सल्ल हवा आहे

विजुभाऊ's picture
Login or registerto access quick links.

मी नुकताच पुण्यात आलो.
पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो
काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या.
सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो .
एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे.
मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.
म्हणाले की फ्लॅट्चे अ‍ॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार.
माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो.
शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अ‍ॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली.
मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्‍यासकट झकास पार्टी दिली.
एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्‍याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली.
मैत्रीणीच्या नवर्‍याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली.
त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना.
घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे.
मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?

'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग

'गांधीगिरी' ने कदाचित प्रसंग निभावून जाऊ शकेल.

not necessary. कदाचित

not necessary. कदाचित चिघळला/चीघळवला हि जाऊ शकतो.

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ!!!!

भोगा कर्माची फळं!!

कुणाला एकाला आजारी पडावे लागणार बहुतेक!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाइन फ्लु झाला आहे असे

स्वाइन फ्लु झाला आहे असे सांगा, तो मालक पुढील दहा वर्षे बोलविणार नाही.

ठ्या:!

आणि बोलावलंच तर तोंडाला मास्क लाऊनच भेटीला घेऊन जायचं...ओळखणारच नाही तो घ.मा.

आणि निलगीरीचं तेल अंगावर

आणि निलगीरीचं तेल अंगावर शिंपडून जा म्हणजे जवळही नाही येणार.

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

वा वा काय प्रश्न आहे?

काय विजुभौ खरोखर वेळ जात नाहीये का? का शीरियसली विचारताय?

गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे! Wink

चतुरंग दत्त

लेडीज नव्हे, 'पाशवी' म्हणा!

लेडीज नव्हे, 'पाशवी' म्हणा! Wink

(पळा आता ... दोन दणके मिळताहेत नाहीतर!)

अदिती

गोलमाल है भै सब गोलमाल है ची

गोलमाल है भै सब गोलमाल है ची लेडीज स्पेशल आवृत्ती करुन टाका मस्त चान्स आहे
रंग्या जी अहो त्या पिक्चर मध्ये अमोल पालेकर मिशी लावून आणि काढून दोन वेगवेगले रोल प्ले करतो.
मैत्रीणीला हे कसे जमेल . आणि समजा तिने तसे काही केले आणि त्यातून अजून काही अचाट नाटक उपटले तर माझेच विडंबन होईल

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

चला खलास, झाले एकदाचे १०० प्रतिसाद!!

काय विजुभौ झाले का समाधान? Wink
(आता धागा वाचनमात्र करावा का? Wink )

हो, लवकर करा.

हो, लवकर करा. Smile

>>>(आता धागा वाचनमात्र करावा

>>>(आता धागा वाचनमात्र करावा का? Wink )

का? चालु द्या की थोडी मस्ती... ! अडचण असेल तर करा वाचन मात्र.
जे धागे करायला हवे तिकडे मात्र दुर्लक्ष.. पण निखळ कुणालाही न दुखावणार्‍या मनोरंजक धाग्यांवर संक्रांत !!

वा ! अजबच कारभार आहे !! हाच धागा मिभो वगैरेंचा असता तर असा प्रश्न पडला असता का ? नसताच.. चालु ठेवलाच असता धागा !!

आणि समजा धागा भरकटेल असं वाटत असेल तर तसे प्रतिसाद उडवता येतातच ना? मग मनोरंजनाला का कात्री?

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

का उगा शिमगा लावलाय अवलिया?

का तुम्हालाही गंमत समजेना झालीये?

संपादकांना मी चांगला ओळखुन

संपादकांना मी चांगला ओळखुन आहे.

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

आहात ना? मग उत्तम!!

चतुरंग

संपादकांना मी चांगला ओळखुन

संपादकांना मी चांगला ओळखुन आहे
सदस्यांना संपादक ओळखून नाहित कि काय?
इकडे धागा मजेत चाललेला दिसत असताना मंडळाला तिकडे खरडी आणि व्य. नि. मात्र तक्रारींचे असतात त्याचे काय?

