(शिकरण)
काव्यरस
श्रावणसरांचं 'व्याकरण' एकदमच जबरी निघालं आणि मग त्याचं शिकरण करायची जबाबदारी जर माहिती असून घेतली नसती तर ती विडंबनपंथाशी प्रतारणा झाली असती, म्हणून मग....
तू सांगितलंस म्हणून
नात्यांचं शिकरण समजून घेताना
संबंधांचा कुस्करा शोधू लागले तेव्हा...
तेव्हा म्हणालास,
‘’सासू, नणंद, दीर आणि जावेच्या
या खेळात पडतेसच कशाला?
नातं दोघांसाठी असतं,
अन् शिकरण नातेवाईकांसाठी.
"नवर्याची जात एकच - कामचुकार हीच"
लग्न ठरवण्याची वेळ आली
तेव्हाचे हे शब्द ऐकून गपगार झाले
कारण त्या लग्नात नातं दोघांचं होतं
पण माझा आधारच काढून घेणारं!
***
गेल्या अवकाळी स्वयंपाकघरात
मी बावरलो होतो
पुन्हा अवकाळी पाहुणे आलेत...
आता सावरून घ्यायचं आहे
सुरु केलेला स्वयंपाक आवरण्याचा
खटाटोप तरी करावाच लागेल, कारण
पावभाजी न शिजण्याचं एक दु:स्वप्न त्यातलंच!
तू हादडून आली असशील! मनसोक्त, नेहमीसारखीच
मीही घेतलीये!! मित्रांच्या सहवासात, मनसोक्त;
बिनसलेल्या स्वयंपाकाची धडधड छातीत साठवून घेत!
जवळची 'मॅक' मात्र
आता मला शोधायची आहे
नात्यांच्या जातीच्या तुझ्या व्याख्येत
ती कुठं बसेल?
विरेचनकाल कोलंबस डे २००९
चतुरंग
वाचने
3119
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
शिकरण
छान .. अपेक्षित
कोलंबस डे सार्थकी
हम्मऽऽऽऽऽ
आम्ही ते
मस्त रे!
धन्य आहात!