Skip to main content

माझ्या झोपेची झाली आता येळ

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/09/2010 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या झोपेची झाली आता येळ
माझ्या येथील काव्याचे हे विडंबन म्हणावे की स्वतंत्र काव्य हे तुम्हीच ठरवा. आग कारभारनी हातरून टाक, चल घाई कर माझ्या झोपेची झाली आता येळ ||धृ|| दिसभर मी राबराबतो कष्टानं दमून जातो किती आटवन तुझी मला येई कामामदी बी लक्ष लागत न्हाई दोन घटका बसावं वाटं तुझ्याजवळ माझ्या झोपेची झाली आता येळ ||१|| कधी दिवसपाळीत दिस जाई कधी रातपाळी आडवी येई हातामधी हात तुझा कधी मी घेई? त्यासाठी जीव माझा कसनुसा होई कधी खेळायचा ग पिरीतीचा आपन खेळ? माझ्या झोपेची झाली आता येळ ||२|| नको दुनीयेची चिंता आता तू करू राघू मैना आपन दोघे ठरू उगा नको नको तू म्हनू जीव टांगनीला नको आणू आता येतीस का भजनाचे वाजवू का टाळ? ||३|| - पाषाणभेद (दगडफोड्या) १५/०९/२०१०
काव्यरस

वाचने 1094
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया