अबू आझमीची लावणी..!
(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून)
(कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत)
मनसेच्या कदमांनी,
आणि शिशिर शिंद्यांनी,
कानाखाली आवाज ऐसा काढीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
पर्वा केली नाही मी विनंतीची,
मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची
धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात.
चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात.
नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला...
हात नका लावू माझ्या दाढीला...
मने जिकली मराठी माणसाची,
मती गुंग झाली सेना भाजपाची...
काव्यरस
मिसळपाव