व्याकरण

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जे न देखे रवी...
11 Oct 2009 - 12:25 pm

तू सांगितलंस म्हणून
नात्यांचं व्याकरण समजून घेताना
संबंधांच्या जाती लिहू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’नाम, सर्वनाम, विशेषण आणि अव्ययाच्या
या खेळात पडतेसच कशाला?
नातं दोघांसाठी असतं,
अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी.
नात्याची जात एकच - नातं हीच"
प्राधान्य ठरवण्याची वेळ आली
तेव्हा हेच शब्द तुझा आधार ठरले
कारण त्या प्राधान्यात नातं दोघांचंच होतं
माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या अवकाळी पावसात
आपण सावरलो होतो
पुन्हा अवकाळी पाऊस आलाय...
आता आवरून घ्यायचं आहे
वाहून गेलेली स्वप्नं विसरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच
मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त
एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!
या दुःखाची जात मात्र
आता मला शोधायची आहे
नात्यांच्या जातीच्या तुझ्या व्याख्येत
ती कुठं बसेल?

रचनाकाल: केव्हातरी, २००७

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Oct 2009 - 12:32 pm | अवलिया

!

प्रभो's picture

11 Oct 2009 - 12:41 pm | प्रभो

पावसात भिजण्याचं एक स्वप्न त्यातलंच!
तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच
मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त

आवडलं....बाकी कवितेतलं काही कळत नाही म्हणून लहान तोंडी मोठा घास घेणार नाही..
--प्रभो

नंदन's picture

11 Oct 2009 - 12:47 pm | नंदन

उभयान्वयी कविता आवडली. 'सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो, प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम न दो'ची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चित्रा's picture

12 Oct 2009 - 8:50 am | चित्रा

'सिर्फ एहसास है ये रुहसे महसूस करो, प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम न दो'

याच ओळींची आठवण झाली.

सुनील's picture

12 Oct 2009 - 11:18 am | सुनील

अजून एक गाणे आठवले -

पथ जात धर्म किंवा नातेही ज्यां न ठावे
ते जाणतात एक, प्रेमास प्रेम द्यावे
हृदयात जागणार्‍या अति गूढ संभ्रमांचे
तुटतील ना कधीही, हे बंध रेशमाचे

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

11 Oct 2009 - 12:52 pm | दशानन

:)

छान..

व्याकरणाचे व माझे का वाकडं आहे हे कविता वाचून पुन्हा समजले.... आम्ही वस्तूंना भेटतो व माणसांना सापडतो हा आमचा व्याकरण हत्या प्रयोग ;)

सहज's picture

11 Oct 2009 - 1:20 pm | सहज

व्याकरण पहिल्यापासुन तसं नावडतचं

:-)

निखिल देशपांडे's picture

11 Oct 2009 - 1:52 pm | निखिल देशपांडे

व्याकरण पहिल्यापासुन तसं नावडतचं

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

क्रान्ति's picture

11 Oct 2009 - 2:19 pm | क्रान्ति

नातं दोघांसाठी असतं,
अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी.
नात्याची जात एकच - नातं हीच"

वा! शेवटच्या ओळीही मनात घर करणार्‍या! खूप आवडली कविता. नंदनच्या प्रतिसादातलंच गाणं आठवलं,
"हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो!"
क्रान्ति
अग्निसखा

सुबक ठेंगणी's picture

12 Oct 2009 - 10:55 am | सुबक ठेंगणी

सुरेख कविता!

"नातं दोघांसाठी असतं,
अन् व्याकरण नातं जोखणाऱ्यांसाठी.
नात्याची जात एकच - नातं हीच"

अवांतर: नाती व्याकरणात बसवता येत नाहीत पण व्याकरणात असतात तशा fuzzy boundaries मात्र नात्यातही असतातच!

मनीषा's picture

11 Oct 2009 - 4:41 pm | मनीषा

खरच नात्याचं व्याकरण नसतच ..
नात असतं किंवा नसतं ..
सुंरेख कविता ..

विसोबा खेचर's picture

11 Oct 2009 - 11:35 pm | विसोबा खेचर

अरे श्रावण, तू कविता केव्हापासनं करायला लागलास? त्याही इतक्या छान?!

तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच
मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त
एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!

वा! क्या बात है...

तात्या.

धनंजय's picture

12 Oct 2009 - 5:08 am | धनंजय

नात्याची जात नातं हीच, आणि दु:खाची जात दु:ख हीच!

(नंदन यांचा कवितेबद्दल शब्द "उभयान्वयी" आवडला.)

दोन कडव्यात भावना कमालीची बदलून टाकणारी कविता आहे.

फ्रॅक्चर बंड्या's picture

12 Oct 2009 - 10:22 am | फ्रॅक्चर बंड्या

फारच छान

बेसनलाडू's picture

12 Oct 2009 - 10:37 am | बेसनलाडू

ओळन् ओळ आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2009 - 11:04 am | प्रकाश घाटपांडे

गेल्या अवकाळी पावसात
आपण घसरलो होतो
पुन्हा अवकाळी पाऊस आलाय...
आता सावरून घ्यायचं आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुनील's picture

12 Oct 2009 - 11:12 am | सुनील

गेल्या अवकाळी पावसात
आपण सावरलो होतो
पुन्हा अवकाळी पाऊस आलाय...
आता आवरून घ्यायचं आहे

नात्यांत घडलेला हा फरक सुरेख रीतीने दाखवला आहे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

12 Oct 2009 - 11:16 am | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ ! अदुगर घसरायला व्हतय तवा कुठ मंग सावरतय
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

यशोधरा's picture

12 Oct 2009 - 11:17 am | यशोधरा

उत्तम कविता.

सूहास's picture

12 Oct 2009 - 6:14 pm | सूहास (not verified)

@) ...काय मोडक आणी कविता..ऑफिसातल्या खिडकीतुन सुर्य पण दिसेना ..एक मिनिट हां...आई ग!! (काही नाही चिमटा काढुन पाहिला.)

तू भिजला असशील! मनसोक्त, नेहमीसारखाच
मीही भिजले!! वेदनेच्या वर्षावात, मनसोक्त
एकाकी प्रवासाची हुरहूर छातीत साठवून घेत!>>>

खल्लास..शब्दच संपले..

शेवटी कविता रुखरुख लावुन गेली..

मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..

सू हा स...

लवंगी's picture

12 Oct 2009 - 9:06 pm | लवंगी

मस्त मस्त मस्त कविता..

चतुरंग's picture

13 Oct 2009 - 1:12 am | चतुरंग

आमची खरीखुरी दाद इथे आहे! ;)

(अवकाळी भिजलेला)चतुरंग

श्रावण मोडक's picture

13 Oct 2009 - 4:17 pm | श्रावण मोडक

सर्वांचेच मनःपूर्वक आभार.

स्वाती२'s picture

13 Oct 2009 - 8:00 pm | स्वाती२

सुरेख!