Skip to main content

विडंबन

(वार्धक्य)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 26/11/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
गिरीश भाउंचं वार्धक्य पाहुन मिपावर काहिजणांना अचानक आलेल्या वार्धक्याबद्दल वाईट वाटलं तरी ते लवक परत तरुण व्हावेत ही संत तात्याबा चरणी प्रार्थना ;) असो.. ************************ ************************ नडलो तुला पिळुन, राजरोस मनुष्या हे तुला विडंबन, आता सोस मनुष्या बुधवारचा अन् शनिवारचा उतारा झाला टंकलेस शब्द किती भरघोस मनुष्या वाचक टवाळ 'बनले', झिंगुन नाचले घातला प्रतिसादांचा ऐसा हैदोस मनुष्या टेकले सगळ्यांनी हात, अन निर्ढावलेही सह्या विडंबयचास, आता नुसतेच +१ मनुष्या आता कुजकेच उरले, मालक ओळखुन आहे सह्यांचे झमेले, झाले रे, ओस मनुष्

(हिरवा माज)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 25/11/2009 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्रीताईंचा असला कचकचीत हाफवॉली पडल्यावर आमच्यातल्या विडंबकाने काय करावं असं अपेक्षित आहे? ;) ग्लेन्फिडिच बरसे सखा डॉलर पाऊस माज लेऊन हिरवा, येतो डॉलर पाऊस तिची प्रतिक्षा ग्लासात अन सख्याही फितूर गालागालात तोबरा, पिंकेपिंकेआड धूर पापड्-फर्साण चखणा तिथे पुरवतो सखा खुळावली मैफल माज घेऊन अनोखा मिरविते नवी नोट रंग कंच हो हिरवा पिंकसरीत भिजूनी लाल रंग गाली नवा नोटा उडती बाहेरी आटे खिसा धाकधुक दोस्त हलके उठती, घेती कलटी नाजुक बील ठेवीयतो खाली, वेटर हळूच वाकून मारे फाट्यावर शेट्टी, येतो भांडी मी घासून!! चतुरंग
काव्यरस

(माजुर्डा डास)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 25/11/2009 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा जयवीताईंची सुंदर कविता हिरवा साज. गुणगुणतो चावतो पकवतो, घुसला घरात डास धडकी भरवतो मनात, तोचि एक डास प्रतीक्षा कसली करीशी, आहे जालिम इलाज हाती घेतली रॅकेट, मारायाची भारी खाज धडपडायचे मम डोहाळे, लपे तो निगरगट्ट मारायचे आज त्याला, लावा ऑल-आउट मिरवते द्रव आतले, बाटली ती भगवी वीज गेली, आली परी दैवगती आडवी शांत बसता दिला तयाला, एक फटका जोरकस हाय लागले "आई गं", नेम माझा हिणकस शोषिले रक्त माझे हळूच डाव साधून झोपावे आता तरी, गोधडी ही पांघरून
काव्यरस

(पिवळा बाज)

लेखक चेतन यांनी बुधवार, 25/11/2009 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
जयवी ताईंची सुंदर कविता हिरवा साज वाचुन परत एकदा आज विडंबनाची कंड सुटली डिस्केमिअरः (२६/११/२००९) सारखच् असो... मधूनच घाऊक बरसतो कसा मालक टवाळी थांबवतो आणिबाणिचा प्रशासक पुपे कविता पाडती अन टिंग्या ही चतुर संपादकही खोडकर, उडवण्यास आतूर पेशवाईचे नगारे नित्य बुधवारी फाटे बडवुनी ही भुई, साप म्हणोनी धोपटे जिरवतो जुना कंड, हा घालुन विरजण टंकणारी ती माकडे टुल्ल शिवास पिउन ३_१४ संक्षिप्त ताईजी बसे दुर्बीण रोखून पाडे उतारा विडंबन शनिवार पाहून टीळा लावियला भाली, टार्‍या माळ घालून टंके प्रतिसाद सरळ म्हणे आलो
काव्यरस

