Skip to main content

विडंबन

शनिवारचा ऊतारा.. अजुन एक दुविधा

लेखक हर्षद आनंदी यांनी शनिवार, 12/12/2009 03:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, एक कोणीतरी जगत असतो कधी नाक मुरडत, कधी शिव्या घालत, कधी तोडफोड करत, माजोरड्यांविरुद्ध लढत राहतो, उंबर्याची बंधने झुगारुन, समाजाची चौकट ओलांडुन, नवे नवे पायंडे पाडत राहतो कारण.... हाडांच्या काड्या करुन, आयुष्याचे मातेरे करुन लाखोंच्या जगण्याचे मोल चुकविण्यासाठी टाकीचे घाव सोसणं सटवाईने कोरलेलं असत.........
काव्यरस

शनिवारचा उतारा - दुविधा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शनिवार, 12/12/2009 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक फुलपाखरू दुविधेत टाकून गेलं... हे असं का? ते तसं का? या द्विधा मनस्थितीत, प्रत्येकालाच लिहावं लागतं कधी कंपूबाजांसारखं, कधी मालकाविरुद्ध धुडगूस करत, विडंबन पाडत रहावं लागतं कंपूविरुद्ध लिहीताना, आणिबाणीची बंधनं झुगारून, शुद्धलेखनाची चौकट ओलांडून पुढची लाईन पाडावीच लागते, कारण.... कवड्यांच्या दमड्या होऊन भरघोस मानधन मिळण्यासाठी आंतरजालातून बाहेर पडावंच लागतं............
काव्यरस

<सवयीने मंद >

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 10/12/2009 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरीत होऊन लढवावे असे सध्या तुरळकच आढळते तरी ही आमची प्रेरणा ही (सवयीने मंद) होळीची याद देऊन जाणारे विविध नावांचे विरविरीत धागे... काही खुळे, आणि दिशाहीन मठ्ठ काही नेहमी व्यस्त काही सुस्त तेच वळण तेथेच नेणारे फक्त कधी रोडावलेले, निष्कारण थंडावलेले अतीसामान्य कवितेचे जंत ... तरीही एकूणएक कवीता वाचणारा रटाळलेला विचारवंत ... पोळीची साद घालून जाणारे विविध आचार्‍यांचे सुनसान धाबे... काही बळेबळे, आणि चववीहीन घट्ट काही स्वस्त काही फस्त काही जेवण तेच ;तेच वाढणारे रीक्त चवीचे तेच मीठ पीठ अन मसाले कधी शिजलेले , अर्धवट भिजलेले ,

(सवयीने मंद)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 09/12/2009 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
ही प्रेरणा माझ्या मंदपणाची! टवाळीची साद घालून जाणारे विविध लेखकूंचे एकोळी धागे... काही लिंकाळे, आणि विचारहीन मठ्ठ काही अस्ताव्यस्त काही सुस्त काही दळण तेच तेच दळणारे फक्त कधी पाडलेले, निष्कारण विडंबलेले सामान्य कवितेचे कंद ... तरीही एकूणएक धागे उचकटून वाचणार कंटाळलेला मंद ...
काव्यरस

[मूल ते मा़झेच होते]

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/12/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी सागरलहरी ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याचे हे एक रुप चमचे ते तुझेच होते, काटेच हाती घेऊनिया.. स्वस्त नव्हतीच थाळी, म्हणे आमरस अनलिमिटेड घ्या तव मुलींशी घसट माझी, निमीत्त्य ते खाणावळी वातड सहा पोळ्या तोडतो, तिच्याकडे पाहून त्या उगीच नाही मी नोकरी, केली ती परगावी, आणिक बेचव डाळ-उसळींची, पर्वा मी केली का? तुझला आक्षेप नसे, तुच रचिला खेळ सारा, बराय हा जावईतरी, येथेच ह्याला जेवू द्या... दिन सरता डेप्युटेशनचे, दैव सारे पालटले, सुन्न मी तुझ्याच इतका, परदेसीच मला राहू द्या...
काव्यरस

