हा शब्दांच्या गुणसुत्रांचा दोष असावा
स्वप्नलिपीचा अर्थ कसा कोणा समजावा
कधीतरी झाडांची भाषा मला कळावी
कधीतरी मज अबोल चाफाही उमजावा
जन्म-मरण ह्या दोन मितीच्या प्रतलामध्ये
जगण्याचा सारांश कसा सांगा बसवावा
युगे बदलली काळ बदलला अरे विठ्ठला
एक आयडी ट्विटरवर तूही उघडावा
किती खोल मी अजून जावे मनात माझ्या
कधीतरी तळ मला अता त्याचा लागावा
उगाच चर्चा मी तेव्हा केली माझ्याशी
चुकले माझे अखेर हा निष्कर्ष निघावा
अता एकदा संपावी काव्याची वेणा
मेंदूमधला शब्दांचा दंगा थांबावा
वाचने
4077
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हम्म .. थोडेसे विस्कळीत
+१
In reply to हम्म .. थोडेसे विस्कळीत by llपुण्याचे पेशवेll
+ १
In reply to हम्म .. थोडेसे विस्कळीत by llपुण्याचे पेशवेll
+१
In reply to हम्म .. थोडेसे विस्कळीत by llपुण्याचे पेशवेll
वा अनिरुद्ध वा!!
गझल कशी असावी ? ह्याचे उत्तम
ह्म्म.. थोडेसे विस्कळीत वाटले
सुंदर गजल, मतला, ट्विटर,
???
+?
In reply to ??? by मिसळभोक्ता
ह्म्म
In reply to ??? by मिसळभोक्ता
झकास.
धन्यवाद!!