Skip to main content

विडंबन

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!

प्राधिकरण कट्टा २९ मे २०१५

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 30/05/2015 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख लिहायच्या सगळ्यात आधी मुविंचे कट्ट्याच्या आयड्याच्या कल्पनेबद्दल आभार मानतो. कट्ट्याच्या निमित्ताने का होईना मिपामंडळी आपल्या व्यस्त वेळापत्रकामधुन वेळ काढुन आली. हा संपुर्ण वृत्तांत नाही. कारण मी कट्ट्याची सुरुवातीची पंधरा मिनिट आणि शेवटचे दोन-तीन महत्त्वाचे तास नव्हतो. त्यामुळे संपुर्ण वृत्तांताची जबाबदारी नाखु'न'काका आणि वल्ली धरलेणीकर ह्यांच्यावर सोपावण्यात येत आहे. मी हमालीकामामधुन जेमतेम चिंचवडपर्यंत पोचतोय नं पोचतोय तोपर्यंत नाखु'न'काकांचा फोन येउन गेला.

मॉडर्न अभंगवाणी

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 27/05/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥ पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥ संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥ फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥ महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥ ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥ किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन?
काव्यरस

बाटली आणि दारू.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 23/05/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
खर्‍या आयडीने बोलता येईना मनातले गरळ ओकता येईना... डुआयडीने आता सगळे.... "स्कोअर सेटल" करू.....!! उपद्र्व हा अनंत काळचा... मिपाबरोबर कायम रहायचा... घरात चारच माणसे आणि... दारात चारशे चपला सारू..... नव्या आयडीच्या बाटलीत भरली शिळ्या विचारांची जुनीच दारु.... त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही... मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !! आडून आडून सगळे करिती हल्ला... भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला.... एकटा दुकटा कोणी लागता हाती.... चला त्याला आडवे करू !!

मुठठा माई (विडंबन)

लेखक गरजू पाटिल. यांनी शुक्रवार, 22/05/2015 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गंध वाहते दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. कुणी टाकि तित कचरा आता, कुणी टाकिती पूज्यदेवता. पाषाणाची पाहूनी ह्रुदये, पाहूनी ह्रुदये, मोजित दिन राहीली. दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. सतत वाहते गढुळ पाणी, कुणी नं धजतो उचलन्या घाणी. आळ्शांस ही व्हावी कैसी मुठठा ही फलदायी ? दुर्गंध वाहते मुठठा माई तीरवरल्या कोणालाही, पर्वा तीचि नाही. माडगुळकरांची माफी मागून बरका, त्यांच्या 'गीताची' छेड काढतोय........ (संथ वाहते कृष्णामाई) दुर्गंध मानुन घ्या.........

('मी' ची कहाणी )

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 21/05/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
हे चित्र म्हणजे 'मी' च्या कहाणीचे महत्वाचे वळण आहे. माझा अभिप्राय ह्या कवितेची कहाणी वाचून एका मैत्रिणीने ह्या 'मी' कले विषयी विचारले. मी या प्रकारे बनवलेल्या मी आर्टिफॅक्ट्स ची लाइन लाँच करणार आहे हे बर्‍याच मित्रमैत्रिणींना माहिती होतं पण कधी याची मलाही कल्पना नव्हती. त्यामुळे अर्थातच आर्टिफॅक्ट्स लाइनचे नाव काय ठेवायचे वगैरेही ठरलेले नव्हते.

कुणी जाल का

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 20/05/2015 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षापूर्वीचे गोष्ट आहे त्यावेळेला डीजीटल कॅमेरे नुकतेच आले होते. काढलेला फोटो लगेच दिसणे ह्या गोष्टीचे फार अप्रूप होते. त्यावेळेला पर्यटन स्थळी डिजीटल कॅमेरा गळ्यात घालून फिरणे हे प्रतिष्ठेचे लक्षण होते. मी काही कामानिमित्त गोव्याला गेलो होतो, एकटाच होतो. काम झाल्यावर पणजी जवळील मिरामार बीचवर बसलो होतो. सुरेख संध्याकाळ होती, सूर्य मावळत होता, तो तांबडा रंग पाण्यावर दिसत होता. गार हवा सुटली होती. अशा रम्य संध्याकाळी, अशा रम्य ठिकाणी एक नुकतेच लग्न झालेले जोडपे आले होते. हनीमुनला आले असावे. त्या बुवाला कदाचित तिचा पावलांपर्यंत पाणी असलेला फोटो घ्यायचा होता परंतु समुद्र मस्तीत होता.
काव्यरस

न न न कविता

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 16/05/2015 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
त ते तुक क के कुक शिळी भाकर ......... कांव कांव कांव गायनाचार्य बुर्ज्वा कोकिळा ....... इवलासा मी गिळतो आकाश ढेन्चू ढेन्चू ..... ..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?
काव्यरस

खातेस घरी तू जेव्हा - (विडंबन)

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 15/05/2015 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल- नसतेस घरी तू जेव्हा-) खातेस घरी तू जेव्हा जीव घाबराघुबरा होतो उरण्याचे होती वांधे पोटात गोळा का येतो .. डिश फुटून खाली पडावी का तोल मना बिघडवतो तोबरा मनी हीन वाटे अन खंत वाटता रडतो .. येतात पाहुणे घराशी धुसफुसून सरती मागे चिडकीशी गाठच आता तव फंडा आठवत जातो .. तव हालचाली बोकण्याच्या मज डसती हजार वेळा जीव जाई तरी हादडावे मी बघ्याच नुसता उरतो .. तू लांब राहशिल काय सोडूनच या घरदारा सगळ्यांचा जीव भकास माझ्यासह उपास घडतो .. ना अजून झालो तगडा का दुष्काळातुनी आलो तुज पाहुन समजत जाते खाण्यास जन्म हा घडतो ! ,
काव्यरस

विश्वास वासावरचा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 06/05/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
आमची पेरणा अर्थात शब्दानुज यांची क्षमा मागुन.... रोज पुन्हापुन्हा तो ढुसक्या सोडतो समोरचा नाईलाजाने नाकावर हात दाबतो हजारो वर्षांपासुन तो त्या सोडतो आणि दिवसभर पोट दाबून कळा सोसतो खरेतर प्रत्येकाच्या शरीरातून ती बाहेर पडत असते पण काहिंचे अस्तित्व नुसत्या वासावरुन ओळखता येते पवनाच्या रुपातुन तो बाहेर पडतो पोटाबरचे प्रेशर थोडेसे हलके करुन जातो प्रत्येक श्वासातुन तो नाकात घुसू पहातो श्वासाशिवाय थोड्या वेळानंतर जीव घुसमटतो काहीजण उगाचच लाजुन कायमचुर्ण घेतात वासहिन श्वासाची कामना करतात तो आला की चहुकडे वास दरवळात राहतो सेंटच्या