Skip to main content

विडंबन

शब्दान शब्द

लेखक यकु यांनी मंगळवार, 30/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
कसल्याशा संशोधनासाठी आमचा एक मित्र उत्तर ध्रुवावर मुक्काम ठोकून असतो. तिथून तो मराठी अंतर्जालावर आणि त्यातील नगांवर नजर ठेऊन असतो. अंतर्जालातील काही नगांवर आजकाल त्याची विशेष नजर आहे; कारण त्याला उत्तर ध्रुवावरून आल्यानंतर मराठीत एक वेगळेच, आगळेच म्हणतात ना तसे मसं सुरू करायचे आहे. सगळंच खुल्लम खुल्ला व्हावं असं त्याचं म्हणणं आहे. जिथे कुणीही आयसोलेटेड, कंपूनिष्ठ असणार नाही. अर्थातच त्यासाठी याच नगांची गरज आहे. मिपावरील खेळीमेळीच्या वातावरणावर त्याचे विशेष प्रेम आहे. म्हणून त्याने खाली दिलेल्या नगांचे बायोडाटे (विदागार) तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) (Nasates Ghari Tu Tevha...)

लेखक बोलघेवडा यांनी गुरुवार, 25/11/2010 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत. नसतेस घरी तू तेव्हा... नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो, गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो. दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो, हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो.
काव्यरस

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

भस्म्या

लेखक अरुण मनोहर यांनी बुधवार, 17/11/2010 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.
काव्यरस

क्रांतीकारी कुटुंब !!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 16/11/2010 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात एक क्रांतीकारी कुटुंब आहे. त्या कुटुंबाची, त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात सर्वांना माहिती व्हावी म्हणुन या लेखाचा प्रपंच. त्या कुटुंबाचे प्रमुख म्हणजे वडील यांनी अनेक कुटुंबांना पोलीओ चे महत्त्व समजावून सांगितले आहे. अनेक जाहिरातीत सुद्धा ते अधून मधून विविध वस्तूंचे महत्त्व लोकांना समजावतात. तसेच सध्या एका कार्यक्रमाद्वारे ते अनेकांना करोडो रुपये वाटत आहेत. खुप साधे सोपे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारुन विचारुन ते अनेकांना श्रीमंत बनवत आहेत. तिथे जायचा कंटाळा असेल तर घरीच बसून तुम्ही लखपती सुद्धा होवू शकता बरे का, लोकांनो! याहून पैसे मिळवणे सोपे ते कसे असू शकेल बरे? म

(भांडणं..तिचं)

लेखक बेसनलाडू यांनी शनिवार, 13/11/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंची सांज ही अशी थांबली आणि आम्हाला आमची लांबलेली (गुलाबी) सांज ही अशी आठवली - लांबलेली सांज, कातरवेळ... मनात तीच.. तशीच नेहमीसारखी ! तेच जीवघेणं मौन , तीच नजर करारी. त्या नजरेची दहशत, ते गर्भगळीत होणं...नकळत !! ते बहाणे, ती धडपड, ती धडधड... लवकर कल्टी मारण्यासाठी. मग कबुली, ते न पटणं, समजून न घेणं मी फिक्सर, ती हिटलर .... सार्‍या संध्येचा विसर ! बागेतलं भटकणं, पावसातलं भिजणं, बारमधलं रमणं, शर्टावरल्या गुलाबी खुणा.... ... .. अन् अचानक... अचानक तिचं प्रकटणं .. मग तिचं अस्तित्व, खरं, वास्तवातलं कानफटातलं, बुक्क्यांतलं ! त
काव्यरस

विड्या एक फुंकणे

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 11/11/2010 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
( विनायक पाचलग यांचा स्मृतीरंजनात्मक लेख वाचून आमच्याही काही बालपणीच्या स्मृती जागृत झाल्या) आमच्या बारावीच्या पुस्तकात एक प्रश्न होता, ''जुन्या खेळांएवजी नवीन प्रकारचे खेळ आल्याने आपली मानसिक वाढ खुंटली आहे का?'' दर परीक्षेला हा प्रश्न हमखास असायचा आणि सगळेच काही ना काही पुस्तकी उत्तरे द्यायचे याप्रश्नातुन आणि आजच्या जमान्यात दिवाळीची वा उन्हाळी सुट्टी लागली की, काय करावे, करू नये वगैरे याच प्रश्नांची उत्तरे शोधणारे अनेक लेखातुन आधुनिकता कशी वाईटच हेच सत्य शेवटी फिरून फिरून सांगितले जाते.

(पडुन आहे गात्र कुजुनि)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 11/11/2010 04:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियालीतैंच्या "भयंकर, भेसूर आणि अमानवी काव्य" या धाग्यावर केलेलं विडंबन आहे. तेव्हा दोनच कडवी लिहिली होती. आता पूर्ण काव्याचं विडंबन देतो आहे. सुरेश भट साहेबांच्या या अजरामर कलाकृतीचं हे बीभत्स विडंबन केल्याबद्दल त्यांची माफी मागतो. सिच्युएशन अशी आहे : प्रेयसीला सोडून प्रियकर एकटाच जळाला आहे.

लेले..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 05/11/2010 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
अब्द फाटलेले आभाळ रापलेले इडलीमधून वाफा उ:श्वास तापलेले. ओठांतुनी निघाला चमचा तसाच उष्टा त्या कृष्ण कुन्तलाने सांबार गाठलेले.. पार्श्वात काय माझ्या ही वेदना कळेना पंकातल्या बुटांनी नाकाड घासलेले. स्वप्नात का असेना तो मेघ प्राशलेला आयुष्य मात्र सारे श्वानास घातलेले.