Skip to main content

विडंबन

बुधवारची कविता: (आभाळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 29/10/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा संस्थळ सुप्रसिद्ध, ना वैचारिक हव्यास, दोन बायांच हास्य, आणि शत्रू मात्र फार हाणामार्‍या भरपूर, लोकशाहीचा मात्र भास, ना अपेक्षा सभ्यपणाची, बोर्डावर चपलांची रास इकडून हाकलून सोडून पुन्हा जुन्याच आयडीचा फार्स ही एवढीच मांडवली दगडू, आंडू,राव पुरेशी आहे परतायला रचना: २९/१०/२००९
काव्यरस

(हव्यास तू)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी सोमवार, 26/10/2009 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
(प्राजू यांना अपेक्षित असलेल्या प्रियकराची सद्यस्थिती) घरात अपुल्या भरून उरल्या मद्यराणीचा सुवास तू वेगवेगळ्या गचाळ गंधाची उभी ठाकलेली रास तू क्षणैक जागेवरी न थांबे लडखडणारा त्रास तू मित्रांच्या कुबड्या करुनी तरंगणारा भकास तू अखंड रिचवणारा... झरझर घोट संस्कृतीचा दास तू चाखण्यावरती पोसलेली तुंदीलतनू आरास तू डोळे मिटूनी तुला पहावे.. ग्लास तू ..... ग्लासात तू तुझ्याविना ते कसे जगावे मद्यकर्त्याचा श्वास तू पेगवेड्या त्या जनांना लागलेला ध्यास तू.. बाटलीतील उत्कटतेचा झिंगला उल्हास तू सदा सदाच पीत रहावे न संपणारा प्रवास तू काल बेवडा... आज बेवडा हवाहवासा हव्यास तू..
काव्यरस

(किराणा घराण्याचा अति संक्षिप्त इतिहास...)

लेखक सुनील यांनी सोमवार, 26/10/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
किराण्या घराण्याची सुरुवात देहूकर बुवांनी साधारणतः सतराव्या शतकात पुणे प्रांती केली. परंतु हे घराणे फार काळ टिकाव धरू शकले नाही. त्यांच्या विरोधी घराण्यांनी बुवांच्या हिशोबाच्या चोपड्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. त्यातील काही चोपड्या नंतर बाहेर काढण्यात आल्या असल्या तरी हे घराणे नामशेषच होत गेले. बुवांपश्चात त्यांच्या घराण्याची खासियत शेजारील गुर्जर प्रांतातील शा घराण्याने उचलली. त्यानंतर जवळपास तीन शतके ह्या शा घराण्याने आपला दबदबा ह्या प्रांती कायम राखला. अगदी परवा परवा पर्यंत त्यांचा प्रभाव खेडोपाडच्या लोकांवर होता.

(रिमोट)

लेखक कौतुक शिरोडकर यांनी शुक्रवार, 23/10/2009 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
(क्रांतीजीं क्षमा करतील या अपेक्षेत) त्याला माझे आरवणे रुचलेच नसावे त्याना माझे बंड कधी पचलेच नसावे शब्दांचे ते घाव बोलके, उद्धटवाणी, नाते भावातील तिथे रुजलेच नसावे बडव्याने विठठला भजावे, असली माया, वेडे गण.. त्यांना दैवत पटलेच नसावे ! त्याच्या पाट्या कशा कोरड्या? बहुधा त्यांनी सेनानींचे सल्ले पण रटलेच नसावे वर्षांचे साथी सगळे अवचित फुटलेले, आदेशावर पुन्हा कुणी फिरलेच नसावे येता जाता भाजप त्यांना डिवचत होता, त्याचे 'जीना' भाटांना कळलेच नसावे ! त्या भात्यातुन काही शर हलकेच ढापले, मी तगलो तैसे कोणी तगलेच नसावे ! मनसे म्हणतो काकापरी रिमोट व्हावे, तिथे असावे तरी कधी त्यातलेच नसावे !
काव्यरस

