Skip to main content

वावर

<अनावर>

लेखक सहज यांनी गुरुवार, 01/07/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर येउन अनावर आपण सगळेच होत असतो की. डोन्ट डिनाय इट! सांगा बरे तुम्हालाही असे काहीसे वाटते का? तुम्हा सगळ्या अनावरांना समर्पित!

रिक्षावाले काका

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 28/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
''दीपक, खाली ये रे! '' रिक्षावाले काका रस्त्यावरून जोरदार हाळी देतात. शून्य प्रतिसाद. दोन मिनिटांनी पुन्हा एक हाक, ''ए दीपक, चल लवकर! '' दीपकच्या आईचा अस्फुट आवाज, ''हो, हो, येतोय तो! जरा थांबा! '' पुन्हा पाच मिनिटे तशीच जातात. ''ए दीपक, आरं लवकर ये रं बाबा, बाकीची पोरं खोळंबल्याती! '' रिक्षाचा हॉर्न दोन-तीनदा कर्कश्श आवाजात केकाटतो आणि रिक्षावाल्या काकांच्या हाकेची पट्टीही वर चढते. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या छोट्या दीपकची रोज शाळेच्या वेळेला येणाऱ्या रिक्षाकाकांच्या हाकांना न जुमानता आपल्याच वेळेत खाली येण्याची पद्धत मला खरंच अचंबित करते.

(धूळ)

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी शुक्रवार, 25/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
विडंबन यज्ञात आमची एक शुल्लक आहुती हातात झाडू घेवुन आम्ही झाडायचो ती एका कोपर्‍याला साफ ठेवायची अन् मी दुस-या कोपर्‍याला साफ ठेवायचो झाडू सावरत झाडत असताना पुसत असतांना रस्ते प्रत्यक्षातही चकाकायचे एकमेकांना हलकेच चोरुन बघायचो मुकादमाच्या गाडीवरून कधीतरी तिची ड्यूटी बदलून गेली मी मात्र मारतो झाडू रस्त्यांवरून झाडूवाल्यासारख्या कायम...हा कोपरा ते तो कोपरा.
काव्यरस

वाकुल्या दाखवणारा अदृश्य मुद्राराक्षस

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 22/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीची! माझ्या अनेक मित्रमैत्रिणींनी व परिचितांनी ''तू आंतरजालावर नियमित का लिहित नाहीस?'' वगैरे उद्गार काढून मला आंतरजालीय लिखाणाच्या दिशेने ढकलल्यानंतरचा काळ होता तो! तर, आंतरजालावरील एका मराठी संकेतस्थळावर माझा एक 'अभ्यासपूर्ण' लेख प्रसिद्ध झाला. वस्तुतः त्या लेखात अभ्यासपूर्ण वगैरे फारसे काही नव्हते. बरीचशी माहिती एकत्र संकलित करून दिली होती इतकेच! त्याचे कारणही हेच होते की जेव्हा त्या विषयावर मी आंतरजालावर मराठीतून माहिती शोधायला गेले तेव्हा अतिशय थोडी माहिती हाताशी लागली.

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

हे वारिस शाह! - अमृता प्रीतमच्या काव्याचा अनुवाद

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 17/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कितीतरी दिवस तिची ती कविता मनात ठाण मांडून बसली आहे. त्या कवितेवर लिहिण्यासाठी अनेकदा सुरुवात केली.... पण त्या अभिजात कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या त्या काव्याचा अनुवाद मांडताना ''लिहू की नको'' अशी संभ्रमावस्था व्हायची... लिहिताना माझे हात उगाचच थबकायचे!
काव्यरस

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे.
काव्यरस

एस्पेरान्तो : एक वैश्विक भाषा

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 15/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
''एस्पेरांतो? ही कसली भाषा? ही तर एखादी इटालियन किंवा स्पॅनिश रेसिपीच वाटते बघ!'' माझी मैत्रीण मला हसून म्हणाली. खरेच, तिचा तरी काय दोष म्हणा.... १२५ वर्षांपूर्वी निर्माण झालेली ही भाषा भारतात येऊन गेली ३० वर्षे झाली तरी अद्याप भारतातील लोकांना तिच्याबद्दल फारशी माहिती नाही. ह्या लेखाचा उद्देश एस्पेरांतो या आगळ्यावेगळ्या भाषेची तोंडओळख करून देणे हा आहे. कधी काळी ह्या भाषेचे प्राथमिक, अगदीच जुजबी ज्ञान मिळविण्याचा योग मला प्राप्त झाला आणि एका नव्याच भाषाविश्वात प्रवेश करण्याची संधी त्याद्वारे खुली झाली. (मी ह्या भाषेचा अगदीच प्राथमिक अभ्यास केला आहे ही नोंद जाणकारांनी कृपया घ्यावी.

आवडती English गाणी.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 14/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जरी आपण मराठी असलो तरी दुस-या भाषेतील कलेतला,गाण्यातला वरचढपणा (superior ह्या अर्थाने) हा आपल्या मनाला भावतोच!!

असाही असतो 'अभिमान'?

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 14/06/2010 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अनेक वळणांवर काही मजेशीर लोक भेटतात. कित्येकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गमतीशीर गोष्टी आपले लक्ष वेधून घेतात, तर काही वेळा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपली निखालस करमणूक होत राहते. आणि सर्वात मजेची गोष्ट म्हणजे अश्या व्यक्तींच्या गावीही नसते की त्यांच्या वागण्यातून उत्तम विनोदनिर्मिती होत आहे! असाच एका कुटुंबातील हा खराखुरा किस्सा. थोडा आंबटगोड आहे आणि थोडा कडूपण! तर हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात राहाणारे कुटुंब म्हणायला पाचजणांचे.... पण त्यांच्या घरात, दहा बाय बाराच्या दोन खोल्यांमध्ये साधारण आठ ते दहा माणसे नांदत. शिवाय गावाकडून येणारा पै पाहुणाही असायचा सोबत.