मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(पोटातला कावळा)

पिवळा डांबिस · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
कच्चा माल भग्न खवल्यांचे तळे दाटलेले तुझे अंगही पूर्ण पाणावलेले मनी आठवे आमटीचा वाफारा काटे गिळतांना घशां टोचलेले असे मी मनाच्या खुशीच्या महाली जरी विळीने हात रक्ताळलेले सुखाची करू कामना मी कशाला? सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले असे डांबिस पूर्ण कृतज्ञ तुझा मला आज हे प्राण तू वाहिलेले ||ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः || :)

वाचने 4038 वाचनखूण प्रतिक्रिया 17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विजुभाऊ Tue, 11/10/2009 - 10:32
वाह वा! पिडा काका की जय। हे देवी आदिमाये अदिती ......... ते पिडां काका आहेत पिडा काका नव्हेत. अनुस्वार विसरू नकोस नाहीतर लै पिडतील तुला. मस्त गुलाबी थंडीत आठवणींची दुलई पांघरून घ्या .

नंदन Sun, 11/08/2009 - 02:52
मनी आठवे आमटीचा वाफारा काटे गिळतांना घशां टोचलेले
क्या बात है! 'सुंदरशी कर्ली खाता, काटा गळा लागला' या धर्तीवरचे एक विडंबन ऐकले होते, त्याची आठवण झाली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रियाली Sun, 11/08/2009 - 07:30
आताच फायर रोस्टेड टोमॅटो सूप आणि चिकन वॉलनट स्यांडविच गटकलं पण हे विडंबन वाचून त्या खाण्याची चव गेली. सुरमईची आमटी आणि भाताची आठवण झाली. सोबत सोलकढी असती तर आणखीच उत्तम.

सुनील Sun, 11/08/2009 - 07:31
सुर्मई-भाताचे मीलन ठरलेले काल रात्रीच्या भरपेट सुरमई-भाताच्या जेवणाची आठवण आली! ओम श्री परमेश्वरस्य प्रथमावतारः नमः मस्त! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया Sun, 11/08/2009 - 10:27
बेष्ट ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

jaypal Sun, 11/08/2009 - 17:50
ही पि.डा. लै भारी हाय राव आवडली आपल्याला ========================================== दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रभो Tue, 11/10/2009 - 08:01
मस्त --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!