[कसाही का असेना]

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 25/11/2009 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अन माफी- मुळकविंची! कामांना घरातल्या पटापट उरकत जा ना बैलोबा नुसता; म्हणे नवऱ्याचा दर्जा द्या ना..!! सवलती मला दे की, चालते भुणभूण रोज ती तीच ती कारणे अन त्याच त्या फुसक्या गर्जना.. निस्तरतांना थकते मी चुका तुझ्या पुन्हा पुन्हा करते का हे सहन मी हेच मला समजेना.. काय रे ते निर्वाणाचे बोललास काय नेमके होणार नाही दुःख मला, तुला बाहेर काढतांना... बोच दुखरी आहे तरी मनाला माझ्याही ठोंब्या असला तरी नवराच माझा आहेसना.. एऽऽ, दुपारी थोडीशी विश्रांती तू घेशील ना कामाला त्या नंतरच्या ताकद तर हवीना.. सुटकेची ती स्वप्ने पाहतोसच तू कशाला व्यर्थ आहेत ती बरे, गाठ माझ्याशी आहेना..!
काव्यरस

(२६/११/२००९)

लेखक चेतन यांनी बुधवार, 25/11/2009 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
ऋषिकेशची (२६/११/२००९) वाचुन आणि इतर काही प्रगल्भ संस्थळावरचे मराठीद्वेषी विचार वाचुन थोडिशी विडंबनाची कंड सुटली.... डिस्क्लेमिअरः ओषधोपचार सुचवु नये (स्वयंघोषित डॉ.
काव्यरस

<नंदनला पत्रे>

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 25/11/2009 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
कच्चा माल "स्त्रीसौंदर्य, रुचकर खाणंपिणं, आणि संगीत बजावणं या तिन्ही वाबतीत भारतासारखी महासत्ता कोणाकडेच नाही रे!!!!" व्वा!! क्या बात है!!!
काव्यरस

(मी आणि (लेखांचा) पाऊस!)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 24/11/2009 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: आमच्यात मुहूर्ताची वाट पहात नाहीत, त्यामुळे उगा बुधवार, शनिवार का करत बसा?
काव्यरस

राजे पुन्हा जन्माला या

लेखक रविंद्र गायकवाड यांनी मंगळवार, 24/11/2009 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
काय योगायोग पहा मागच्य २ दिवसात १०-१२ गाड्यांवर लिहिलेले वाचले "राजे पुन्हा जन्माला या." पहिल्या २-३ वेळा वाचले तेव्हा जास्त लक्ष दिले नाही म्हटले चला आपल्यासारखे अनेक शिवभक्त आहेत. पुन्हा २-३ वेळा वाचले तेव्हा मन शेखचिल्ली सारखे रम्य स्वप्नात रमून गेले..... अह्हाहा शिवचरित्रात वाचलेले चित्र डोळ्या समोर उभे राहिले. स्वराज्याचा प्रत्येक नागरिक राजनिष्ट आणि देशभक्त. आया बहीनी सुरक्षीत असतिल त्यांची छेड काढणार~यांचे हात कलम केले जातिल. प्रत्येक जण सकाळी देवपुजाकरताणा राजाच्या दिर्घायुष्याची प्रार्थणा करत असेल. राजांच्या एका हाकेवर देशभारातला सगळा तरून जीव द्यायला तयार होईल.

[मित्र]

लेखक अमृतांजन यांनी शनिवार, 21/11/2009 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवीची माफी मागून हे विडंबन सादर! आयडी नाही मिळाला तर लॉगिन होणारच कसे? प्रतिसाद नाही मिळाला तर वेळ जाणारच कसे? होईलच मिपा पूर्ण दंग्याशिवाय कसे? मग कंपू आपले अपूर्णच रंगाविना जसे संपादन- स्वोज्वळपणाचे हे सोंग त्यांना कळले नसेल नाही फुटणार ना रे बिंग आयपी ट्रॅकर लावला तर नसेल?.