रेवती

एखादा धागा मजेत किंवा भांडणात

एखादा धागा मजेत किंवा भांडणात किंवा इंचाइंचाने चालु असतांना एखाद्या सदस्याला त्यातील काही प्रतिक्रिया गैर वाटल्या म्हणुन त्याने तशा अर्थाने संपादक मंडळाला खरड व्यनी करणे हे चुकीचे आहे असे मला वाटत नाही. संपादक मंडळाचे तसे आकलन असल्यास तशा पद्धतीचे धोरण जाहिर केल्यास सदस्य अशा प्रकारे संपादक मंडळास खरड व्यनी करणार नाहीत असे मला वाटते. सबब योग्य तो खुलासा संपादक मंडळाने करावा.

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

कोणाला कश्यात मजा वाटेल ते

कोणाला कश्यात मजा वाटेल ते सांगता येत नाही.
नापसंतीचे निरोप येत राहणार. त्यावेळेस सगळ्यांनाच तारतम्याने निर्णय घ्यावे लागतात.
संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे.
उगीच येताजाता टोमणे मारून काहीही साध्य होणार नाही.

रेवती

सहमत आहे. कुणाला कशात मजा

सहमत आहे. कुणाला कशात मजा वाटेल ते सांगता येत नाही...

संपादकांनी आपल्याला काही त्रास दिला असल्यास तसे सविस्तरपणे कळवावे.
संपादकांनी त्रास दिलेला संपादकांनाच कळवायचे मग कसा निर्णय होणार?
तुम्ही पण गंमतच करता ब्वा ! असो.

टोमणे मारायला सुरवात मी केली नव्हती. पण तरीही माझ्या बाजुने या धाग्यापुरते थांबतो.

धन्यवाद.

परमेश्वर आपल्याला दिर्घायुष्य देवो !

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

बराबरे

बराबरे

थापा मारू नयेत.

आपण वयाने लहान दिसतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!

स्मरणशक्ती कमी असणार्‍याने थापा मारू नयेत.

एकतर स्वतः खुळं असल्याचं आता नाटक करा नाहीतर मालकाला खुळं बनवा. स्वतःच्या पत्नीलाच घेऊन तिकडे जा आणि ठासून सांगा हीच तुमची बायको आणि हिच्याशीच तुम्ही ओळख करून दिली होतीत वगैरे वगैरे.

अदिती (गोबेल्स)

अदिती

घ्या. घरमालकाला वाट्टेल ते

घ्या. घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

अच्छा, असं 'लफडं' आहे तर!

अच्छा, असं 'लफडं' आहे तर!

अदिती

घरमालकाला वाट्टेल ते ठासुन

घरमालकाला वाट्टेल ते ठासुन सांगतील हो. बायकोला काय सांगणार.

बायकोच ठासुन मारेल...

बिपिन कार्यकर्ते

अनुभव हीच खात्री असं आत्ताच

अनुभव हीच खात्री असं आत्ताच कुठेतरी वाचनात आलं माझ्या!

अदिती

:)

नवीन घर शोधायला सुरुवात करा!

तसेही तुमच्या एका मित्राचा पुण्यात १ बीएचके आहे म्हणे......तिथे मस्तपैकी रहा अन् प्यार्टी करा!

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!

तुमच्या एका मित्राचा

त्या मित्रालाच बुरखा घालुन घेउन जा.

--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

आता मैत्रिणीलाच विचारा की तिला

आता मैत्रिणीलाच विचारा की तिला जुळी बहिण आहे का?
अन्यथा त्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/अपहरण) करा.
हाय काय अन नाय काय?
इजुभौ जरा स्वप्नातुन बाहेर या आणि थोडे बॉलीवुड्पट/हिंदी मालिका पाहात जा Wink

~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली

मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे

मैत्रीणीला जुळी बहीण वगैरे नाहिय्ये.
अन्यथा द्या (नसलेल्या) जुळ्या बहिणीचा अंत (खुन्/अ‍ॅक्षीडंट्/कुंभका मेला) करा.
हाय काय अन नाय काय?

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का?
नाटक सिनेमात ते ठीक आहे. पण खर्रखुर्रे?

