Skip to main content

विडंबन

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

"बुवा....."

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 28/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674 गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :) गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालाव

सोने की चिड़ियां

लेखक संदीप डांगे यांनी सोमवार, 25/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
हे गाणं माझं खूप म्हणजे खूप फेवरेट आहे. जेव्हा जेव्हा हे कानावर पडतं तेव्हा स्वर्गात विहरत असल्यासारखे वाटते. लहानपणी २६ जानेवारीला युनिफॉर्ममधे शाळेत ध्वजारोहणाला सकाळी सकाळी जायचो तेव्हा हे गाणं कुठे न कुठे चालू असायचं. तेव्हा मन देशाभिमानानी भरून यायचं. आपल्या मनात ही भावना येते याचंच अप्रूप वाटायचं. आपण अशा एका देशाचे नागरिक, वंशज, मालक आहोत ही भावना भारावून टाकायची. कालांतराने सँटाक्लॉसला सत्य मानणार्‍या लहान मुलाचे वय वाढल्यावर जेव्हा त्याला खरे समजते आणि त्याचे जे होते ते माझं झालंय बहुधा असं वाटतं. तरीही हे गाणं अजूनही गारूड करतंच.

तेच ते

लेखक मित्रहो यांनी बुधवार, 20/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
मागे सीट हे विडंबन लिहिले होते. रुढार्थाने हे विडंबन असले तरी विडंबन म्हणावे तसे नाही. आपण सुडंबन म्हणू या. ही कविता पण त्याच प्रकारातली. आयुष्याच्या उतार वयात एकटे पडलेल्या आजोबांचे दुःख. (माझे आवडते कवी विंदा करंदीकर आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते !!
काव्यरस

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

पर्सनल कूकिंग ब्लॉग

लेखक रुपी यांनी बुधवार, 13/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठून शीतकपाटातील भाज्यांकडे 'आज काय गिळावं' असा विचार करत तुम्ही बराच वेळ उभे राहिले आहात? काही गोष्टी बाहेर काढून न आवडल्याने ३-४ वेळा बदलाबदली केली आहे? मी असं बऱ्याच वेळा केलं आहे. माझ्या मते तुमच्या पैकी बऱ्याच जणांना हा अनुभव आला असणार आहे. पर्सनल कूकिंग ब्लॉग काय असतो? लोक स्वयंपाकप्रयोगांचे फोटो ब्लॉगवर पोस्ट करून त्या पाककृती कुणाला खपवल्या आहेत ह्याची माहिती पुरवतात, ही माहिती मग इतर चौकस मंडळी वापरू शकतात.

'मी' च !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 09/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
कविवर्य विंदा करंदीकर यांची क्षमा मागून त्यांच्या ' मी ' या कवितेचे विडंबन .. मी'च ! कधी येत अस्वस्थता अंतरीची कधी वाढता वाढता व्योम व्यापी कधी धावतो बार गाठावयाला कधी मद्य प्याला स्वहस्तेच चापी कधी याचितो रम कधी स्वप्नी व्हिस्की कधी धावतो जीन टाकून थोडी कधी प्राशितो जॅक डॅनियल भारी कधी गावठी हातभट्टीच मागे कधी दिनवाणा 'निरा'मय होई कधी क्षुब्ध, आतुर , आत्मविलासी कधी गर्जतो वोडकेच्या बळाने; कधी कापतो बोलता पालकांशी ! कधी चाखणा रिक्त थाळ्यांत शोधी; कधी पाहतो शुभ्र लवणात सारे; कधी मोजीतो टेबलाला स्वहस्ते अनुकूल होती मित्र-दोस्त सारे सरेना अंधकार डोळ्यासमोरी मिळेना अंत्यपुच्छ धुम्रपट्टीकेचे;
काव्यरस

तुझ्या कळा माझ्या कळा

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 07/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
(हास्पीटलातल्या दोन पेशण्टा चा स.न्वाद/ मनोगत ) तुझ्या कळा माझ्या कळा गुंफू कळान्च्या माळा ताई (सिस्टर ना ती) आणखि कोणाला मज रे दादा (वॉर्डबॉय) नाठाळा तु़ज बी पी (ब्लड प्रेशर) मज अ‍ॅलर्जी आणिक डायबीटीस दोघाना वेध लागले घरच्याना 'निरोप' मिळेल का आम्हाला तुजे ई सी जी माझे सी ई टी रीपोर्ट येइल कधी नॉर्मला नाहीच आला तर घोटाळा सान्गा तिकडच्या आर एम ओ ला तुला ग्लुको़ज डीस्परीन मला बॉटल नळ्यान्चा वेटोळा आणिक रेचक दोघाना नाही चालला तर एनीमा आला इथे खुप कण्टाळा लेकी-मूले नेतील का घरा दीस अखेरचे काढायला नातवान्बरोबर खेळायला (चु भू द्या घ्या ) मूळ गाणे "तुझ्या गळां, माझ्या गळां गुंफू मोत्यांच्
काव्यरस

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 05/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ... झाडांच्या सावलीत राणीच्या बागेत ने-चर वॉक श्रवणोत्सुक नेत्र वेगळ्या कोनातून मनोरा पाहणारे Appreciation टॉक चिंचेची अन चिनाराची झाडे कुट-कुटली, पुर्व-पश्चिम दक्षीण-उत्तर, गाभुळलेले, हिरवे चढ उतार झेलत हळूवार-मौन कधी जोरदार वाहत्या वार्‍यासंगे बोलके तुषार वळणे डौलदार नजाकत लवलव गवताची पाती झुलता झंकार फुलपाखरे किती चमकदार पक्षीगाती मंजुळ मनाचे तराणे कळ्या फुलतात हळूवार प्रतिक्षा त्या खास किटकांची फुलांचे परागीभवन फळांच्या आशा कधी निराशा

पुढाऱ्याचे प्रेम

लेखक सप्तरंगी यांनी सोमवार, 04/01/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम या थिम वर एक गद्य-पद्य लिहायचे होते त्यात मी ' पुढाऱ्याचे प्रेम ' वर लिहायचे ठरवले.