Skip to main content

विडंबन

(पुरे का पुरे का)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 18/09/2009 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा, हॅ हॅ हॅ आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका उरलाय स्प्रे मारल्यात पाली पुरे का पुरे का मला पाहून ती अशी पळाली काय सांगू हातानेच मी मारली टपली, पुरे का पुरे का तिचे कीटकांशी होतेच तंटे कळता मला अन झाडले घर मी, पुरे टवाळी पुरे का पुरे का? नवे कोळी येता सदनात माझ्या वदले स्वतःशी रित्या घरात नवी जाळी आली, पुरे का पुरे का? दांडा लांब करता झाडूचा झाला उपयुक्त तोही चला झाडलोटीला ह्या सुरूवात झाली पुरे का पुरे का? रामरगाड्याच्या पसार्‍यात अडकले अशी मी पुरी दीवार भरे जाळींनी पुरे नाही का?? जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली काम

इतकेच मला जाताना

लेखक मिल्या यांनी गुरुवार, 17/09/2009 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : गुरुवर्य सुरेश भटांची गझल इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना परदेशी कळले होते 'माय नेम इज खान' म्हणूनच गोर्‍याने छळले होते ही मिडिया हपापलेली फुकटात बरळली नाही मी बहर इथे पैशांचे भरपूर उधळले होते मी लबाड इतका आहे हे सांग कुणा कळले का? मी पैसे 'कोल्ह्याकडुनी' आधीच उकळले होते त्या माजी राष्ट्रपतींची मी उगाच नक्कल केली लावून दिवे अंबर का हे कधी उजळले होते? स्टंट नव्हे तर प्रथाच ही चंदेरी दुनियेमधली अफवांच्या शिळ्या कढीला मी फक्त उकळले होते माघारी आल्यावरती मी शब्द फिरविले सारे करणार काय लोकांचे जर पित्त
काव्यरस

पुन्हा पावसाला..

लेखक अनिरुध्द यांनी गुरुवार, 10/09/2009 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
(हि कविता हे मला सुचलेलं एक विडंबन आहे. मिलींद इंगळे यांच्या "गारवा" या अल्बम मधील 'पुन्हा पावसाला सांगायचे' यावरुन सुचलेले. मिलींद इंगळे यांची माफी मागून हे सद्य परीस्थिती दाखवणारं विडंबन टाकत आहे) पुन्हा पावसाला सांगायचे किती वेळ असे दडून रहायचे तुझ्या लांबण्याने दरी सुकली हिरवी वनराई जळू लागली ढगांनी किती दूर धावायचे पुन्हा पावसाला सांगायचे किती वेळ असे दडून रहायचे तेव्हढ्यात मला पाऊस दिसला जमीनीवर बरसण्यास होता आसुसला मला बघून खिन्न हसला....

(सर्व काही आत आहे)

लेखक राघव यांनी मंगळवार, 08/09/2009 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा: सर्व काही आत आहे सहज सारे पोचते गद्या प्रमाणे, विडंबनाचे माप या डोक्यात आहे! असु देत आता काव्य हे भारी कितीही.. झोडण्याची खाज मम हृदयात आहे! कल्पनेचे विश्व मज लावी ढुशी अन.. चाल दुडकी माझिया पायात आहे! जे न देखे कवी तेच पाहतो मी! ओळखाया खुसपटे डोळ्यांत आहे!! अडचणींचा सामना करतो कसाही.. विडंबनाचा बाज वरवंट्यात आहे!! पाहिले कित्येक मिपावर/मिपाकर पडीक! आनंद, नुसता येऊनी पडण्यात आहे! :) साधर्म्य कसले शोधता कडव्यात आता, अर्थ सारा, नसलेल्या मुखड्यात आहे! राघव
काव्यरस

(घजळ )