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या

आणि त्यानन्तर मी किम्वा त्या मैत्रीणीच्या नवर्‍याने कायम विधुराची भुमीका करायची का?

नाही, तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.

अदिती

तुम्ही दुसरं लग्न करायचं!

तुम्ही दुसरं लग्न करायचं! सोप्पय.

सोप्पय...........
हम्म....
आत्ताच आमची गॉन केस झाली आहे. तसे काही केले तर पुरती वाट लागायची.

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

अहो विजुभाऊ, पहिली बायको

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं! सिंपल हाय!!

अदिती

दीड महिन्याच्या कालावधीत नविन

दीड महिन्याच्या कालावधीत नविन फ्लॅट भाड्यानं घेउन, पहिल्या बायकोला मारून , दुसरं लग्न करून वर तुमची वास्तु कित्ती लकी आहे असं म्हणायच Smile भोवळ येइल मालकाला ...

पुष्करिणी

आणि ही वास्तु पुण्यात आहे

आणि ही वास्तु पुण्यात आहे म्हणे! Wink

(रेवतीताई, वाचते आहेस ना??)

अदिती

छे:! काय हे? पोरींनो जरा

छे:!
काय हे?
पोरींनो जरा हिंदी सिनेमे कमी पहा गो. =)) =))

वाचतिये हो! विजुभाईंचा धागा

वाचतिये हो!Wink
विजुभाईंचा धागा आहे हा!
वाचायलाच हवा!
उद्या मला कोणी 'पाशवी' म्हटलंच नाही तर वाईट वाटेल ना!Wink

रेवती

मी ही हेच सुचवणार होतो पण

मी ही हेच सुचवणार होतो पण कार्यक्रम आहे पुढच्या आठवड्यात. मेलेल्या बायकोचा तेरावा घालण्याएवढे पण दिवस नाहीत त्यांच्याकडे.

___________
वाटचाल

परत तेच!

अहो विजुभाऊ, पहिली बायको आक्सिडेंटात मारायची आणि मग दुसरं लग्नं करून (खर्‍या) पहिल्या बायकोला घरमालकासमोर हजर करायचं!

आणि मग पहिल्या बायकोची ओळख "ही माझी दुसरी बायको" अशी करून द्यायची? त्यापेक्षा घरमालकाची पापी घेतलेली परवडेल त्यांना, काय विजुभौ? Wink

द्राविडी प्राणायम

ह्या वयात असली थेर?
शोभा नाही देत.

अगाबाबो....

ही कोण आता?

ही कोण आता?

शोभा!!!!!!!!!!!!

o ज्योति कामत o

...कायतरी..तुम्ही पण ना!

स्पष्ट सांगा न...वेळ नाहिये म्हणून्....तुम्ही बांधिल थोडेही आहात तुमच्या बायकोला कोणाला पण भेटवायला?
तुमच्या त्या मैत्रीणीला आणि तिच्या नवर्‍याला देखिल सांगा कि तुम्हिही थोडी attitude दाखवा...!
... कारण प्रसंग आहे खरा बाका....आणि घ्.मा. पुणेरी दिसतो आहे....प्रसंग अंगावर बेतला ना तर पोलिस कंप्लेण्ण करायलाही मागे पुढे पाहणार नाही!
All the best....!

मी अशीच आहे!

काय विजुभो

सोमवारी दुपारीच 'कार्यक्रम' सुरु केलात का?
बाकी चालू दे..
१०० नक्कि.. झाड बुक करतो लगेच..

घर मालक तसा भला माणूस आहे. पण

घर मालक तसा भला माणूस आहे. पण काही सांगता येत नाही.
अ‍ॅटीट्यूड दाखवून उपयोग नाही. प्रेमळ निमन्त्रण आहे

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

.... मग लाडीगोडी!

