पुरुषप्रधान मालिका : थूंकू
गेले अनेक दिवस (विषेशतः हापिसातून घरी गेल्यावर) डोक्याला शॉट लावणार्या आणि महिलांच्या डोळ्यातून पाणी काढणार्या अनेक मालिकांचे रतिब विविध वाहीन्या घालत असतात. पूर्वी सास-बहूच्या मालिकांचे रतिब हिंदी वाहीन्या घालत असत (हुश्श तेव्हा आमच्याकडे केबल नव्हती). तर सांगण्याचा मुद्दा हा कि या भयंकर कंटाळवाण्या मालिका घरी गेल्यावर सोसाव्या लागतात. अगदी आतल्या खोलीत जाऊन काही वाचन करावे म्हटले तरी आजूबाजूच्या घरातून येणारा असल्याच मालिकांचा आवाज आणि त्यांचे पार्श्वसंगीत यामुळे डोके उठते. त्यामुळे कधी कधी बा**ला हापिसात बसून काम करत सडलेले बरे असे वाटून जाते. " पण गड्या असल्या लहान सहान कारणानी जर व्यथित होत बसलास तर मैदान मारणार कसं, ऊठ तुला अजून बरीच कामं करायची आहेत." असे आमचे एक प्रतिबिंब आम्हास समजावते. मग आम्ही विचार करु लागतो (आम्ही अधून मधून विचारही करतो बरं).
चायला, या बायकांच्या मालिकांनी डोकं उठवलं आहे. किती म्हणून त्याची तीच ती हळवी शिर्षकगीतं तेच तेच ते कुजकट डायलॉग ऐकत बसायचं. चला या मालिकांची विडंबनं पाडून तशा मालिका तयार करून झीमराठीला देऊ. तेवढंच माझ्या सारख्या त्रासिकजनांची २ घटका करमणूक होईल. विडंबनं मात्र पुरुषप्रधान पाहीजेत.
मालिका १ : थूंकू (मूळ मालिका कूंकू)
जाहीरात
चार पात्रे
पहीले पात्र अर्थात आम्ही: "चायला या अमेरिकेच्या पान खाता येते पण थुंकायची सोय नाही. हिरव्या नोटांचा माज काय कामाचा."
दुसरे पात्रः मालक (अर्थात मालिकेतले): "बा**ला भां*द आम्हाला सांगतात साले पानं खाऊ नका आणि थूंकू नका. अहो जिथे सगळ्या उच्चभ्रू शिग्रेटी संपतात तिथे आमचे तमाखूवाले पान चालू होते आणि वर भाईकाकांनी सांगितल्याप्रमाणे बोटभर चूना. आम्हाला सांगतात साले. आम्हाला पान खाता येते आणि थुंकताही येते पण हिरव्या नोटांचा माज कसा करायचा."
तिसरे पात्रः (भकासराव, शेतकरी गडी) : "पानही आपलं आणि वावरही आपलं हवं तेव्हा खा आणि हवं तेव्हा थुका. पन त्येजायला डाक्टर म्हन्तं जास्त पान खाल्ल्यानं त्वांड येतय. परत तंबाक खातय म्हनून सायेब पन आपल्याला विलायतेला न्यात न्हायत. आता काय करायचं"
पात्र चौथे (नुकतंच कालेजात जायला लागलेल्या टारायक नातलगासारखं कोणतरी, चुना जास्त झाल्यामुळे पोळलेल्या बाजूकडे तोंड ओढून आणि व्याकूळडोळ्यांसकट) : "आता माझ्या पानाचं काय होणार ?"
यातले काही सीन साधारणपणे असे:
प्रसंग १: ( आम्ही व पानपट्टीचे मालक ओसरीवर बसून मस्त पान खात आहोत)
आम्ही: इकडे येऊन पान खाण्याची मजा काही औरच.
मालकः हा इकडे येऊन थुंका पचापच आणि तिकडे जाऊन आम्हालाच भाषण द्या इकडे सगळे स्वच्छ वगैरे.
आम्ही: मालक आम्ही पान खाण्याची म्हणतोय थुंकण्याची नाही. तसेही पान खाऊन मी कुठे थुंकत नाही. कचरापेटीपाशी गाडी थांबवून तिथे थुंकातो, कसे?
मालकः करा म्हणजे आमच्याच उकीरड्यात भर.
(मालकांचे बोलणे मधेच तोडत)
आम्ही: भरलेल्याचा उकीरडा करण्यापेक्षा उकीरड्यात भर चांगली नाही का?
(थोडा पॉझ घेऊन)
मालकः तो कारटन त्या टारायकच्या मागे का लागलाय कळत नाही. जिथे जिथे तो पान खाईल तिथे तिथे हा कारटन जाऊन थुंकतो. मग टारायक सारखा म्हणत असतो माझ्या धोतरावर शिंतोडे उडाले म्हणून.
आम्ही: मालक चालायचंच तुम्ही आम्ही कसे पान खायला शिकलो? आम्ही तर नुसते किमाम खाऊनच भिरभिरलो होतो. आणि तो टारायक सुधा आता कुठे पान खायला शिकतो आहे तर आधी खावं ना साधं फुलचंद मग किमाम मग १२० मग ३०० मग ३२. नाहीतर उगाच खाऊन येणार कलकत्ता मीठा आणि थुंकणार मात्र १२०-३२च्या तोर्यात. मालक मी तर म्हणतो ते टारायक झेपत नसताना गेलं असेल हत्ती छाप खायला आणि पडलं असेल झीट येऊन आणि कारटननं आधीच थुंकून ठेवलं असेल ते लागलं याच्या धोतराला, आता प्रत्येकानी आपापली व्यसनं आणि धोतरं सांभाळली पाहीजेत की नाही?