लेखक चेतन यांनी सोमवार, 07/09/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
यशोधरांची सुंदर गझल http://misalpav.com/node/9264 वाचून मला ही लिहावसं वाटलं :& ~X( ~X( ~X( असे चोंदले, राहिला श्वास नाही घसे शेकले, थांबला त्रास नाही उरी कोंडला, पूर बेभान सारा असो भेसुरा! कोरडा खास नाही मला धाप लागे, उरी दाटल्याने कुणा हाक देईन, आवाज नाही किती क्षोभ नाकातुनी शेंबडाचा मिळाली सर्दी साथ, आराम नाही जसे होतसे प्राण नाकात गोळा जरी पाहिजे, मोकळा श्वास नाही किती झीट झाले, तरी पार नाही उतारे ठरे फोल ईलाज नाही चेतन अवांतर: कधीपासुन ही सर्दी काही पाठ सोडत नाही आहे.
काव्यरस

(शोध)

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी रविवार, 06/09/2009 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - "अजून कच्चाच आहे" यांची शोध ही कविता हे "पझल" आहे का ते जाणकार सांगतीलच. मी मात्र यांना 'पझल सदृष्य' प्रश्न म्हणेन फारतर. मिपावरील "विडंबन पझल" लेखनाचा हा माझा पहीलाच प्रयत्न आहे. (परीक्षेला जाताना होत असे तशी धडधड होतेय छातीत.) ............... सकाळचा चहाचा माझ्यापर्यंत पोचलाच नाहीत चहा संपला की गॅस? माझं मी शोधीत राहीलो शब्दाशब्दांची ठिगळं की ठिगळा-ठिगळांचे शब्द? माझ्या साहित्यासाठी मीच संकेतस्थळ शोधीत राहीलो सडक्या अन्नाचे सुटलेले वास आलेच नाहीत ट्रॅश कॅन रिकामी की सर्दी झाली?
काव्यरस

(दगड)

लेखक ब्रिटिश यांनी शुक्रवार, 04/09/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
सनक : http://www.misalpav.com/node/9230 डोक चालवल तरी समजत नाय डोल फारुन बगल तरी दिसत नाय वारा दीसतो क ? तरी हाय ना मंग तसाच द्येव बी हाय हे ठोकून सांगनार्‍या म्हाराजांच्या, बुवांच्या आनी भगवी कापडवाल्याच्या मतावर विश्वास टाकुन मी समोरच्या दगडाला डोक टेकुन पाया परलो न माजी न माज्या फॅमीलीची जीम्मेदारी त्या दगडावर ढकलून झोपून झेलो.
काव्यरस

राजजींच्या 'रोखठोकनाम्या'ची 'ब्ल्यू प्रिंट'

लेखक भोचक यांनी गुरुवार, 03/09/2009 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा वसा घेऊन पुढे निघालेले तेजतर्रार नेते, मराठी माणसाची बुलंद तोफ, उत्तर भारतीयांचे निर्दालक, हिंदीनिर्मूलक श्रीमान राजजी ठाकरे यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' नामक संघटनेने गत काही दिवसांत तमाम मराठीयांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुराणकाली राक्षस ही संज्ञा वापरली जायची, तद्वतच हल्ली महाराष्ट्र देशी 'भय्या' ही संज्ञा जवळपास त्याच अर्थी वापरली जात आहे. तर सांगायचे असे की या भय्या मंडळींचे महाराष्ट्र देशीची राजधानी मुंबई व इतर नगरांत वर्चस्व वाढू लागल्याचे राज यांच्या चाणाक्ष चष्म्याने टिपले आणि नवनिर्माण बाजूला ठेवोन त्यांनी 'झाडाझडती' हाती घेतली.

(मादी)

लेखक sujay यांनी सोमवार, 31/08/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा कपिल काळे यांची कवीता "गादी" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| अशी नसावी मादी जवळी गारीबीची जणू ही गोळी. दारीद्र्याची असेच थाळी मी बापड्याची मग गुपचिळी आई बापाची बसे दातखिळी ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| साधीसुधी मादी नसे नशिबाचे फिरले फासे भोगामागून भोग येतसे घरच्यांना वेठितसे खिशावरती ताण बसे ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे.. |धृ| मादी नको भोग आवरा आयुष्याचा रस्ता सावरा खर्च पाहुनी जीव घाबरा लफड्याच्या ह्या"व्होल वावरा" येउ नका "एनी व्हेअरा" ठार दिवस मादीचे..ठार दिवस मादीचे..
काव्यरस