....मग त्याची एक गोड पापी घ्या आणि सांगा कि अहो काका.....XYZ......XYZ....XYZ>...!
मग त्याचा भलेपणा कसा रुद्रावतार धारण करतो ते पहा!
jokes apart....
खरच जर असेल ना समजुतदार मनुष्य तर खरच त्याला एखाद्या योग्य वेळी सत्य सांगुन टाका. हवे तर तुमच्या (खर्‍या) बायकोला बोलावून घ्या.आणि त्यांना त्यांच्या बायको करवी समजावयाचा प्रयत्न करा... हवे तर असेही सांगा ही हा फ्लॅट convinient होता.अजुन एक चान्गले कारण म्हणजे मी वास्तु मानतो...तुमची ही वास्तू अतिशय शुभ आणि प्रसन्न वाटली ...तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on....!
हवे तर त्यांना सांगा कि मी फ्लॅट चेंज करायलाही तयार आहे..!
कारण चुक झाली तर आहे..
सरवा सारव किति दिवस करणार?
you have to confess and face it...!
Face it!
काय होइल्? थोडे दिवस अवघड्ल्यासारखे होइल...आणि घर बदलावे लागेल ना...ठिक आहे...
accept it the way it comes!
पण रोजची भिती तरी कायमची जाईल ना!

मी अशीच आहे!

तुम्हीही मला माझ्या

तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात.

घराबाहेर काढेल हे ऐकून तो मालक ... अगदी कायदा आणि अ‍ॅग्रीमेंट धाब्यावर बसवून!

अदिती

घरमालकाची आधी एक गोड पापी

घरमालकाची आधी एक गोड पापी घेतली असेल आणि 'तुम्ही मला वडलांसारखे आहात' हे म्हटल नाही तर जास्त प्रॉब्लेम्स येतील बहुतेक ...Smile

पुष्करिणी

ठ्ठ्ठो!

सध्या विजुभाऊंचा चेहरा कसा झाला असेल हे आठवुन हसुन हसुन मेलोय!

घरमालकाची आधी एक गोड पापी

घरमालकाची आधी एक गोड पापी
अवघड आहे. घ मा एक विशाल मिशाळ रीटायर्ड फारेष्ट हापिसर आहेत. त्यांच्या घरी दुनळी बंदूक आहे.
मी ठ्यॉ करायला जायचो ते ठो ..ठो... करायचे.

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

म्हणजेऽऽऽ????

ते घरमालक मिशाळ नसते, फॉरेश्ट हापिसर नसते, त्यांच्याकडे दुनळी बंदूक नसती तर..............तुम्ही त्यांची गोड पापी घेतली असती??????????????????

त्यांना कदाचित घरमालक नको

त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल!

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

>>If you don't learn from

>>If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.
=)) =)) =)) =))
काय संदर्भ आलाय ह्या वाक्याला. Wink

>>त्यांना कदाचित घरमालक नको घरमालकीन हवी असं म्हणायचं असेल!
ह्म्म्म....भौ, भौतेक तुम अबी गयाच कामसे. आता आम्ही तुम्हाला 'ब्लॅकमेल' करणार.

तुम्हीही मला माझ्या

तुम्हीही मला माझ्या वडिलांसारखे आहात...and so on
त्यापेक्षा ही पण मला बायकोसारखीच आहे असे म्हणुन ओरिजिनल बायकोला समोर करणे जास्त सोपे जाइल त्याला.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

ओरिजिनल बाय्को मस्त ओरिजिनल

ओरिजिनल बाय्को मस्त ओरिजिनल खावडपट्टी काढेल ती पण ऐकावी लागेल त्याच काय?

शुभेच्छा!

तुमचा हा प्रश्न लवकरच सुटूंदेत अशा शुभेच्छा! Smile

बाकी ही चर्चा/लेख " मदत" शिवाय "नृत्य" या सदरात का वर्गिकृत केली आहे ते कळले नाही. पण चर्चेचा मूळ मुद्दा त्यात नृत्य, मदत वगैरे वाचून अंमळ अजूनच गोंधळ झाला आहे. Wink

हा सदरा योग्य सदरात पडला आहे हो.....

कारण त्यांची जी तारांबळ चालु आहे ति दिसते आहे ना!
''त्रे धा ति र पि ट..... त्रे धा ति र पि ट" या तालावर! Wink
आणि घरमालकांना सत्य कळल्यावर ते तांडव करतील ते वेगळेच..
एकुण काय..
चम्मतग आहे सगळी!

