आमची जाज्ज्वल्य प्रेरणा
स्वैराचाराचा जुना आड आता नाही
अन कवितांचे तसे लाड पण आता नाही !
लिहिला मी असा काथ्याकुट पुन्हा
कंपुबाजीच्या भुता 'झाड' आता नाही !
चांदण्यांची खरी जाहली मज सोबत
पण प्रतिसादांचा पहाड आता नाही !
संपाकदांचा मला लाभला आधार नि...
टवाळखोरीची तशी धाड आता नाही !
झेलले घाव सारे सदा टीकांचे
पण नव्याने कविताप्रसव चाड.... आता नाही !
चु.भु.दे.घे. (कविता न समजल्यास प्रेषक जबाबदार नाही. ;) )
आपला मराठमोळा,
विडंबन क्लब प्रा. लि.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2664
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांदण्यां
सहमत !
In reply to चांदण्यां by अवलिया
वा...
खल्लास!
विडंबन
हीहाहाह्।
चांगलय
सू हा स...