Skip to main content

विडंबन

(शिकरण)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 13/10/2009 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणसरांचं 'व्याकरण' एकदमच जबरी निघालं आणि मग त्याचं शिकरण करायची जबाबदारी जर माहिती असून घेतली नसती तर ती विडंबनपंथाशी प्रतारणा झाली असती, म्हणून मग.... तू सांगितलंस म्हणून नात्यांचं शिकरण समजून घेताना संबंधांचा कुस्करा शोधू लागले तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’सासू, नणंद, दीर आणि जावेच्या या खेळात पडतेसच कशाला? नातं दोघांसाठी असतं, अन् शिकरण नातेवाईकांसाठी. "नवर्‍याची जात एकच - कामचुकार हीच" लग्न ठरवण्याची वेळ आली तेव्हाचे हे शब्द ऐकून गपगार झाले कारण त्या लग्नात नातं दोघांचं होतं पण माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या अवकाळी स्वयंपाकघरात मी ब
काव्यरस

(ढोस)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 12/10/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा ही चुचुताईंची कविता खूप खूप बेवडे जमले दर्दी तंगडी ओरपाया प्रगटले भाई रिगलची बाटली मित्रांसी द्याया चपला उडवूनी आतमधे येई चपला वाजती बाहेर भेसूर भितीने 'ती'च्या वेडा मी होई साथही दोस्तंची कशी नाही आज नशाही नाही चढलेली किंचीत बाथरुमात उभा उगाच एकाकी पडत बाहेर जरी चढलेली नाही आला नाही हा माजुरडा टार्‍या टाकूनतर कुठे गटारला नाही? अंधार्‍या रात्री हातात सिग्रेट वेळ बायकोची चुकलीका नाही? घरी बायको अवचित आली पिऊन नाही चढे मना बोच राही
काव्यरस

(खाज)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी सोमवार, 12/10/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्‍याचे बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'
काव्यरस

पुरुषप्रधान मालिका : थूंकू

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 09/10/2009 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्‍या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्‍या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते.

(टोळभैरवी)

लेखक चेतन यांनी बुधवार, 07/10/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुंदर 'भैरवी' वाचुन आणी चतुरंगांची (भैरवी) पाहुन म्हणलं आपण पण भैरवी ऐकवावी ;) ह. घे. एक एक शब्द जोड, भावनांचा मेळ नाही शब्दबंबाळ फार्स हा, यमकाचा खेळ नाही विसर टोमणे सारे, पाड लेखनेही मोठी, कोण कसे बोलते हे, ऐकण्याला वेळ नाही तुझे ढापलेले सारे, लेख इथे सिध्द झाले वेड घेउन पेडगावला जाण्याचे काम नाही सर्कीटांनी लेखकाशी उभे दावे मांडलेले अस्त्र विरजणाचे हे, थांबण्याचे नाव नाही मार खाणार आता, सावरुन घे स्वतःला तिखटावाचून काही, मिसळीची चव नाही
काव्यरस

(भैरवी)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/10/2009 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
फारा दिवसानी थोडा निवांतपणा मिळाला आणि समोर क्रांतीताईंची सुरेख 'भैरवी' दिसली, मग काय विचारावे?!..;) एक एक बोट जाड, चाखण्याची वेळ नाही 'भरती'चा प्रवास हा, थांबण्याची वेळ नाही आली पहा भजी गोल, घाल पुरणास पोटी, 'कट' कसा चुकला हे सांगण्याची वेळ नाही मनी असलेले सारे बेत इथे सिद्ध झाले, वेड्या मना, तुझी काजू 'सांडण्याची' वेळ नाही वारुणीचे टेबलाशी उभे ग्लास मांडलेले, रात्र चाखण्याची आहे, झिंगण्याची वेळ नाही 'बेड'पेच दिसे आता, आवरून घे सुरेला, घोरण्यावाचून काही 'रंग'ण्याची वेळ नाही! चतुरंग
काव्यरस

(टुर्र)

लेखक लंबूटांग यांनी गुरुवार, 01/10/2009 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले.
काव्यरस

अताशा असे हे मला काय होते

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 30/09/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप-सलिलच्या चाहत्यांची क्षमा मागून) अताशा असे हे मला काय होते. कुण्या बारचे मद्य ओठात येते. कसा पाहता पाहता तर्र होतो. नशा केवढी 'एक' पेगात येते. कधी वीट येतो तुझ्या श्रावणाचा. कसा तांबडा रंग हो लोचनांचा. नको ड्राय डे रोज यावी गटारी, असा योग यावा सुरा प्राशण्याचा. असा ऐकु येतो सायरनचा इशारा.
काव्यरस

(आता नाही ...! )

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 21/09/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
आमची जाज्ज्वल्य प्रेरणा स्वैराचाराचा जुना आड आता नाही अन कवितांचे तसे लाड पण आता नाही ! लिहिला मी असा काथ्याकुट पुन्हा कंपुबाजीच्या भुता 'झाड' आता नाही ! चांदण्यांची खरी जाहली मज सोबत पण प्रतिसादांचा पहाड आता नाही ! संपाकदांचा मला लाभला आधार नि... टवाळखोरीची तशी धाड आता नाही ! झेलले घाव सारे सदा टीकांचे पण नव्याने कविताप्रसव चाड.... आता नाही ! चु.भु.दे.घे. (कविता न समजल्यास प्रेषक जबाबदार नाही. ;) ) आपला मराठमोळा, विडंबन क्लब प्रा. लि.
काव्यरस