(बहुधा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 23/10/2009 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल बहुधा वाचुन लिहण्याचा मोह आवरला नाही :( त्यांना त्याचे मोहरणे रुचलेच नसावे त्यांचे त्याचे बंध कधी जुळलेच नसावे बंधाचे हे नाव ठाकरे, गोजिरवाणे, भावा- र्थाचे बीज इथे रुजलेच नसावे भावांनी तोडली, जपावी, असली नाती, नेते मन त्यांचे, महाभारतच बघावे !
काव्यरस

गणित!-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/10/2009 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या नवे लेखन यादीत डोकवता 'शामो' स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,अगणीत>,((गणित)),(झिरो), झणझणीत,[गणित!] ,सणसणीत>>>>,[वळीत] - विडंबन झाली का पूर्ण?" गणित सुटेनासं झालं तेव्हा, अंधुक फुटलेला एक हुंदका आणि सहज एक विचार डोकावला... *** खेद लपवून वाचताना यादीवर पाहिलं त्यांन तेव्हा 'विडंबनां'ची त्याला एक संख्या दिसली... दिसणं, आणि असणं या जालाचा नियम उमजेपर्यंत तो हरला... मुळ कवितेचे प्रतिसाद मोजले तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती संख्या म्हणाली, "येव्हडीतर विडंबने झालीत!" रचना: केव्हातरी, २००९

[गणित!]

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/10/2009 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसांनी जालावर फिरताना "केश्या" स्वतःशीच म्हणाला, "(गणित),दहाजणीत!,((गणित)) 'अगणीत>' , (झिरो) - ही, विडंबनं की अकाव्य?" काही समजेना झालं तेव्हा, पुन्हा फुटलेला एक कंड निवृतीकडून लेखनाकडे झेपावला... *** लेखणी सरसावून उतरताना जालावर पाहिलं त्यांन तेव्हा'गणित!' तही त्याला एक अर्थ दिसला... दिसणं, आणि असणं

(झिरो)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 22/10/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा! किचकट गणित सोडवताना ती स्वतःशीच म्हणाली, "बेरीज, वजाबाकी, वर्ग, लॉग्ज - शून्य, पूर्णांक का अपूर्णांक?" गणित सुटेनासं झालं तेव्हा घरून आलेली हाळी ऐकून पुस्तकं टाकून स्टुडीओत पळाली ******************* कपडे आवरून ठेवताना मॅगझिनकडे पाहिलं तिनं तेव्हा शून्यातही तिला एक आव्हान दिसलं मॉडेल्स आणि हिरॉईन्स या दोन्हीतले फरक समजून ती कष्टली पावर योगा रोज करत शून्यावर आली तेव्हा तिच्याकडेच पहात तो म्हणाला "राणी कशी गोंडस हवी!"

((गणित))

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 22/10/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
अशा गणितांची प्रेरणा सांगायलाच हवी का? :? गच्च मीटिंगमध्ये शिरताना तो स्वतःशीच म्हणाला, "डॉक्यूमेंट्स, मॉडेल, पॉवरपॉइंट, स्प्रेडशीट, स्लाईड्स - सगळ्या, अपूर्ण की पूर्ण?" प्रेझेंटेशन जमेनासं झालं तेव्हा, टकल्यानं टाकलेला एक कटाक्ष पुढल्या वादळाची नांदी देणारा... *** लॅपटॉप बंद करुन क्यूबमध्ये परतताना टेबलवर पाहिलं त्यानं तेव्हा कागदाच्या ढिगातही त्याला 'त्याचं' अक्षर दिसलं... इंजिनिअर, आणि मॅनेजर या खेळाचे नियम उमजेपर्यंत तो हरला... उंचावत मान त्यानं ती नोट वाचली तेव्हा त्याच्याकडंच पाहात ती म्हणाली, "०/१०!" रचना : गणित चुकल्यानंतर २००८
काव्यरस