Skip to main content

वावर

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

रत्ना

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 31/07/2010 12:37 या दिवशी प्रकाशित केले.
परवा अचानक रस्त्यात ''ती'' दिसली. पाय ओढत, रेंगाळत चालणारी. कधी काळी भरगच्च दाट असलेल्या लांबसडक केसांमध्ये आता बर्‍याच रुपेरी छटा डोकावू लागलेल्या. चेहर्‍यावर एक म्लान उदासी. अंगावरची साडी तरी जरा बरी दिसत होती. मला समोर पाहून ती एकदम चमकलीच! काही क्षणांपूर्वी म्लान असलेल्या तिच्या चेहर्‍यावर ओळखीचे हसू फुलले. आत ओढलेले गाल रुंदावले आणि तिच्या खास शैलीत ती उद्गारली, ''ताई, आज इथं कुठं? कित्ती दिवसांनी भेटताय! '' मलाही तिला इतक्या वर्षांनी बघून खूप आनंद झाला होता. तिचा हात धरून मी म्हटलं, ''चल, भेटलीच आहेस तर तुला माझं नवं घर दाखवते! तुला परत आणून सोडते रिक्षाने हवं तर! '' ''नको नको, ताई!

सिगरेट सोडायची आहे?

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 29/07/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
काही सदस्यानी विचारणा केली होती त्यांच्या साठी म्हणून हे निवेदन : सिगरेट किंवा कोणतेही व्यसन हे माणसाच्या मेंदूशी दोन प्रकारे जोडलेले असते. कालांतराने व्यसन ही सवय बनते कोणतेही व्यसन हे केवळ निर्धार करून सुटत नाही. अथवा व्यसनापासून पळून जाऊनही सुटत नाही.. व्यसन आणि आपली विचारप्रणाली यांच्यात एक अनुबंध ( लिन्क) तयार झालेली असते जेणेकरून व्यसनाचे पदार्थ घेतले की ठरावीक विचार मनात येतात किंवा ठरावीक विचार मनात आले की व्यसनाची तल्लफ येते. व्यसनाची आणि विचारांची ही लिंक तोडता आली तर व्यसन सुटू शकते. सिगरेट सोडवून देण्यासाठी मी एन एल पी चा ,श्वसनाचे एक्सरसाईज,आणि मेडीटेशनचा वापर करतो.

हरिहरेश्वर...!!

लेखक अस्मी यांनी शुक्रवार, 23/07/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
हरिहरेश्वर....कोकणातील निसर्गरम्य तीर्थस्थान एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर तर दुसर्या बाजूला स्वच्छ व निळा समुद्र तसेच नारळी पोफळीच्या बागा..

असा कसा रे तू मर्द गडी..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या रविवारी भिमाशंकरला फिरायला म्हणून जाताना एका छोट्याश्या गावात द्रुष्टीला पडलेल्या एका फलकावरील ही चारोळी... बहूदा हे गाव निर्मलग्राम योजनेत सहभागी असावं... "असा कसा रे तू मर्द गडी.. फिरायला ५० हजाराची गाडी.. बायकोला २ हजारची साडी.. राहायला २ मजली माडी.. तरी बायका-पोरांना हगणदारीत धाडी.. असा कसा रे तू मर्द गडी, शौच्यालय बांध ताबड्तोब घरी.. नाहीतर मिशि कापून ये मागल्या दारी.." =))

आभार प्रदर्शन..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचे आम्ही येथे दाखल झालो आहोत..!! येथे ज्या दिवशी खाते बनवले, त्याच दिवशी मी जात पडताळणीसाठी सूद्धा अर्ज केला होता.. जातपडताळणी अर्ज केन्व्हाच मिळाला , पण इथले सदस्यनाम काही सक्रीय होत नव्हते..! मी उगीचच सरकारी कर्मचार्यान्ना कामाच्या दीरन्गाईबद्दल दूषण देत असतो.. बरे, ते असो.. इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार.. आणि खासकरून शिल्पाताइन्चे विशेष आभार.. तुम्ही चान्गले सहकार्य केले येथे येण्यासाठी..

माझा एक थरारक अनुभव

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 16/07/2010 08:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत असताना कामानिमित्त मला ट्रेनने प्रवास करावा लागायचा....आधी ट्रेनने दादरला तिथून मग ट्रेन बदलून पुढे...मला सवय झाली होती...न होऊन सांगतेय कोणाला.. खरं तर गर्दीच्या वेळी लोकलने प्रवास हा थरारकच असतो...त्याशिवाय कोणतंही विशेषण त्याला शोभून दिसत नाही...आधी भयानक गर्दीत हव्या त्या platform वर जाणे, तिथून हव्या त्या डब्यासमोर उभे राहणे आणि गाडी आली कि आपली पर्स आणि जीव सांभाळून त्या गाडीत चढणे आणि आपले स्टेशन आल्यावर काही सेकंदात परत आपला जीव आणि पर्स होता तसा घेऊन उतरणे हेच एक दिव्य असते... त्या डब्यात चढताना बघणाऱ्याला गंमत वाटावी अशा घटना रोजच घडत असतात...एकदा गाडी थांबल्यावर बायकांच्या (

भागीमारी - एका पुरातत्वीय उत्खननाची अनुभवगाथा

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 08/07/2010 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
भागीमारी हे नाव आठवले तरी ते सावनेर तालुका (जि. नागपूर) येथील छोटेसे गाव डोळ्यांसमोर उभे ठाकते. जवळपास सोळा-सतरा वर्षांपूर्वी ह्या गावाशी आणि तेथील परिसराशी एका पुरातत्वीय उत्खननाच्या निमित्ताने संबंध आला आणि एक वेगळाच अनुभव माझ्या पदरी पडला. सर्वात आधी सांगू इच्छिते की आता माझा पुरातत्वशास्त्र इत्यादी विषयांशी फक्त वाचनापुरताच संबंध राहिला आहे. पण कधी काळी एका नामवंत शिक्षणसंस्थेत भारतीय प्राच्यविद्यांचा अभ्यास करताना मला आणि माझ्या तीन सख्यांना पुरातत्वीय उत्खननात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची अनमोल संधी मिळाली आणि त्या संधीचा लाभ घेताना आम्ही त्या प्रात्यक्षिकपूर्ण अनुभवाने बरेच काही शिकलो.

ससा, सुसर आणि ससाणा

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 06/07/2010 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक मिपाप निती कथा. पुर्वी इसापाने जंगलमधले प्राणी पाहून इसाप निती कथा लिहील्या. मिपा नावाच्या ह्या तळ्यात किंवा मळ्यात (काय म्हणायच ते म्हणा) अनेक चित्रविचित्र प्राणी आहेत. स्वभावाप्रमाणे नावे वापरून जरी ते वावरायचा आव आणीत असले, तरी पुष्कळदा निळा रंग धूवून निघाल्यानंतर खरा कोल्हा उघडा पडला, तसेही होत असते. हे प्राणी अवलोकन करीत अनेक साधु-महात्मे, नाना अवलिया ह्या जंगलात स्वैर फिरत असतात. जंगलातील एका तळ्यात बुडी मारली तेव्हा, अशाच एका महान पुरुषा (ओह. सॉरी.