Skip to main content

अंतरीच्या कळा

लेखक नेहमी आनंदी यांनी शुक्रवार, 30/10/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नभी आसवांचे तळे दाटलेले मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले निघालाच त्या आठवांचा फुलोरा कधी साठताना मनी टोचलेले . असे मीलनाने खुशीच्या महाली तरी अंतरीच्या कळा सोसलेले ,, सुखाची करू कामना मी कितीही नशीबात दुःख असे साचलेले न चिता मनी ना जिवाची खुशाली तुला आज मी प्राण हे वाहलेले प्रसन्ना जीके

वाचने 3791
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

खालील बदलाचा विचार केला तर - चौथ्या कडव्यात दुसरी ओळ -
नशीबात दुःख असे साचलेले
बदलून "नशीबी असे दुःख ते साचलेले" शेवटच्या कडव्यातल्या पहिल्या ओळीत "चिंता" म्हणायचं होतं का? "चिंता" केल्याने अर्थबोधही होतो आणि वृत्तातही बसतं. बाकी कविता झकास आहे. आपला, (वृत्तप्रेमी) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई

कविता आवडली. न चिता मनी ना जिवाची खुशाली हे बहुधा चिंता असे असावे. - प्राजक्ता http://www.praaju.com/