मी अशीच आहे!

हुम्म्म

कोणालातरी आजारी 'पाडो'च !!!!!!!!!
आणखी एक मोलाचा सल्ला जाईचे ऐकू नका नाहीतर तुमचे दुसरे लग्न नक्की.

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.

बोंबला!

आधी नसती झक मारावीच कशाला भाऊ?
च्यायला, वहिनींना फोन करुन बोलावुन घेता येत नव्हतं काय?
आता हे लफडं तिकडं कळालं तर येतात सगळे संस्थानिक मेव्हणे तलवारी घेऊन......

ओ भौ, आपुन तुमाला वळकत नाय हां...आधीच सांगुन ठिवतोय. Wink

आणि कठिण प्रसंग आला तर आपली माणस आहेत की

... हा आहे..... तो आहे......झालच तर आपले धमाल राव...!
असे निधड्या छाती चे मित्र अस्ताना तुम्हास भिती कशास वाटते?
.. हो की नाही ओ धमालराव..?
बघा कस्से धाऊन येतिल मदतीला!

मी अशीच आहे!

आँ????

मी? म्...म्म्म्म्म.....म्म्मी......
मै कौन हूं? मै कहां हूं?

तुमच्या मालकांना या धाग्याची

तुमच्या मालकांना या धाग्याची लिन्क द्या

अगोदरच्या १०-१५ धाग्यांची पण

अगोदरच्या १०-१५ धाग्यांची पण लिंक द्या, इंच इंचाची, आरक्षणाची लिंक पण द्या, मालक काय इथून हलणारच नाय मग.

आबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

आबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.
माताय काय पण सल्ला दिलाय. हे म्हणजे पेटलेलं शेपूट कसे विझवायचे याचा सल्ला "रॉकेल टाकून "असा देण्यासारखे आहे

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

ज्याचा जीव जातो

ज्याचा जीव जातो त्याला कळ्ते!!
थाबा आणि वाट पहा.

'अशी ही बनवाबनवी'? सल्ला

'अशी ही बनवाबनवी'?
सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः
१. कार्यक्रम किती मोठा आहे? बरेच लोक येणार असतील तर बरं.
२. कार्यक्रम जिथे आहे त्या जागेला दोन प्रवेशद्वारं आहेत का? असलेली बरी.
३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का?
४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का?
५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का?

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः

१. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का?
२. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?)

याही प्रश्नांपैकी एकाचे जरी उत्तर नकारार्थी असेल तर क्षमस्व.

___________
वाटचाल

आब्बा जब्बा डब्बा

सल्ला देण्यापुर्वी काही प्रश्नः
३. तुमची मैत्रीण तुमच्यासाठी एका संध्याकाळी कितीही वेळा कपडे बदलू शकते का?
हे मी तिला डायरेक्ट विचारून शकत नाही. उगाच दोन दणके खावे लागतील
( इमॅजीन करतोय की मी तिला विचारतोय " तू माझ्यासाठी संध्याकाळी कितीवेळा कपडे बदलू शकतेस?"

४. तुमच्याकडे किंवा मैत्रीणीकडे कार आहे का?
हो आहे
५. तुमची मैत्रीण कारमध्ये कपडे बदलू शकते का?

माहीत नाही.
सल्ला नको पण तुमचे प्रश्न आवरा . ( "जुदाई" मधला प्रचिन्हाची केसांची बट असलेला परेष रावळ आठवा)
आमचे उत्तर "आब्बा जब्बा डब्बा "

वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर आणखी काही प्रश्नः

१. तुमचा कोणी डॉक्टर किंवा फार्मसी वाला मित्र आहे का?
हो आहेत. डॉ दाढे ऑर्थोडेन्टीस्ट आहेत. त्यांचा उपयोग घरमालकाने किंवा माझ्या मैत्रीणीने माझे दात पाडल्यावर होऊ शकेल.

२. तुम्हाला हातचलाखी येते का? (की नुसतंच खोटं बोलता येतं?)
खोटं अगोदरच बोलून झालय. हातचलाखी कशी करायची ते शिकवा.

