पुण्याच्या पेशव्यांच्या बुधवारच्या कवितांवरच्या पुढच्या उतार्याची ही प्रेरणा
.
.
लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते
शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते
पहिली 'विनोदा'ची खात्री निवेदन संपताच होते
पण प्रसिद्धीच्या स्वप्नाने काकांचे* ऊर भरून येते
वाचने कमी प्रतिसाद नाही मन सैराभैरा होते
टाळ्या वाजवता स्वतःच्या "बघू काय होते?"
सुटता संयम काकांचा* शून्यच हाती येते
+१ आणि विरोधांची बेरीज मन विदीर्ण करते
नवी लिंक नवा धागा जुनीच टेप वाजू वाजू पहाते
विरोधासाठी निमित्तमात्र अदिती शनिवारीच लिहीते!
.
लेखनाची सुरूवात नेहेमी निवेदनात्मक असते
शेवटास येता येता लेखन हास्यास्पद असते
.
.
*कोणी ठराविक काका नाहीत, पण एकूण प्रतिसादलोलुप लेखकांच्या मनोवृत्तीला काका असं 'नाव ठेवलं' आहे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2835
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
उतारा उत्तम आहे.
वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
+१
In reply to वा, वा by नंदन
तरी आम्ही
चालू
मस्त!
सहमत, पण
हॅ हॅ हॅ.