आमची प्रेरणा हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
हा आयटिच्या सर्व मुलांचा दोष असावा
सैपाकाचा वर्थ कसा त्यांना उमजावा
कधीतरी भेंडीची भाजी मला जमावी
कधीतरी मज भात मसालेही समजावा
घर-ऑफिस ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
सैपाकाचा वेळ कसा सांगा बसवावा
युगे बदलली काळ बदलला किती बघा हा
पतीपत्नी संवाद ट्विटरनेच घडावा
करू कशाला घरी परतल्यावर मी कामे
पती कामसू आणिक सुग्रण मज लाभावा
उगाच चर्चा तू तेव्हा केली तायांशी
राग तुझ्यावर घरातला सगळा काढावा
अता तरी संपावी इतिहासाची चर्चा
धाग्यांमधला लोकांचा दंगा थांबावा
अजून किती मी घासू "केसु" गुर्जी सांगा
कसा लेख शतकी एखादा मी खरडावा
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1697
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुरे आता...फार झालं
पुरे आता...फार झालं
अजून किती मी घासू "केसु"
मरे हुए को क्यो मारते हो? प्रायश्चित्त म्हणून स्वत:चंच विडंबन देखील लिहिलं. आणखीन काय करू सांगा की...
त्यात मी आयटीचा पण नाही...
हा हा
In reply to अजून किती मी घासू "केसु" by राजेश घासकडवी
अस काय म्हणता गुर्जी.. तुम्हीच नाही का म्हणाला होता.. वाहत्या गंगेत आपण ही हात धूवावा..;)
(स्मरणशील)केशवसुमार
आय टी हा शब्द मिपावर निषिद्ध
आय टी हा शब्द मिपावर निषिद्ध करावा असे वाटते...
+१
In reply to आय टी हा शब्द मिपावर निषिद्ध by भारतीय
ईथुन पूढे आय टी चा अर्थ
इंटरनॅशनल टेररीस्ट असा च घ्यावा !!
;)
छाण!
छाण!