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

त्यात काय सल्ला मागायचा?

त्यात काय सल्ला मागायचा? तुम्ही, तुमची मैत्रीण, आणि तिचा नवरा तिघेही जा घरमालकाकडे आणि सांगा आमच्या दोघांचीही हिच्च बायको आहे म्हणून. त्याने काही वाद घातलाच तर द्या ना द्रौपदीचे उदाहरण! आपलीच संस्कृती आहे म्हणून सांगा, शिवाय तुमची मैत्रीण आयटीतील एक आधुनीक, मुक्त, पाशवी, पुणेरी स्त्री आहे असेही सांगा. त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं.......

त्यापेक्षा त्या मैत्रिणाचा नवरा आणि विजुभाऊ दोघांनी त्या घरमालकासमोरच 'ही माझी बायको आहे' असं भांडण केलं तर?

>>त्यानंतर घरमालकाचा एक फोटू काढून इथेच टाका.
=)) =)) =)) =)) =))
का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))

आणि वर त्या घरमालकाने

आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून!

>>का कोण जाणॅ, माझ्या डोळ्यापुढं बनवाबनवीमधले सुधीर जोशी उभे राहिले. =))
अगदी अगदी... आणि ही चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

चॅक्क...

>>आणि वर त्या घरमालकाने ह्यांच्या मैत्रीणीला विचारलं कि तूच सांग तुझा नवरा कोण तर हिनेही म्हणावं "दोघेही" म्हणून!
घोळच घालायचे आणि त्या घ.मा.ला येडाच करायचाय तर तिनं उत्तर द्यायचं, 'जो जिंकेल तो!' =))
घ.मा. डोईला तेल थापून एरंडेलाचा पानच बांधून बसेल.

>>चौकडी सुधीर जोशींच्या घरातून गेल्यावर्/जाताना त्यांनी केलेला "आनंदी आनंद गडे..." वरचा नाच
अग्ग्ग्ग्ग्ग...नको यार आठवण करुन देऊ. मग मला डायबिटिसवरचं औषध इस्त्राईलहुन आणणारा लक्षा आठवतो. =))

ठ्ठोsssssssssssssss!! वरील

ठ्ठोsssssssssssssss!!

वरील सल्ले मस्त! विजुभाऊ, विचार करा Wink

वा वा. आणि तिने दोघेही असे

वा वा. आणि तिने दोघेही असे उत्तर दिल्यानंतर समोर विजुभौची बायको (खरीखुरी) समोर येउन ठाकली तर शोल्लिड धमाल. मला नो एण्ट्री आठवला.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

अगंआयेऽऽ... अरे गपा रे! नो

अगंआयेऽऽ...
अरे गपा रे!
नो एंट्री म्हणाल्यावर विजुभाऊ फरदीनखानसारखं डोंगराच्या कड्यावर उभं राहून 'चंपाऽऽऽ...चंपाऽऽऽ' करुन बोंबलताना डोळ्यापुढं दिसले.

हॅ हॅ हॅ. आणि यावरुन मला

हॅ हॅ हॅ. आणि यावरुन मला झूठ से मुझे सख्त नफरत है असे म्हणणारी सेलेना आठवली. विजुबौ वहिनींना झूठ से नफरत नाही आहे ना? नाहीतर तुमची मूळ घरातली एण्ट्री बंद व्हायची. कायमस्वरूपी पुणेकर व्हायला लागेल (आणि मग तिसरीच बाई बायको म्हणुन घरमालकाला दाखवावी लागेल)

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

>>"आनंदी आनंद गडे..." वरचा

>>"आनंदी आनंद गडे..." वरचा नाचही अप्रतीम!

त्याला नाच नाही ड्यँन्स असे म्हणतात.

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

एव्हढ करण्यापेक्षा......

त्या कार्यक्रमाला कल्टी मारता येते का बघा.

वेताळ

ओ भौ..

एक आयड्या!