<शेवट>

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 04/12/2009 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: बेसनलाडवाची ही मस्त गझल दात मग निखळून पडावा..लाथा खाता जोड नवा मापात मिळावा..लाथा खाता घोळत फिरतो तुझ्याभोवती दिवसाढवळ्या चपलेचा तरि सहवास घडावा..लाथा खाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का चेहरा सुजवला..लाथा खाता? नेहमी होते स्वप्नांमध्ये भेट आपली तिथेही सँडल, क्षण दुजा नसावा..लाथा खाता लाथ वाढली नशिबाने, भरपेट जेवलो तुझी खळी मुखशुद्धीसाठी..लाथा खाता बोलघेवडा स्वभाव माझा तुझा न पटला मुक्यानेच हा शेवट व्हावा..लाथा खाता

(ते जीवच वेडे होते)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 04/12/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताईंची सुंदर गझल ते जीवच वेडे होते वाचुन आणि वर्षअखेर जवळ आल्याने नेहमीप्रमाणे अ‍ॅप्रायझल आठवलं : 8} ~X( असो.. ते जीवच वेडे होते, जुंपुन काम करणारे टेचात पुढे ते येती, मागे पुढे करणारे त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी! मागावुन प्रमोशन घेती, काहिच न करणारे आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे, म्यनेजर म्हणवती स्वतःला, 'काडि'चे न कळणारे माहित जरी वरवरचे, आतून रिकामी घोडी, ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे! नेहमीच पैदा करती, मुद्दाम पंक्ती घोळांच्या अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच घोळ निस्तरणारे!" सुंदर रिसोर्
काव्यरस

(शेवट)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 03/12/2009 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुंदर गझल शेवट भात मी असा हाती घ्यावा..खाता खाता ओघळ अन तेव्हाच गळावा..खाता खाता सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही असा रोज सहभोज घडावा..खाता खाता रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा बोटांवरती स्वाद उरावा..खाता खाता एक घास ही पुढे मला खाता ना यावे अग्रह हा इतका न करावा..खाता खाता खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता

(अवांतर)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी बुधवार, 02/12/2009 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
पेशव्यांच्या विडंबनाची कीर्ती पाहून अर्थातच मत्सर निर्माण झाला. अवांतराने धागा भरला चांदण्या मात्र गायबल्या वैतागाने धुसफुसणारा नवा मिपाकर मी पाहिला घसरले बोल गप्पांवर कैच्याकै कंपू बरळला थांबले मिपा पळभर पाहता लेखकू कोमेजला "जियो जियो" प्रतिसादावर सहमतीचा नाद गुंजला वेड्यांचा हा बाजार पाहून मालक मात्र हिरमुसला "ठेवा गप्पा खरडींपुरत्या व्यनिची सोय केली कशाला? जायचे तर खुशाल जावे कोल्हापूरच्या प्रसिद्ध चपला!"
काव्यरस

[गणिती सुत्रे]

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 27/11/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूताईच्या सुंदर कवितेचे विडंबन तितकेच च्यालेंजिंग म्हणूनच ते आव्हान घ्यायला आवडते. खरे म्हणजे हे विडंबन नव्हे - अवघड सुत्रे, यम्म थ्रीतील सांगती हे प्रोफेसर काळे इंटीग्रेशन अन कॅल्कुलस जाती डोक्यावर सगळे एक्झामच्या गं बिकट दिवसा अभ्यासाचे वाजले दिवाळे बेंचवरच आता लिहून ठेवीन येत नसे ते जे सगळे जात पस्तिशी पुढे मजला प्रवेश तिसऱ्या वर्षात मिळे आई म्हणते, ’छान हो बाळा’ बाबांना मात्र कळते सगळे बद्द वाजलेले नाणे माझे मग खणखणीत वाजे गं साजणे राहिले दोनच वर्षे आता गं होतील क्लियर विषय सगळे पहा जमतो का तुलाही डिप्लोमा तरी कमीतकमी आई नाहीतर हरकत घेईन उधळेल स्वप्न आपले सगळे
काव्यरस