मालक: बरोबर, चायला प्रत्येक जण आपापल्या थुंका सांभाळते तर 'पोलिस' पाहीजे कशाला होते 'पिंकांचे' डाग 'उडवयला'.
प्रसंग २ (पात्रं नवहवलादार टिका आणि मोठा पान) आता हि कोण पात्र ते विचारायचे नाही आम्ही आमचे पोएटीक लायसन का काय ते वापरत आहोत. तसेही मालिका वाढवायला काहीही केलेले चालते.
मोठा पानः काय मग टिकाशेठ कसं काय?
टिका: चाल्लयं बरं आणि काय रे पानपट्टीवर जाऊन कसला दंगा करता रे. मुद्दाम सगळे एकदम पिंका टाकता. पिंका टाकायला बादली ठेवली आहे तरी आजूबाजूला थुंकता. मग ह्याच्या धोतरावर, त्याच्या लेंग्यावर, तिच्या साडीवर शिंतोडे उडतात.
(टिकाला मधेच तोडत)
मोठा पानः का हो पोलिस झाल्यापासून तुम्हाला बरीच काळजी आहे इतरांच्या पदरांची आणि धोतरांची. आणि चायला पोलिस स्वतः थुंकतात तेव्हा. मग तेव्हा लगेच तुमच्या तलवारी म्यान.
टिका:(व्यथित होऊन) अरे पण पानपट्ट्या टिकवायच्या तर थुंकण्यावर बंधन तर पाहीजेच ना! नाहीतर सगळ्याच पानपट्या अस्वच्छ पानप्रेमींना पान देणे बंद नाही का करणार. प्रत्येकानी थोडं थोडं समजून घ्यायला नको का?
मोठा पानः हां बोला आता. आम्ही इतके वर्ष पान खातो इथे येऊन तेव्हा ते मालक आम्ही मस्त १२०-३०० जमवून सोबत पिंका मारायचो. आमच्या कल्ल्यामुळे लोकाना कळले इथे पानपट्टी आहे. आता जास्त लोक पान खायला येऊ लागले तर आम्ही थुंकणे पण बंद करायचे?
टिका: अरे सगळ्याना नाही थुंकायला आवडत.
मोठा पानः पण आम्हाला आवडते तो आमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे.
टिका: तुझ्याशी वाद घालण्यात अर्थ नाही नाहीतर मोठीच्या मोठी पिंक मारशील आणि मग त्याचे डाग उडवता उडवता नाकी नऊ. (टिका उठून निघून जातो मोठा पानच्या चेहर्यावर छद्मी हास्य)
आता २ प्रसंग लिहीले आहेत. आवडले तर पुढचे. आमच्या प्रिय मित्रांपैकी कोणी यात इतर प्रसंगाची भर घातली तर उत्तम.
हां अजून एकः वरील सर्व पात्रे केवळ आमच्या मालिकेत विनोदनिर्मीतीसाठी निर्माण केली आहेत त्याचा वास्तावाशी काही संबंध आढळल्यास तो निव्व्ळ योगयोग समजावा.
वर्गीकरण
गुरूवारदेखील...
In reply to गुरूवारदेखील... by श्रावण मोडक
+१
In reply to +१ by प्रभो
हा हा हा
In reply to हा हा हा by गणपा
बायको
***** ति*****
अर्रार्रा
जियो जियो
In reply to जियो जियो by घाशीराम कोतवाल १.२
पानपट्टीव
In reply to पानपट्टीव by llपुण्याचे पेशवेll
तर मग पाच
In reply to तर मग पाच by घाशीराम कोतवाल १.२
तर मग
In reply to तर मग by रामदास
खणखणीत.
पुढचा भाग
धन्य !
In reply to धन्य ! by विशाल कुलकर्णी
हम्म विचार
खतरनाक
लवकर टाक
!!!
जियो!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to जियो! by नंदन
नंद्याशेठ
In reply to जियो! by नंदन
नंद्या, तू
माजलासुटला आहेस! किती शिकारी करशील एकाच प्रतिसादात? खरंतर तुझ्या प्रतिसादाला मलातरी इंग्लिशमधूनच उत्तम दाद देता येईल ... पण नको, पुन्हा अपशब्दच आठवत आहेत, थोडं संपादित करून लिहिते! It's wicked good! अदितीIn reply to नंद्या, तू by ३_१४ विक्षिप्त अदिती
शिकार
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to शिकार by नंदन
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
:)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
हम्म्म!
In reply to हम्म्म! by ब्रिटिश टिंग्या
व्वा! पेशवेसाहेब..व्वा!
In reply to व्वा! पेशवेसाहेब..व्वा! by धमाल मुलगा
>>@टिंग्या:
पुढचा भाग लवकर येऊ देत...
पच्च्याक्क ऽऽऽ
बिपीन
In reply to बिपीन by अवलिया
हम्म्म!!!
In reply to हम्म्म!!! by बिपिन कार्यकर्ते
" माफ करा पण
In reply to " माफ करा पण by निखिल देशपांडे
"धोतर
In reply to "धोतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
हो हो
पुपे,
संपादकांन
मालिका
In reply to मालिका by प्रकाश घाटपांडे
+१
थुंकु मालिका.
In reply to थुंकु मालिका. by हरकाम्या
चूक!