Skip to main content

विडंबन

बंदोबस्त-२

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 28/12/2009 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दांची निवड कवितेत गुंफवून भुलवलेस चार भोळ्या भाबड्यांना भर दुपारी. 'धोरण''शृंगार'. आतून बंद कडी घालतोस दुसर्‍याच अधमुर्‍या अर्थाची. प्रतिसादा आड चावट राघू किंचाळतांत, माहीत्येय .. ....... माहीत्येय.. दुपारची दंगल आणि केलेला बंदोबस्त.

(आवाहन) अर्थात कसं काय एडीटर बरं हाय का?

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 23/12/2009 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या मिपाच्या फडात रंगलेला 'आवाहना'चा कलगीतुरा बघून आपनबी थोडी धुळवड खेळावी म्हनून मग हा तमाशाचा बार ऊडवून द्यावा म्हनतोय! प्रेरना?
काव्यरस

(घाईची वेळ)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 22/12/2009 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
घाईची वेळ होई गुडगुड | जोरदार कळ || बहूतेक मिसळ | कालची || भरली बादली | घातली स्लिपर || उभे लायनीच्या | शेवटाशी || सगळे गप्पांत | रमत गमत || आमचाच प्राण | कंठाशी || घामाघूम झाला | सदरा फार || गाठही गुंतली | लेंग्याची || दहा भाडेकरु | एकची संडास || उद्धारली नाती | मालकाची || अखेरीस आला | आमचा नंबर || लाईनही मागे | वाढलेली || केली लगबग | घुसलो आत|| झाली शांती | आत्म्याची || उद्याही पुन्हा | असेलच घाई || लावेन नंबर | प्रभाती || -कवी शाहरुख मुळ कविता वाचून शांत होतो पण
काव्यरस

शनिवारचा उतारा - (कृष्ण-ए-कमळ)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 19/12/2009 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
हे घ्या वाचकहो, शेवटी न राहवून एक विडंबन पाडलंच. प्रेरणा कृष्णकमळ मादक बंदरी रूप घाबरवी सोबत रसोई छंद फंद जन हे टवाळ मेंदूही गहाळ दंगा न कल्लोळ दंग दंग सजल गरळ निबंध बरळ न कोणी सरळ अंगी कळा अबोल अबोल टिआरपी घटेल हे संकेतस्थळ शांत आहे
काव्यरस

(पुरावा)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 17/12/2009 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
जयवीताईंची सुंदर कविता दुरावा हीच आमच्या पुराव्यामागील प्रेरणा! ;) "देतोस ना उजाळा त्या कुंद कापडांना? होतोस काय अडवा ओढून चादरींना?" अवरुन घे दुपारी तो ढीग ताटल्यांचा ती खूपशी तपेली, किटली न कपबशांचा "फक्कड चहासवे दे सांजा करून भरभर!" उच्चारवात होती मज सूचना निरंतर "देईन 'चंद्र अर्धा' लग्नात जोडलेला त्या गोधडीत अजूनी तू मुक्त सांडलेला?" "आहे तसा शहाणा!" अर्धांग बोलले? वा! संपूर्ण काम झाले "रंग्यास" रे पुरावा!! चतुरंग
काव्यरस

वाढदिवस -२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/12/2009 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा छायाताईंचा वाढदिवस आणि ढवळ्यापवळ्या चे 'वाढ'-दाढ दिवस हे रोजचेच बघणे ,बघण्यात वेळ गेला मागून हर मुलीच्या पळण्यात वेळ गेला कटल्या किती तरी पण ,पटल्या किती तरी ही पटल्या चुकून त्यांना जपण्यात वेळ गेला जमवून धाडसाने संवाद साधताना गालास सुजवलेल्या धरण्यात वेळ गेला उजवून चाललेल्या सगळ्याजणी पहाता वेल्हाच राहिलो मी ,कळण्यात वेळ गेला नुसताच वाढला तू एरंड वाढल्यागत "केश्या" तुला अरे हे कळण्यात वेळ गेला

गमक-२

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 16/12/2009 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिल्याचे गमक कसे लपावे घरात लफडे कळेल का हे मला गमक अहो असा मी भितो कशाला? कलंत्र अमुचे असे कडक कधीतरी छंदमुक्त जगणे जमायला ही मला हवे कुणा बरोबर तरी अगोदर, हवेच जुळवायला यमक कुठेच नामोनिशाण मागे उरायला जर नको मला हवेच सोडायला मला मग अधीर ओठांवरी उदक उगाच बोभाट ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू इथे जगाला कळेल सगळे निघून येईल ती तडक लगेच बडवेल खेटराने तिला जरा लागता खबर टिकायचे तर तिला न याची कधीच लागो जरा भणक क्षणात पडतील दात माझे क्षणात होईल बोळके अशीच घावामध्ये तिच्या हो खरेच आहे बरे धमक विडंबनाचा गुलाम झाला...

(दाढदिवस)

लेखक रेवती यांनी बुधवार, 16/12/2009 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा?... घरातूनच मिळाली हे सांगायलाच हवे का? म्हणतात ना ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या.....जाऊदे तुम्ही आपलं विडंबनच वाचा! ;) (सूचना - वृत्त, मात्रा वगैरे कोल्हापुरी चपला घालून फिरायला गेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही!... :D ) हे रोजचेच दुखणे, सहण्यात वेळ गेला दाढेस भर पहाटे मळण्यात वेळ गेला घासू किती किती मी, चोळू किती किती मी ढवळ्या न दंतपंक्ती जपण्यात वेळ गेला चोळून जाड ब्रश हा तोंडात कोंबताना गळत्या चुकार फेसा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बदामा जोरात चावताना तुटला असा कसा हा? कळण्यात वेळ गेला वार्षीक दंतदिवशी क्राऊन बसवताना दिसते खरी कशी मी बघण्यात वेळ गेला!! रेवती
काव्यरस

('वाढ'दिवस)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 16/12/2009 02:56 या दिवशी प्रकाशित केले.
हा वाढदिवस वाचून आम्हाला आमचा प्रत्येक 'वाढदिवस' आठवला! :D हे रोजचेच फुगणे, बघण्यात वेळ गेला गजरास भर पहाटे कळण्यात वेळ गेला पळलो किती किती मी, वळलो किती किती मी ढळल्या न वळकट्या ह्या जपण्यात वेळ गेला अवळून जाड पट्टा प्यांटीस बांधताना सुटत्या मुजोर दोंदा धरण्यात वेळ गेला अजमावुनी बळाला वजनास उचलताना घटलो असा किती मी? कळण्यात वेळ गेला "रंग्यास" वाढदिवशी ये भान वाढल्याचे पोटामुळेच काटा दिसण्यात वेळ गेला!! चतुरंग
काव्यरस