Skip to main content

विडंबन

<strong>खेळ मांडला.....</strong>

लेखक उदय सप्रे यांनी बुधवार, 13/01/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हीच निवडून दिलेले नेते आमच्याच पैशांवर स्थूल होतात आणि मग आमचेच प्रश्न "स्थूल्"मानाने सोडवतात (?????) तेंव्हा ओठी येणारी ही वीराणी .....

विडंबक

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 12/01/2010 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरेची 'नास्तिक' ही कविता बरेच दिवस मनात ठाण मांडून होती, आणि आज अचानक अनेक दिवसांनी ....... एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा खरं तर साहित्यात भरच पडत असते की कोणीतरी आपल्यापुरता सट्ट्याशी का होईना, पण प्रामाणिकपणे चिकटून राहिल्याच्या पुण्याईची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा होते निर्माण गरज कवींनी आपले काव्य पाडणे थांबवून टांकसाळीबाहेर येण्याची ! एक खरा खुरा विडंबक जेव्हा कवींच्या टांकसाळीबाहेर थांबतो तेव्हा शोधक नजरेने पाहत राहतो सभोवतालच्या कविता,
काव्यरस

ती -२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 06/01/2010 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता ती आणि रंग्याची (ती) वाचुन आम्हाला आमची झालेली फजि'ती' आठवली ती समीप माझ्या येते, खुणवुन जाते ती चक्क, गुलाबी रुमाल टाकुन जाते ती शिकवुन जाते अर्थ नवे नजरांना जागवते हृदयी भलत्या अन स्वप्नांना मग स्वारी अमुची तिच्या मागुन जाते ती गालांवर ओठांनी काढत रेषा तनमनी जागवी अशी अनामिक भाषा अन स्वारी अमुची पुरी मोहरुन जाते या गालांवरती पडले काहीबाही ते मणा सारखे मला भासते काही ती खडबडून मज जागे करुन जाते ती कुणी,कल्पना वा ना कविता माझी ती कजाग, फुगरी असे बायको मा

(ती)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/01/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची सुरेख कविता 'ती' वाचली आणि ही लगेच डोळ्यांसमोर तरळलीच! ;) ती समीप माझ्या येते, खेटुन जाते मी स्तब्ध, बावरा लगेच निसटुन जाते ती लेउन जाते 'अर्थपूर्ण' कपड्यांना जागवते हृदयी भलभलत्या स्वप्नांना ती तिच्या बॉससह गर्दित मिसळुन जाते ती ओष्ठशलाका रेखुन अलगद रेषा मस्कारा लावुन नेत्रपल्लवी भाषा ती टाटा म्हणुनी बोटे हलवुन जाते मी तिच्याचसाठी शब्द जुळवतो काही ती समोर येता मुळी बोलवत नाही ती सहजच राखी हाती बांधुन जाते ती रसिक, साजिरी सखी कल्पना त्यांची, ती कविता, आराधना, साधना त्यांची, 'रंग्यास' विडंबन लगेच सुचवुन जाते चतुरंग
काव्यरस

पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही

लेखक चेतन यांनी शनिवार, 02/01/2010 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
अभ्यंकर गुर्जींचा कच्चा आणी पक्का माल वाचुन थोडासा टाइमपास करावासा वाटला पूर्वीगत पण आता कोणी हिणवत नाही पूर्वीगत पण त्याचे काही वाटत नाही B) खरेच का पण आपण कंपुत सामिल झालो अजून का लेखास प्रतिसाद मिळत नाही :?
काव्यरस

पूर्वीगत पण आता काही करवत नाही

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 02/01/2010 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा अनिरुद्ध अभ्यंकर यांची कविता पूर्वीगत पण आता काही लिहिवत नाही पूर्वीगत पण आता काही करवत नाही पूर्वीगत अन आता काही झेपत नाही भेटलो तर हल्ली आम्ही चोरून भेटतो गळ्यात आम्ही गळे घालुनी हिंडत नाही बंद घेतली करून आधी खिडक्या दारे जरासुद्धा मज जोखिम हल्ली घेवत नाही खरेच मग आम्ही इतके निर्धास्त जाहलो खरेच हा आवाज कुणाला पोचत नाही खूप शोधतो बाप तिचा मज गावामधुनी चुकून सुद्धा घरी स्वतःच्या शोधत नाही हाच फायदा इतक्या साऱ्या तडजोडींचा तिच्या कधी बापास सुगावा लागत नाही जरी नसे ही सेफ योजना तिचीच होती उगाच मी ती गप्पगुमाने ऐकत नाही पुढे

गोरी गोरी पान (विडंबन)

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 31/12/2009 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना: Behind every successful man there is a woman. Behind every unsuccessful man there are her parents. दुष्ट सासरा नावाचा दुष्टग्रह ज्यांच्या पत्रिकेत लग्नस्थळी ठाण मांडून बसला आहे, अशा तमाम जावयांच्या दु:खाला ही कविता नक्राश्रूपूर्ण नयनांनी समर्पित........ गोरी गोरी पान फुलासारखी छान सासर्‍या तुला एक तिरडी आण. सासर्‍याला उचलायला दारुड्यांची टोळी कशीबशी रचलेली लाकडांची मोळी मसणात बैस आता मांडुनिया ठाण सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याच्या ताटीवर गुलाल पसरला घाई आणि गडबडीत कोळसा विसरला लायटरने पेटवू रे आता तुझा कान सासर्‍या तुला एक तिरडी आण.. सासर्‍याला जाळताना कवटी तडकली भु
काव्यरस

मिसळपाव करता करता

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 29/12/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव करता करता सांडलवंड झाली अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको ही निघाली. आम्ही चार पावांचीही आस का धरावी जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी? कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली.. कपाटात केले कुणी बंद घुशी साती मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती उरे चायनीज, उडपी एकमेव वाली उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली धुमसतात अजुनी विझल्या जिर्‍याचे धुपारे नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी
काव्यरस