मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ च्या निमित्ताने

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·
- डॉ. सुधीर रा. देवरे (पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशनाकडून 25 सप्टेंबर 2020 रोजी ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे पुस्तक प्रकाशित झालं. त्या निमित्ताने हा लेख): ‘ज्यांच्या चेहर्‍यासमोर प्रतिक्रिया मागणारे कॅमेरे नसतात!’ अशा ‘जगातील भल्या बुर्‍या घटनांची नोंद घेणार्‍या सर्व सहृदय माणसांना...’ हा ग्रंथ (‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’) अर्पण केला आहे. सर्वसामान्य माणसाच्या वेदना वेशीवर टांगून त्यांना न्याय मिळावा म्हणून 2012 साली ब्लॉग लिखाणाला सुरुवात केली. (आणि म्हणूनच या ग्रंथाचीही आज निर्मिती झाली.) ब्लॉगमधून लिखाण करताना साहित्यिकापेक्षा सामाजिक होण्यात जास्त आनंद मिळतो!

दोन घडीचा डाव.....!!

Jayagandha Bhatkhande ·

सोत्रि 07/10/2020 - 05:17
एक चांगला लेख केवळ व्हाॅट्सॲप कापीपेस्टमुळे वाचनिय न होता वाया गेलाय. बरेच वेळा एखाद्या प्रसंगाचा सल मनाच्या तळघरात दडून बसलेला असतो. काही विशिष्ट प्रसंगांमध्ये मात्र ही अश्वत्थाम्याची जखम परत भळभळून वाहू लागते.. कारण गत क्षणांचं "निर्माल्य" करण्याचं कसब, सगळ्यांमध्ये नसतं..!! मग विवेक बाजूला पडतो, आपली वैचारिक घसरगुंडी सुरू होते, जी आपलं वर्तमान आणि भविष्य या दोघांना दूषित करते किंवा बिघडवू शकते..!! मस्त! - (आत्म्याच्या सापेक्षतेने पाहण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

Jayagandha Bhatkhande 07/10/2020 - 11:13
पुढच्या वेळेस, लेखामध्ये.. चांदण्यांचा खच पडणार नाही.. याची दक्षता घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न निश्चितच करेन..!! सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद..!

गोंधळी 07/10/2020 - 10:09
👍 *मनुष्य जन्म* म्हणजे, आत्म्याच्या सापेक्षतेने पाहता, त्याच्या चिरकाल चालणाऱ्या प्रवासातला *"दोन घडीचा डाव* होता.… हे सत्य कळून चुकते.....!!!!

Jayagandha Bhatkhande 07/10/2020 - 11:16

*दोन घडीचा डाव...* *"जीवनात ही घडी अशीच राहू दे"* .. सुखा-समाधानाच्या प्रसंगात, आनंदाच्या लाटांवर तरंगत असताना, प्रत्येकाला अगदी असचं वाटत असतं. पण *"घडीने घडी काळ आयुष्य नेतो.."* या कटू सत्याचं भान मात्र आपल्याला कधीच नसतं. त्यामुळे बरेचदा जीवनात अचानक नैराश्य येतं. एकाकी अन् असहाय्य वाटतं, आणि आपलं जीवन व्यर्थ आहे की काय...? असे विचार मनात रुंजी घालू लागतात. त्यासाठी हे सिंहावलोकन किंवा एक विचार मंथन.....!!! चौ-यांशी लक्ष योनीतून प्रवास झाल्यावर म्हणे हा मनुष्याचा जन्म येतो. ती आपली सर्वात मोठी देणगी असते. हे आपण कालौघात विसरतो.

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

महासंग्राम ·

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

जाप करा हो !

डॅनी ओशन ·

आत्मविश्वास वाढवणारं भाषण

लेखनवाला ·

शा वि कु 21/09/2020 - 10:41
कल्पना खूपच भारी आहे कथेमागची. सर्व बंध तोडून जगा सांगणाऱ्या व्यक्तीनेच बंधात अडकून आत्महत्या केली, तर त्या त्याच्या चाहत्यांच्या मनात काय विचार येणार ?

“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..

माणूस आणि एकलेपण

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

उपयोजक 16/09/2020 - 12:17
जगाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात एकटा मनुष्य राहणं म्हणूनच अशक्य घटना वाटते. Cast away सिनेमात अनेक महिने राहताना दाखवलाय की!

- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात. माणूस या जगात एकटा जगू शकेल?

