Skip to main content

विडंबन

(नको आणखी )

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 11/02/2010 16:58 या दिवशी प्रकाशित केले.
(नको आणखी ) संदर्भ : भारताचा क्रिकेट सामन्यात नुकताच झालेला पराभव प्रेरणा : नको आणखी ----------------------------------------------------------------------------------- मांडणी नव्याने नको आणखी सणकून हारणे नको आणखी उदास व्हावे पुन्हा मीच का क्रिकेट पाहणे नको आणखी येणे तुझे क्षणभराचेच का बारा वाजणे नको आणखी बॅटीत जबरी जहिराती तुझ्या लोगो लावणे नको आणखी धुंदी चढावी फटक्यानी तुझ्या परत फसवणे नको आणखी जगणार आहे तुझ्याच विना नवीन सामने नको आणखी --------------------------------------------------------------- अमोल केळकर
काव्यरस

(बोका)

लेखक शाहरुख यांनी मंगळवार, 09/02/2010 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा साय वरची आत दुधाचा साठा चोरटे आयुष्य देतो मालकास धोका बंद जरी असली घराची खिडक्या दारे एक तरी असतोच ना उघडा झरोका चोरणे हा वारसा की धर्म माझा? सोडेन कैसा मी एकतरी मोका सोबती जरी काळोखगर्भाचा उबारा सापडतो अचुक मज फडताळातील चक्का ध्यास असतो मग हळूच पळून जाण्याचा बसतो नाहीतर जळक्या लाकडाचा दणका हाणतोय जर रंगा चौक्यावर चौका तो कैसा कवी शाहरुख जो ना मारेल छक्का !! -कवी शाहरुख

(धोका)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 08/02/2010 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंच्या सुंदर गजलेत असं काही वाचलं की पुन्हा एकदा जुन्या दिवसांशी 'धोका' झाल्याची जाणीव प्रबळ होते आणि मग.... पृष्ठ वरचे, 'खास मेनू' अन सलोखा बायडी आभास नुसता, रोज धोका! बंद केली 'डायराने' सर्व दारे आयडी आला कसा, नसता झरोका? बारश्याला मीच 'मामा', कर्म माझे? सोडला हातातला प्रत्येक मोका! सोबती संपादकत्त्वाचा उबारा, आणि शिल्लक मेंबरांचा मंद ठोका बास आता सोंग हे वैचारिकांचे कंड 'चतुरंगास' सुटला हा अनोखा! -चतुरंग
काव्यरस

(लिहावे कुठे)

लेखक चेतन यांनी सोमवार, 01/02/2010 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
जयवी ताईंची सुंदर 'रुतावे कुठे' गझल वाचली आणि विडंबनाची कंड जाणवली ;) माझा एक प्रयत्न न कवीस कळले लिहावे कुठे कविता कुठे अन् चर्चा कुठे उशाला ठेवली रात्री पुस्तके तरी घुसते का ज्ञान डोक्यामध्ये कुठे ठरवुनी जमावे अश्रु लोचनी मालिका बघुनी रडावे कुठे मनी वंचना, हास्य गालावरी अशा बोलण्याने फसावे कुठे पुरस्कार पाहुनी थकलो अता नव्या 'पद्मा' ची पातळी कुठे हिमेशी नाक चोंदले का कधी नाकातुनी गाणे ऍकवावे कुठे सुरा पिउनी चालवणे गुन्हा किती निष्पाप ही मारावे कुठे विडंबनाने कोपला कवी जर का विडंबकाने मग पळावे कुठे चेतन

जालिंदर बाबा : पत्रकार समिक्षक ?

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 29/01/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
जालिंदर बाबा... संचार नावाची विचित्रपट समिक्षणाची मालिका मिपावर पूर्वी वाचत असे... चांगले चित्रपट शोधून शोधून त्यांना (घासुनपुसुन गुळगुळित ) मोहक बनवण्याची कला त्यांना चांगली साधली आहे असे तेव्हा वाटत असे आणि आदर वगैरे वाटत असे...

(कुठे भास होतो मला 'कोंकणाचा')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/01/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;) कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे... हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे? 'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे.. रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे? तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे? लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी..
काव्यरस

((त्यांच्या लग्नाची पत्रिका आज घरी आली))

लेखक Nile यांनी मंगळवार, 19/01/2010 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
'त्यांच्या' लग्नाची पत्रिका आज घरी आली, गालात हसत आम्ही उरलेल्यांची संख्या मोजली, संख्या पाहुन आमचा पहिलाच ठोका चुकला, त्रास नको म्हणुन औषधाचा पेला लगेच भरला, दोन-चार वर्षं कशी अशीच सरली होती तो रुसला आहे म्हणुन ती माझ्यापाशी रडली होती, समजवायचं त्याला म्हणुन घरातच बैठक मांडली होती, त्या दिवशी पिताना त्याला बाटलीच जास्त प्यारी होती, 'Please share our happiness' बघुन डोक्याला शॉट लागला, वैतागुन आम्ही लगेच उरलेल्यांचा घोळका जमवला, थोड्याच वेळात टेबलावर बाटल्यांची रांग लावलेली होती, दिलासा एव्हढाच प्रत्येकाने एक तरी बाटली आणली होती, विषय बदलुन आम्ही लगेच बॅचलर्स पार्ट्या आठवल्या, पुढचा नंबर
काव्यरस

[उन घे]

लेखक अमृतांजन यांनी गुरुवार, 14/01/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
त्या तरल भावना, नाहीच आम्ही कधी पाहिल्या ज्या लिहिल्या आम्ही, विडंबितच डायरेक्ट झाल्या- ह्या तरल कवितेला मुजरा व हे त्याचे रुप- ती- शिजली कोबी सारी, पाणी ते टाकून दे जीवघेणा दर्प सारा, बंद नाक करुन घे... जेव नाही तर मुस्काडीत मारीन तुझिया घरचे खावे, तूच बोले, मुकाट्याने खाऊन घे.. उसळ नको तर हवे काय रे तुला गिळायला स्वैपाकाला आईला, तुझ्या बोलावून घे.. नेहमीचंच झालंय हे तुझे मी तरी काय करु? रात्रीचे शिळे न्याहरीला, खायची तयारी करुन घे.. तो- हात जोडूनी म्हणतो, असले हे बोलणे नको तुझे ते खाणारा नवरा नवा करुन घे.. तुझा तो तोरा, रोज ती, लाखोली मला क
काव्यरस

(छंद दे)

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 14/01/2010 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच!
काव्यरस