Skip to main content

वावर

नक्को नक्को रे!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 29/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

आतून किर्तन-वरून तमाशा

लेखक यशवंतकुलकर्णी यांनी गुरुवार, 26/08/2010 02:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

एक मत

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 18/08/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय... एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

मिपा कट्टा ( अदीम)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 14/08/2010 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजाल आले आनि लोकांची सार्वजनीक जिवनातील उठबस कमी झाली असे म्हंटले जाते. माणूस जास्त एकलकोंडा होत गेला असे म्हंटले जाते. पुरातन काळी लोक चर्चा /गप्पा करायच्या निमित्ताने एकत्र येत. वेळ घालवत आपुलकी वाढवत. सध्याचा जिवनाचा वेग आणि तंत्रज्ञान यामुळे आपण सातासमुद्रापलीकडल्या माणसाशी झटकन संपर्क साधतो पण शेजार्‍याची विचारपूस करत नाही. मराठी संस्थळांच्या बाबतीत हे थोडे वेगळे आहे. इथे एकत्रे भेटलेली माणसे निव्वळ मराठी आहोत्.साहित्याची आवड आहे. थोडी टवाळकी करायला आवडते या कॉमन गुणामुळे प्रत्यक्षातही एकत्र येतात. भेटत रहातात.

गोकुळ आहे!!!

लेखक कळस.. यांनी शुक्रवार, 13/08/2010 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! विचार करावासा वाटतो कि आपल्यापेक्षा दिग्गज जेव्हा लेखन करीत असतील तर त्यांना प्रतिसाद द्यावा कि नाही. खर तर नवोदितांनी प्रतिक्रिया देणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे आहे. पण कधी कधी एकमेकावर उगवलेले टीकेचे सूड पाहता त्यांचा बद्दल असलेला पगडा थोडा का होईना ढासळतो. याचे कारण म्हणजे एकमेकांवरील केलेले [विनोदात्मक] शब्दांचे वार. हे सगळे वाचून बरा टाईमपास होतो पण हे होणे थोडे चुकीचे वाटते. कधी कधी दुर्भाग्यपूर्ण वाटते.

मिपाकरांची ओळखपरेड ( नव्या-जुन्या सदस्यांची ओळख ) ...

लेखक छोटा डॉन यांनी मंगळवार, 10/08/2010 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो ( आणि मित्रांच्या मैत्रिणींनो ) ! मिसळपावच्या कट्ट्यावर दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे.सर्व नविन सदस्यांचे मिपा परिवारातर्फे स्वागत ! मिपाचे रुपडे पालटले आहे.

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.

संपादकांचे अभिनंदन

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 03/08/2010 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या दोन दिवसांपासुन मिपावर अनेक सुरेख चर्चा चालु आहेत. अनेक नवनवीन सदस्य मिपावर येऊन लेखन करुन आपल्या मनातल्या भावनांचा निचरा करत आहेत. विचारांची देवाण घेवाण करत आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा होत आहेत. कधी कधी अवांतर प्रतिसाद पण येत आहेत. पण एक मात्र नक्की की विचारप्रबोधन, तसेच मनोरंजन होत आहे अशा या धाग्यांमधले अवांतर प्रतिसाद, अनाठायी प्रतिसाद या नावाखाली प्रतिसाद उडवणे हे संपादकांनी केलेले नसल्याने धाग्याचा मजा लुटणे शक्य झाले आहे. अन्यथा तोंड दाबुन मुक्क्यांचा मार होते... मनापासुन हसता पण येत नाही.

अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 02/08/2010 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
IT WIFE आणि स्वयंपाक वरच्या प्रतिक्रीया वाचल्या आणि आठवले. परवा एकाने बोलता बोलता विनोद म्हणून एक वाक्य सांगितले. सगळेजण भरपूर हसले थोड्यावेळानन्तर मात्र त्या वाक्याबद्दल जोरजोरात चर्चा सुरु झाली. सत्राव्या शतकातले विचार बाविसाव्या शतकातले विचार पुरोगामी प्रतिगामी वगैरे दूषणे देवून झाली. प्रत्येकाने तावातावाने आपले विचार मांडले. व्यक्तीस्वातन्त्र्य , भारतीय संस्कृती , पुरुषप्रधानता , आय टी कल्चर , चुल आणि मूल ,अ‍ॅरेन्ज मॅरेज , कान्देपोहे समारंभ शहरी विरुद्ध ग्रामीण संस्कृती , टीव्हीवरचे कार्यक्रम आणि वाडलेल्या बलात्कारांच्या बातम्या शुचिता , आजचे शिक्षण घडवते की बिघडवते असा बर्‍याच मार्गावरून