Skip to main content

विडंबन

आयटीवर बोलू काही..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/10/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप - सलिल आणि त्यांच्या तमाम चाहत्यांची क्षमा मागून) जरा मजेने, जरा खरोखर बोलू काही चला दोस्तहो, या आयटीवर बोलू काही उगाच गाजर ऑनसाईटचे दाखवित रहा तू गळले नाही प्रोजेक्ट तोवर बोलू काही पी एम. पाहून चॅटींगवर कुजबुजली पोरे पाठ फिरू दे त्याची नंतर बोलू काही हवेहवेसे फ्लर्ट तुला जर हवेच आहे स्मार्ट देखण्या ट्रेनीबरोबर बोलू काही किती काळजी अप्रेजलची बघ रांगेतुन एप्रिल नाही तर ऑक्टोबर बोलू काही स्किल्स असू दे सीवीमध्ये काठी म्हणुनी रिसेशनचा प्रवास खडतर बोलू काही मूळ गीत - आयुष्यावर बोलू काही कवी - संदीप खरे
काव्यरस

'खोका' वदून गेल्या, आता नडेन म्हणतो

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी मंगळवार, 20/10/2009 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी नंतर आलेल्या विडंबनाच्या बहरात आमचेही एक कण्हेरीचे फूल. प्रेरणा: रंगाकाकांनी पाडलेले हे विडंबन . बाकी मात्रा-बित्रा नियमाप्रमाणे आधीच फाट्यावर मारल्याने त्यात सदर काव्य बसणार नाही याची काळजी घेतलेली आहे.
काव्यरस

आता काही लिहीन म्हणतो.

लेखक उग्रसेन यांनी मंगळवार, 20/10/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
[मास्तर चतुरंग यांची प्रेरणा आणि मुळ लेखकाची क्षमा मागून] वाचन खूप झाले, आता लिहीन म्हणतो. आडून प्रतिसादाच्या गंभीर लिहीन म्हणतो पेन खिशातला हा मी काढणार आहे जे जे दिसेल ते ते सारे लिहीन म्हणतो. बरेच प्रतिसाद आहे मी उधळलेले या जागी आहेत विचार डोक्यात जे इथे लिहीन म्हणतो दिवाळी अंकातून मी निर्दोष आज सुटलो ? (लेख लिहिण्याचा कोणीच आग्रह केला नाही :( ) शब्द शब्द जमा करुन काही लिहीन म्हणतो सारेच सिद्धहस्त लेखक, ना साधा इथे कोणी नसलो मोठा तरिही आता लिहीन म्हणतो. ती टीका नव्हती सदस्य

'काका' वदून गेल्या, आता बघेन म्हणतो

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 20/10/2009 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर दिवाळी फराळ चालू असताना ही खमंग भाजणी हाती लागली लगोलग थालीपीठ लावून टाकले!
काव्यरस

दिल्लीची रखुमाई......सोनिया.....माझी माऊली.....

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 19/10/2009 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल एक स्पष्टीकरण.... प्रथम माझ्या मिपाच्या वाचकांना, लेखकांना, प्रशासकांना, (आणि अवांतर मिपाकरांना) दिवाळीच्या शुभेच्छा! आणि काकांच्या लाडक्या तात्याला तर खास दिवाळीनिमित्त गोड गोड पापा!!!! :) आम्ही हे लिहित आहो हे याचं कारण आमचा सटकलेला मेंदू आणि दिवाळीच्या सुट्टी यामुळे हाताशी असलेला वेळ.... सोनिया विषयी आम्हाला खास पुळका आहे अशातला भाग नाही. आम्ही कॉन्ग्रेस किंवा भाजप पार्टीचे नाही, किंबहुना अंमळ भांडवलशाहीच आहोत!!!! उद्या सोनियाचं आमच्या दृष्टीने चुकलं तर तसंच लिहिणार.

<प्रवास>

लेखक सहज यांनी गुरुवार, 15/10/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थात कविवर्य मोडक यांचा प्रवास पळवाट म्हणाली, "आलास का! अडाणी आहेसच ठाउक नाही उत्तर तुला. प्रश्नही समजलेला नसतोच, ते येतात तेव्हा आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू होतो, मुळमार्गाकडं दुर्लक्ष होतं..." मूळप्रश्नाच भान राखणं हे तर उमगण, अन्यथा सारेच प्रतिसादी महाधूर्त! "महाधूर्तांच" बरं असतं, वारा बदलतो तसे तेही पण तुझ तसं नसतं म्हणून मी इथेच असते. अडाणीपणा करताना पाय फसतील म्हणून सांगतेय..." लिहताना केव्हा तरी भान सुटलं, वाचा भरकटली आता उपायाखाली केवळ माती अन भीतीच आहे मी पळतोच आहे... 'नाना फडणीसाचा पाय' दागिना मिरवत!
काव्यरस

(विरजण)

लेखक मिसळभोक्ता यांनी मंगळवार, 13/10/2009 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: सांगायलाच हवी काय?) तू बोलावलंस म्हणून प्रतिसादांच्या दूधदुभत्याने प्रसन्न जाऊन लेखांमागून लेख पाडू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालास, ‘’क्या बात है, +१, असेच म्हणतो या खेळात पडतोसच कशाला? दूधदुभतं स्वतःसाठी असतं, अन् विरजण मिसळ्भोक्त्यांसाठी. तात्याची जात एकच - (म्हातार्‍याचा) नातू हीच" ताक पिण्याची वेळ आली तेव्हा हेच विरजण तुझा आधार ठरले कारण त्या मडक्यात दही तयारच होतं लेखनाचा उत्साहच काढून घेणारं! *** गेल्या त्या काळी मनोगतावर आपण वावरलो होतो आता ह्या काळी मिपा झालंय... आता आवरून घ्यायचं आहे रद्द केलेले सदस्यत्त्व विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण मालकाला शिव्या देण्याचं एक
काव्यरस

(प्रकरण)

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 13/10/2009 01:57 या दिवशी प्रकाशित केले.
तू सांगितलंस म्हणून मेकॅनिक्स् चं प्रकरण समजून घेताना फोर्सेसचे कम्पोनन्ट्स् लिहू लागलो तेव्हा... तेव्हा म्हणालीस, एफ् साइन् थिटा, एफ् कॉस् थिटाच्या या प्रकरणात पडतोसच कशाला? 'प्रकरण' दोघांसाठी असतं, अन् मेकॅनिक्स् फक्त मार्क मिळविण्यासाठी प्रकरणाची जात एकच - लफडं हीच लफडं करण्याची वेळ आली तेव्हा हेच शब्द माझ्यावर आघात ठरले कारण तुझ्या प्रकरणात नाव भलत्याचंच होतं माझा आधारच काढून घेणारं! *** गेल्या वार्षिक परीक्षेत मी बोंबललो होतो पुन्हा वार्षिक परीक्षा आलीय... आता पास व्हायचंच आहे मागे खाल्लेली गटांगळी विसरण्याचा खटाटोप तरी करावाच लागेल, कारण पास होण्याचं एक स्वप्न त्यातलंच! तू आपटली असशीलच!
काव्यरस