Skip to main content

आभार प्रदर्शन..

लेखक भारतीय यांनी शुक्रवार, 23/07/2010 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आणि एकदाचे आम्ही येथे दाखल झालो आहोत..!! येथे ज्या दिवशी खाते बनवले, त्याच दिवशी मी जात पडताळणीसाठी सूद्धा अर्ज केला होता.. जातपडताळणी अर्ज केन्व्हाच मिळाला , पण इथले सदस्यनाम काही सक्रीय होत नव्हते..! मी उगीचच सरकारी कर्मचार्यान्ना कामाच्या दीरन्गाईबद्दल दूषण देत असतो.. बरे, ते असो.. इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार.. आणि खासकरून शिल्पाताइन्चे विशेष आभार.. तुम्ही चान्गले सहकार्य केले येथे येण्यासाठी..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14865
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

आवरा! हे असं जाहीर आभार-प्रदर्शन करायचं असतंय हे आपल्याला माहितीच नव्हतं. भारतीय, आपण ही नवी जाणीव करून दिलीत त्याबद्दल आपले जाहीर आभार! =D> मला 'मिपा'वर बागडायचा मौका देणाऱ्या नीलकांतचे मन:पूर्वक आभार! बागडण्यासाठी मिपा उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आभार! मिपा यज्ञात लेख, काव्य, कौल आणि प्रतिसाद यांच्या समिधा अर्पण केलेल्या सर्वांचे आभार. अजून कोण राहिला का राव, त्यांचे पण आभार बरं! काय आहे, कुणाला उगाच वाईट वाटायला नको, नाय तर एन्ट्रीलाच फाउल व्हायचा! -असुर

भारतीय साहेब, आपले मिपावर स्वागत! इथे प्रवेश दिल्यबद्दल सम्पादक मन्डळीन्चे मनापासून आभार नवीन सभासदांना प्रवेश मंजूर करण्याचे काम 'सरपंचांकडून' होते. त्या प्रक्रियेशी संपादकांचा संबंध नसतो. रेवती

In reply to by रेवती

धन्यवाद रेवती बाई.. 'ह्या प्रक्रीयेशी संपादक मंडळींचा संबंध नसतो ' हे समजून सांगितल्याबद्दल आपलेही धन्यवाद... बाकी आमच्या 'धन्यवाद' प्रकारामुळे इथे नवीन वाद होउ नयेत इतकीच ईच्छा.. http://anildaily.blogspot.com

नावात काय आहे म्हणा! पण म्हणूनच तुमचं नाव राहून गेलं बघा मागच्या लिस्ट मध्ये! तुमचे पण आभार! ;) मला तर बुवा वरून २रा फोटो आवडला! अगदीच भारी की राव! तुमचा सुटला काय तो फोटो पाहायचा? हिरवा रंग म्हणजे किती गच्च हिरवा असावा नाई!! (इतके गोग्गोड फोटो काढणं कसं काय जमतं काही कळत नाही!) O:) -असुर

मी काही केलं नाही ओ ....भारतीय यांनी मिपा बद्दल विचारलं म्हणून मी सांगितलं एवढंच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

हे तुमचे मोठेपण समजावे का शिल्पाताई? बरं ते असो.. एवढे बोलून मि माझे आभारपर दोन शब्द संपवतो.. जयहींद, जय महारष्ट्र..!! http://anildaily.blogspot.com

In reply to by भारतीय

आभार संपले असतील तर खायला येउ द्या की राव. कवाची ताटकळीयेत मंडळी. एकतर इतक्या लांबुन आभार प्रदर्शनला आलीयेत. बाकी स्वागत आहेच(खायला मिळाल्या नंतर). ;) -Nile

In reply to by Nile

ओ नाईल राव, हा पानसुपारी समारंभ आहे. आभार मानून पोट भरलं नसेल तर - अल्पोपहार घरी जाऊन करा तुमच्या तुमच्या

In reply to by Nile

ओ आम्ही मुला कडचे असू नाही तर मुली कडचे - काही झालं तरी 'भारतीय' आहोत. काय समजलांत ;) ? आभार प्रदर्शन संपलेलं आहे. पटांगणातली सतरंजी तुमची नसेल तर चला आपण आता...

In reply to by विंजिनेर

तुम्ही पुण्याचे काय? तरी म्हणलं होतं बर्व्यांना पुण्याचे स्थळ सुचवु नका म्हणुन, पण या नारायणाचे ऐकतो कोण? आता येउ नका रडत पोरीला छळतात म्हणुन नंतर म्हणजे मिळवले. -Nile

In reply to by Nile

हल्ली मुलाकडचेच रडत असतात असे कुणीतरी सांगत होतं ब्वा ! --अवलिया

In reply to by अवलिया

मुलगी पुण्याची असेल तर अजुन दुसरे काय होणार हो? ;) पण इथे मुलीचे गावाकडेच आहेत, त्यांना काय कल्पना? -Nile

In reply to by Nile

मालक मिश्टिक करत आहात.. गाववाले लै बाराचे असतात आजकाल... (शहरी) अवलिया

In reply to by अवलिया

अहो गाव म्हणजे बारामती नाही म्हणत आहे हो मी. ;) (आडगावचा) -Nile

In reply to by Nile

अरतिच्यायला... बारामती नाय वो म्या कुर्डुवाडीबद्दल बोलत होतो.. --अवलिया

In reply to by अवलिया

अर्र्रर्रर्रर्रर्र, अहो त्या शिकल्या सवरलेल्या पोरींबद्दल काय हो बोलायचं सांगा तुम्हीच? -Nile

In reply to by Nile

विषय बदलू नका. भावनिक गळ घातली तरी चहा-बिडी मिळणार नाही - ती सोय फक्त 'कार्यकर्त्यां'साठीच आहे (मंडपाच्या पाठीमागे.)

