Skip to main content

विडंबन

[घोडा]

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 20/11/2009 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
भाई भी बन गया भावूक आणि उसको लग्या की कविता लिखे. नेहमी प्रमाणे मुळ कवियित्रीची माफी मागून- हरेक बंदेको मैने थमा दिया घोडा तब्बीच महेसूस किया मैने चैन थोडा फिल्लीममे देका होयंगाच तुमने ऐसा झमेला बचपनसे मैने छोडा घर सीदा आया मुंबैला न थी पैरोमे चप्पल, जेबभी था फटेला गल्लीके भाईने मेरेकू बुलाया तभी मैने भी सोचा नही एक मिनटभी भाई बोला, "आजसे तेरा नाम हतौडी!" भाईने बहोत मारा, वैसाच जीना भी सिकाया बडा हुवा जैसे, सुपारी लेके लोगोंको टपकाया पताही न चला मै सैतान कब बन गया क्यों मुझे मेरा रास्ता यहातक लाया? न मैने सोचा था, अपनेआप हो गया न कोई मंजिल थी, फिर भी चलता गया!
काव्यरस

शनिवारचा उतारा: ((संभवित) तह)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 20/11/2009 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
तर आमचा हा संभवितपणा (आमचा यावर अजिबात जीव नाही!) व्यक्त करण्यासाठी आम्ही या कुबड्या वापरल्या. लेखणी दाबून आपुली खरडी उडवत जाऊया, विचार दाबूनी लेखन 'तिकडे' आपण पाडीत जाऊया॥ सोडूनी मूळ स्वभाव आणिक परीटघडीचे लिहूया, एकच मुद्दा अनेक लेख प्रतिसादे वरती काढूया॥ कवितांगण सोडून आता फॉक्स न्यूज वाचूया दिसेल त्याला सहमती देवोनी इनो थोडे चाखूया॥ शांत राहूनी अंमळ थोडे नवे मार्ग शोधूया, हिंसा-शस्त्रे नाय कामाची उपहास थोडा लिहू या॥ थकलो तरी प्रयत्न व्यर्थ उपडा घडा पाहू या, मौजेस मित्रा अंत ना रे, सदर आपण चालवू या॥
काव्यरस

कोडी-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 19/11/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तिताईंची सुरेख कविता कोडी ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी साधे, सरळ कधी ही जमते न बोलण्याला उद्धार खानदानी तोंडी नि लावण्याला भाष्या सदैव असते तोंडात शालजोडी बोलून संकटाला आमंत्रणे कशाला चिखलात दगड आधी अन् मारणे कशाला मग बोलता अता का "पळण्या भुईच थोडी!" उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते? घालू नका अम्हाला असली भिकार कोडी! "केश्या" मुळात तू

(कोडी)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 19/11/2009 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची कविता वाचुन आम्ही काही कोडि सोडवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक याचकाला केली बहाल थाळी नाहीच जाणले की स्वकीये राहिली भुकेली साधे गरीब भय्ये नव्हतेच त्या दिशेला आधार बिहार्‍यांचा माजोरड्या भिकेला तोंडात तोबरा अन् उध्दट देहबोली एकेक संकटाला आमंत्रणे दिली मी मुंबई-मराठीचीही वाट लावली मी नाही एकत्र मराठी, तू घे भाजुन पोळी" मौनात राहण्याने नुकसान फार केले जाणून आपल्यांनी पाठीत वार केले भाषा असुन मराठी, का हिंदी माय बोली या हिंदीप्रेमी लोकांचा स्वार्थ फक्त होता जाता जिथे, तिथे का भांडुन मार खाता ते वाढवीत गेले, नेत्यात तेढ खाली!
काव्यरस

[फसवे जग]

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 17/11/2009 20:03 या दिवशी प्रकाशित केले.
फ्राक्चर बंड्याची माफी मागून..ह्या काव्याचे हे स्वैर विडंबन... बंड्या का हवाय तुला पुन्हा खोडरबर.. मागील वेळी हेच कारण सांगुनी नेले ते संपले कसे, लवकर नाही बंडा, मीच तो तुला पुरता ओळखणारा.. का हवाय तुला पुन्हा तोच कॅनवास, त्याच रंगाचा पुन्हा तसाच कोरा अन शुभ्र (!?) एकही रंग नसलेला , काय हवे आहे तुला ( ते नीट न कळलेला), कॅनवासवर ओरखडा नसलेला (!?)) पुन्हा तेच तेच मागतंय बिचारं.. रंग अन कुंचला का नवा हवा.. नव्या चित्राला जुनेही चालतेच.. बंड्या तुला का हवाय नवा कोरा आरसा अगदी नवा... (हो रे बाबा) कुणीच, कधीच (हे मात्र खूपच) कशाला स्वतला तुला न्याहाळाय

[प्यावेसे वाटते]

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 17/11/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीतैची माफि मागून- ह्या काव्याचे हे एक स्वैर विडंबन- आज मला सगळे ते हवे-हवेसे वाटते कासवालाही जलद जाणे हवेसे वाटते रिचवले पेले फुल्ल भरुन हे असले एव्हढाले अग बाई, हे काय, हे तर आजच आले वाटते? खोटंच हसत म्हणालो, "धुंदीत मजा असते" पण मीच घेते, का तुला घेणे नकोसे वाटते? सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला, सारखे झिंगणे तुझ्या सारखे नकोसे वाटते!" आण काही तू नवे आता, बाटल्या नको त्या जुन्या तेच-तेच शेंगदाणे नि मांचोरीयन नकोसे वाटते थंडीत घेतात का ती ब्रॅंडी भरपुर व सारखी? औषध जरी असले तरी एकटे पिणे नकोसे वाटते!
काव्यरस

शनिवारचा उतारा - खात्री

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 14/11/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्‍याची ही प्रेरणा . . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?" सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते +१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते! . लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते शेवटास येत
काव्यरस

यांच असं का होतं ते कळतं नाही ... विचारवंताना समर्पित !

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 13/11/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : त्या दिवशीच्या विधानसभेतल्या अभुतपुर्व प्रसंगानंतर संकेतस्थळांवर "विचारवंतांच" एकदम पेव फुटलं.
काव्यरस

दाउद २

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:39 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा येशील कधी परतून? बोम्बस्फोट खटल्यात 'माफीचा' साक्षीदार म्हणून भ्रष्ट-ढेरी राजकारण्यान्च्या नाकावर टिच्चून शरदाच्या त्या राजकिय अन अभयाला आठवून मुम्बापुरीतिल तव वास्तुन्चा वारसदार म्हणून मुन्डेच्या त्या घोषणेची अन मुन्डी मुरगाळून दाउदा येशील कधी परतून?

दाउद १

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी बुधवार, 11/11/2009 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
दाउदा दाउदा भागलास का? दुबईच्या बेटावर लपलास का? दुबईच्या बेटावर 'कर'बन्दी तुझा तो वाडा चिरेबन्दी