मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(बाम लावला ग सखे बाम लावला)

अडगळ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जे गाणं ऐकल्यावर अर्धा किलो झंडूबाम खावून जीव द्यावा असं वाटलं , त्या गाण्यावर नृत्य करणार्‍या रबरी माकडहाडवाल्या मलैका अरोरा खान यांना सादर समर्पित : विचित्र खाज दाटली , अभद्र ही तिथी, मंदमती हात हे रिमोट शोधती, दोन प्रहरी का गं उगी टिव्ही लावला ? बाम लावला ग सखे बाम लावला. गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने, बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने, बदनामीचा जणू इव्हेंट जाहला. बाम लावला ग सखे बाम लावला. गच्चीवर बैल दिसे , हाती वारूणी, हंबरते म्हैस येथ उघडी अंगणी, सभोवार रेड्यांचा डान्स चालला बाम लावला ग सखे बाम लावला. मारूनिया फाट्यावर सारी वैद्यके, आद्यवैद्य जाहलीस तुच मदनिके, भाळीचा बाम तु नितंबी लाविला, बाम लावला ग सखे बाम लावला. गीतसागरात मुन्नीमेरु घुसळिला, आडमाप खान जणु शेष जाहला, चौदावे रत्न झंडुबाम गावला . बाम लावला ग सखे बाम लावला.

वाचने 2282 वाचनखूण प्रतिक्रिया 8

राजेश घासकडवी 11/09/2010 - 12:34
वा. डारलिंग तेरेलिये ची टिंगल करण्यासाठी खुद्द रामजन्माच्या गाण्याचा आधार. कल्पनाच आवडली.
सभोवार रेड्यांचा डान्स चालला
हे मनाला भिडलं.

अविनाशकुलकर्णी 12/09/2010 - 09:24
गौरांगी वस्त्र शोधी अधीर लोचने, बुबळातुन धूर निघे मुन्नीदर्शने, बदनामीचा जणू इव्हेंट जाहला. बाम लावला ग सखे बाम लावला. मस्त

चिंतामणी 12/09/2010 - 09:33
मिपावर आता "इनो" पाठोपाठ "बाम" येणार बहुतेक.

चिगो 12/09/2010 - 10:36
गाण्यामुळे होऊ शकणारा मनस्ताप लक्षात घेऊनच "बाम"चा उल्लेख्ख केला असेल.. झक्कास जमलीय कविता...