In reply to by विंजिनेर

कार्यकर्ते कोण बिपिन का ? >>मंडपाच्या पाठीमागे मिशी कापुन का ? हल्ली तशी फ्याशन आहे.. --अवलिया

In reply to by अवलिया

ओ नाना.. नावं घेऊन, || काड्या || घालून संपल्या असतील तर निवांत बसा जरा.

In reply to by विंजिनेर

ओ उत्तर देता आलं नाही की गप्प बसायला सांगताय... "तुम्ही होता का ?" अशी विचारणा झाली का तुम्हाला ? --अवलिया

In reply to by अवलिया

अहो मुलाकडचे आहेरवाले अन मुलाचे काका, मुलाकडच्यांनी नाही तर मुलीकडच्यांचीतरी... ;) -Nile

In reply to by विंजिनेर

च्यायला सगळा खर्च मुलीकडच्यांनी करायचा, वर हेच मुलीकडच्यांना सांगणार की चहाबिडी मिळणार नाही म्हणुन. (बाकी २० रुपड्यांचा संदर्भ विसरल्याने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!). अरे ज्जा! इथे स्वैपाक्यापासुन सगळे ओळखीने बोलावलेत. आमची ताटं थेट रसोईखान्यात लावु, काय समजलात? -Nile

In reply to by Nile

दोन-तीन शेफ जरा ओळखीचे झाले मिपावर की लगेच सगळीकडे मिरवत हिंडायला मोकळे. (असो पळतो आता.. घरचा आहेर मिळायचा नाहीतर ;) )

In reply to by विंजिनेर

मानपाण उणेदुणे सुरु झाले का तुमचे??? मोठे जावै घ्या समजुन =))

जेवण केल्याशिवाय कुणीही जायचं नाही. ;)

In reply to by भारतीय

साखरपुड्यात हल्ली लग्न करतात तसे आभारप्रदर्शनात केले तर काय वाईट? --अवलिया

In reply to by Nile

आम्ही मंडप, साउंडसिस्टीम, केटरर्स, अनांसमेंट वाले आहोत. =))

In reply to by मितभाषी

हे बरंय, सिस्टीम वाल्यांना अनांसमेट करायला दिली तर ते भटजीच्या आधीच लग्न लावतील की. -Nile

आहेर आमच्याकडे जमा करा (अपक्ष) अवलिया

In reply to by अवलिया

मुलीची सासु वस्ताद हो. बरोबर ब्रह्मचारी नेमला या कामाला. =)) -Nile

In reply to by अवलिया

अरे हो खरंच की, पुरुषमुक्तीच्या विजयानंतर तुम्हाला आता हे व्रत सोडायला हरकत नाही. ;) -Nile

In reply to by Nile

हा हा हा आधी काही "म्हाता-या" उत्सुकांना लाईनीला लावुन मग करु विचार. --अवलिया

आभारप्रदर्शनानंतर वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे ह्याबद्दल संयोजकांनी मला अंधारात ठेवले होते! बरं, चालू द्या.... http://anildaily.blogspot.com

In reply to by भारतीय

घ्या आता हे कोण आले? हे मुलाकडचे पण काय आहेत! १०० पानं सांगितली आणि ३०० डोकी बोलावली आहेत. -Nile

In reply to by Nile

तुम्ही काळजी करु नका. मी घाल पाणि आणि कर कालच्यावानी करतो. =)) =))

In reply to by मितभाषी

तिकडे तो वरती नवर्‍या मुलाचा काका( =)) ) फार अकडुपणा करतोय ना, त्याच्या ताटात जोरदार तिखट भाजी वाढुन या हो जरा. -Nile

In reply to by Nile

अहो त्याच्यासाठी खास 'पत्रावळ्या' उचलण्याचे काम 'राखीव' ठेवले आहे. त्याच्यानंतरच त्याला जेवन(काही उरले तर) :D

जय टारेश्वर.... मिपावर स्वागत ;) shikari

In reply to by विजुभाऊ

अन्दाज अपना अपना. लेकिन बहुतेक गलत व्हयेंगा. :D

In reply to by विजुभाऊ

मामाच्या ग्गावात! कोणीतरी 'टारुद्दीन' बद्दल बोललं.. ते परत आले कि काय? तसं असेल तर दिवाळी होणार परत, आपापले फटाके आणि उदबत्त्या तयार ठेवा भौ! --असुर