त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))

त्या घरमालकाला सांगा, "मला

त्या घरमालकाला सांगा, "मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन." =))

देशमुखबाबा .......स्वधर्मे निधनण श्रेयः.परधर्मो भयावहः
( हे वाक्य बहुतेक चार लग्ने करण्याच्या सौजन्य भयास्तव म्हंटले गेले असावे )
ते तसे काही केले तर मला गॅलरीतून कचरा खाली फेकावा लागेल , चौथ्या मजल्यावर बोकड पाळावा लागेल आणि तुम्हीच आम्हाला सोसायटीत जागा देणार नाही.

कोणतीही गोष्ट सह न करणे यालाच सहन करणे असे म्हणत असावेत

=)) =)) =)) छे छे! उलट

=)) =)) =))
छे छे! उलट आम्ही तर घाबरुन जागा देऊ तुम्हाला..नायतर तुम्ही ब्यारिश्टर शिंदेंमार्फत आमच्यावर खटला भराल की.

श्री धमाल यांच्यासारख्यांच्या

श्री धमाल यांच्यासारख्यांच्या भावना भडकावणे सोपे आहे हे मला आता पटू लागले आहे.
-अमोल पेशवे

"फाटके होते खिसे अन नोटही नव्हती खरी
पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची " -अरुण म्हात्रे

=)) =)) =)) असु

=)) =)) =))
असु शकते.
आमच्यावर सुदैवानं हळद+लोणी+मुसळ असा प्रयोग कधी झालेला नाही त्यामुळे असे नक्की असु शकते.

ऐकतोय, जिथून जे काही चांगलं

ऐकतोय,
जिथून जे काही चांगलं कामाचं भेटतं ते उचलाव माणसानी.

बाकी तुम्हाला बोकड पाळायला, कचरा फेकायला, जिन्यात गर्दी करायला कोणी अडवले आहे काय ? मला सांगा, बघतो एकेकाकडे.

मला चार बायका आहेत त्यापैकी

मला चार बायका आहेत त्यापैकी जी अव्हेलेबल असेल तिला घेऊन येईन."

तुम्ही थत्ते काकांना विचारा हो ते समान नागरी कायद्यातुन काहीतरी पळवाट काढुन देतील. मग तुम्हीही ४-४ लग्ने करु शकाल. It will be convenient u see.

********************************************

सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा । कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी

आजकाल रस्त्यांवर खड्डे खूप

आजकाल रस्त्यांवर खड्डे खूप झालेत नायी ?

अहो विजुभौ, तुम्ही ते जपानी

अहो विजुभौ,
तुम्ही ते जपानी गादीचे सेमिनार अटेण्ड केले होते ना!
त्यातल्याचा काही कॢप्त्या ( आयचा घो कॢ च्या) वापरा ना!

टारुस्टैल सही
(भाडेकरु) फ्लॅटोबा ओनर!

जे न करे रवी | ते करे कवी | देतो तो शिवी | अस्खलित ||

खरंतर तुमचं "सल्ल हवा आहे"

खरंतर तुमचं "सल्ल हवा आहे" शिर्षक वाचून,

१) तुम्ही दबंग पाहिला आणि तुम्हाला सल्लू हवा आहे असं वाटलं.
२) मंद हवा, धुंद हवाप्रमाणे ही 'सल्ल' हवा काय आहे हे बघण्यासाठी धागा उघडला.

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

किती पैसे देणार? सल्ला देतो.

किती पैसे देणार? सल्ला देतो.

--
प्रत्येक हिंदूद्वेष्टा हा विचारवंत नसतो पण प्रत्येक विचारवंत हा हिंदूद्वेष्टा असतो..

नानाच्या ५०% रेट्मध्ये मी

नानाच्या ५०% रेट्मध्ये मी सल्ला देते.

- सोनाली

इथं मिपावर फुकट सल्ला देणारे

इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव!

-अनामिक
If you don't learn from your mistakes, there is no sense in making them.

>>इथं मिपावर फुकट सल्ला

>>इथं मिपावर फुकट सल्ला देणारे शेकडो असताना उगं पैसे पैसे करत पुढं पुढं करताय राव!

-अनामिक

स्वतःची किती जाहिरात करावी Wink

- सोनाली

© 2011 Misalpav.com, All rights reserved. Disclaimer | Privacy policy
Scroll to Top