(कै . कवी बोरकर आणि त्यांचे वाचक , मागितली तरी क्षमा करणार नाहीतच , म्हणुन मग क्षमा न मागताच लिहीतो.)
माझ्या 'गोव्या'च्या पुडीत,
गड्या, तुतारी वाजते,
नसानसातून जणू ,
ब्रम्ह फुगडी खेळते.
माझ्या संभाजी बिडीत,
झाले केवड्याचे श्वास,
फुले मेंदूत मोगरा,
दिवेलागणीचे भास,
माझ्या मनाच्या मातीत,
फुले तंबाखूचे मळे,
झाले आभाळ चुन्याचे,
दाढेआड चंद्र खेळे.
माझ्या रस्श्याच्या वाटीत,
मटणाचा महामेरू,
पोटा लागली तडस,
चला फुलचंद मारु.
माझ्या जगत्या कुडीत,
आले माहेराला सारे,
घ्यावा जीवाचा जोगवा,
सारी उघडली दारे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
याद्या
4632
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा .. मस्त.. गोव्याच्या
खल्लास रे अडगळा!
नसानसातून जणू , ब्रम्ह फुगडी
वा
हा हा हा..
आमच्या कडून एक कडवं भर..
छान!
आयचा xxx
जबरी विडम्बन ! ! !
माझ्या गुटख्याच्या पुडीत...
शेरास सव्वाशेर!!
In reply to माझ्या गुटख्याच्या पुडीत... by बहुगुणी
हेच म्हणतो. विडंबने म्हणुन
In reply to शेरास सव्वाशेर!! by प्रभो
_/\_ दाहक वस्तुस्थिती. अडगळ
In reply to माझ्या गुटख्याच्या पुडीत... by बहुगुणी
वा .. मस्तच
In reply to माझ्या गुटख्याच्या पुडीत... by बहुगुणी
अडगळ
जबरा !
काटा किर्र रापचीक
एक नंबर ...
एक नंबर ...
झकास ...
झक्कास
मस्त.