Skip to main content

(पाल बोले सरडीला )

(पाल बोले सरडीला )

लेखक अडगळ
Published on बुधवार, 22/09/2010 प्रकाशित मुखपृष्ठ
पाल बोले सरडीला , जळले गं अंग, अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग. ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग. सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई, नासकवणीसाठी , घरभर घाई , जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 3262
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

आता नासकवणी माझ्या खाण्याच्या पदार्थातून बाद! बाकी विडंबन छान! ओट्यावरी होते , दूध आणि पाव, माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव, झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग. हे फार आवडले.

भन्नाट ....................एकदम चुरगळुन मुरगळुन थुकलास मित्रा.......... :=)) प्रतिभाशक्तीस दाद..

मस्त विडंबन! (वारकरी)बेसनलाडू

छान विरजण घातलत की मिठायांवर!

अडगळीतूनच हे सगळे येऊ शकते!!!
तापुनिया दूध , साय वर येई, गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई, जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
;) भन्नाट!!

झक्कास विडंबन! बाकी या मेव्याने, लोळण्याच्या नादात, एच्टीएमेल कोडचंही विडंबन केलेलं दिसतंय प्रतिसादात!

[श्रेयअव्हेर - मेवे] मस्त विडंबन :)

नासकवणीशी साधलेलं नातं छानच...

मस्त विडंबन __/\__ चेतन

एकदम झकास !

एकदम बेगॉन विडंबन! ;) चतुरंग