्याच भारतीय भुताखेतांच्या कविता आलेल्या दिसल्या. ही एक कविता अभारतीय पिशाच्चांची.

हडळ जागी भूत जागे

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 08/10/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संगीत तबकडीवर खेबूडकरांचे चंद्र आहे साक्षिला वाजत होते आणि आम्ही मिपावर प्रियालीताईंचे भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य वाचायला सुरवात केली ..
काव्यरस

आग-ए-नफरत (एका कोल्ह्याचे मनोगत आणि संभाव्य उपक्रम)

लेखक भाऊ पाटील यांनी गुरुवार, 07/10/2010 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमरः सर्वपित्रि आवसेनिमित्त एका कोल्ह्याने आमच्या स्वप्नात येउन त्याची व्यथा सांगितली, ती शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न. तोबा तोबा ,ये मै क्या पढ रहा कुई ?? ? वो डब्लु डब्लु एफ ने क्या सेव्ह द टायगर चिंगारी लगाया पुरा हिन्दुस्तान चिनी लोगांके पिच्छु हँडवॉश कर के भागरां मिया .. ए टु झेड चिनी पे अब नफरत की आग उगळ रहे सब मियां लोगां ! क्या इतना एनर्जी है हम मे ? तो फिर आपण आपल्या देशातल्या शिकारीयोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे ..

अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 01/10/2010 16:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच प्रेरणा: ओळखा बघू अमुच्यावरच्या धाग्यासंगे युद्ध आमुचे सरू टंकू आणिक मरू पकतिल प्रेक्षक, पको नागरिक पकतिल महिला, पकतिल वाचक विडंबने पण करू, टंकू आणिक मरू लेख आमुचा आढाव्याचा, स्वप्नामधल्या संदेशाचा अट्टहास हा सुरू, टंकू आणिक मरू विडंबनाला लगेच उत्तर, वेळ न देऊ आम्ही क्षणभर पुरून त्यांना उरू, टंकू आणिक मरू हानी होवो कितीही भयंकर, प्रतिसादांचे चालो संगर अंती विजयी ठरू, टंकू आणिक मरू
काव्यरस

<<विंडबकांच्या 'फळ'प्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू >>

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 01/10/2010 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
विंडबकांच्या फळप्राप्तीसाठी युद्ध आमुचे सुरू चिक्कु किंवा पेरु, चिक्कु किंवा पेरु !! कविता आवश्यक विडबंनासाठी कच्च्या मालावर अत्याचारासाठी धावा कोणाचा करू, चिक्कु किंवा पेरु !! आमुच्या थर्डक्लास काव्यप्रतिभेतुन वाचे जी संपादकाच्या चाळणीतुन, कोणाची कविता स्मरू, चिक्कु किंवा पेरू !! विक्षिप्त,पुप्या,ममो ,रंगा अम्हास ठावे थोर विडंबक औषधासही न गावे कास कोणाची धरू, चिक्कु किंवा पेरू !! प्रासंगिकही लेख न सापडे पडलो धराशायी आम्ही बापुडे एका जनार्दनी टारू , चिक्कु किंवा पेरू !! ऊचलले दंडक संपादकानी रे सुहासा पितृपक्षीय बाजे डंका,चाले तमाशा बंद पडले बोरू, चिक्कु किंवा पेरू !!
काव्यरस

(फुटकळ गळक्या कौलांसंगे युद्ध आमुचे सुरू)

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 01/10/2010 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - काही धागे व एक कौल यांना फुटकळ जाहीर करून त्यांच्यावर हल्ला-बोल करणारी विडंबनं व तथाकथित फुटकळ कौल आल्यावर फुटकळतेविरुद्ध युद्ध चांगलंच पेटलेलं आहे हे दिसलं.
काव्यरस

(चौकट)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 30/09/2010 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबकांच्या भाऊगर्दीतून मी जातो कुणालाही न दिसणार्‍या कवितेकडे काथ्याकुटाखाली, कौलाखाली लपलेल्या शाब्दिक चित्राकडे तिथे असतो नवख्या कवीच्या शब्दकुंचल्यातले रंग सांडलेला भाष्यतुकडा. मला ते चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं थट्टाबध्द मी विडंबन टाकतो त्या चित्राभोवती. आता माझी शाब्दिक चौकट, त्यात रगडलेले भाव, कल्पना अन् त्याखालची प्रतिसादांची जागा - इतकेच ...
काव्यरस