गेल्या दोन दिवसांपासून मिपावर अनेक सुरेख चर्चा चालू आहेत.
अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत.
विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत, विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे.. अनेक लोकांना आनंद झालेला आहे.. जुन्या मिपाच्या नावे उमाळे फुटू लागले.. हे सगळे बघून आम्हालाही काव्य गुदगुल्या सुरु झाल्या
धागा धागा अखंड दळूया
वाईफ वाईफ मुखे म्हणूया
अजाईलाचे विवाहितांचे
उभे आडवे गुंफुन धागे
नविनआयडी धुरंधरांचे
वस्त्र फिटले केसूरंगे
सर्केश्वर तो दहिकर पहिला
धाग्याअंती त्यास स्मरुया
आयटी वाईफ धाग्यावरती
मणामणांचे जंतू टाका
टाकुन काडी झाडावरती
कोक घेउनी जागा राखा
स्त्रीमुक्तीचा फिरवित चरखा
प्रतिसादांची मजा बघूया
-केसुरंगा
काव्यरस
वाचने
2181
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपणच बाकी होतात..
छ्या दिनेशदादा, तुम्ही कोकवरच
In reply to आपणच बाकी होतात.. by दिनेश
प्रासंगीक :)
अहो कच्च्या मालाचा
In reply to प्रासंगीक :) by गणपा
लवकर
In reply to अहो कच्च्या मालाचा by केसुरंगा
झिकलाय खंप्लीट !
हा हा हा..
हि हि हि!!
_/\_
जम्या.. पण अजुन मोठ करुन बरेच
वा .. वा .. हि खरी घट्ट विण