लबरे़ज

ज्येष्ठागौरी ·

विजुभाऊ 12/09/2020 - 22:32
आहा हा. गगनबावड्याच्या घाटात एकदा संध्याकाळी उतरत असताना अचानक पायर्‍या पायर्‍या रचाव्यात तसे संह्याद्रीच्या राम्गा दिसल्या. अक्षरश: अवाक झालो. गाडी थांबवून अर्धा तास पहात राहिलो. त्या वेळेस आणि नंतरही बराच वेळ कोणीच बोलत नव्हते

असे काही शब्द मला खुणावत असतात. पण कविता काही एका शब्दावरून सुचत नसते. मग कधी योगायोगाने तो शब्द एखाद्या कवितेत बसत असला की अशी नशा येते की त्या नशेतून मला बाहेर यावसं वाटत नाही. असाच हा 'लबरेज' शब्द. बरेच दिवस खुणावत होता पण माझ्या कवितेला काही तो भेटत नव्हता. एक दिवस मग एका कवितेने त्याला हात धरून आणले आणि एका ओळीत बसवले. तोही पठ्ठ्या अगदी खूप जुन्या ओळखीतला असल्यासारखा बसलाच. संपूर्ण कविता नाही पण एक लहानसा भाग देतो त्या कवितेचा. कदाचित तुमच्या लेखातल्यासारखा तो दिसत नसेल पण आहे चपखल. कदाचित तुम्हाला आवडेलही. आशिक तो हूं मगर, हूं इन्सानही फितरत से लबरेज हूं कोई नुक्स ना कहीं निकल जाए, डरता हूं अपनी तसवीर ना तोडो रहने दो, मेरे तसव्वुर मे जिस तरह हो उसी तरह रहो सं - दी - प

लबरे़ज... आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम!

पुस्तक परिचय "समांतर" लेखक- सुहास शिरवळकर

सुजित जाधव ·

किशोरवयात जेव्हा सुशिंचे गारूड होते तेव्हा ही कादंबरी वाचली होती व प्रचंड आवडली होती. पण नंतर शंना नवरेंच्या एका कथासंग्रहात ह्याच विषयावर असलेली एक कथा वाचली होती. तेव्हा गोंधळलो होतो. शंनांची ती कथा अजुन कुणी वाचली आहे का?

सुशिंच्या अनेक भन्नाट कादंबर्‍यांपैकी एक. सहावी सातवीत असताना लायब्ररी मधून घेउन पहिल्यांदा वाचली होती. मग बरेच वेळा वाचली. अत्रे सभागृचामधल्या एका प्रदर्शनात विकत घेतली. बरेच दिवस माझ्या संग्रहात होती. ती वेब सिरीज आली तेव्हा एक मित्र घेउन गेला ती अजून परत दिली नाही. वेबसिरीज तितकीशी आवडली नाही. किंबहूना सगळे भाग पाहिलेच नाहीत. पण कादंबरी मात्र नक्कीच वाचावी अशी आहे, एकदा हातात घेतली की खाली ठेवता येत नाही. पैजारबुवा,

शशिकांत ओक 07/09/2020 - 12:05
याच कथानकाचा रंगमंचीय अवतार होता. सांगायचे असे की ते नाटक नवी दिल्ली येथे साजरे होणार्‍या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या नाट्य स्पर्धेत केले गेले होते. यामधील मुख्य भूमिका, दिग्दर्शन त्यावेळेच्या स्क्वाड्रन लीडर शशिकांत ओक यांनी केले होते. महाराष्ट्र मंडळ जनकपुरी येथून ते स्पर्धेत सहभागी केले गेले होते. पारितोषिक वगैरे मिळाले नाही. पण एक मजेशीर गोष्ट होती त्याची नोंद बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेत केली गेली होती असे मला नंतर एकांकडून कळले तेंव्हा मजा वाटली!

मी कालच हे पुस्तक वाचुन संपवले. याआधी मी सुहास शिरवळकर यांची दुनियादारी, ऑर्डर ऑर्डर, सायलेन्स प्लीज व पडद्याआड ही पुस्तके वाचली आहेत. प्रामुख्याने कोर्ट रूम ड्रामा व रहस्यमयी कथा ह्या लेखनप्रकारात या लेखकाचा चांगलाच हातखंडा होता. ह्या पुस्तकाबद्दल मला mx Player वरच्या "समांतर" नावाच्या सुहास शिरवळकरांच्याच पुस्तकापासुन प्रेरित होउन बनवलेल्या वेब सिरीज मुळे माहिती मिळाली. समांतर म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ! प्रस्तुत कादंबरी मध्ये मांडलेली संकल्पना आजही जवळजवळ ४०-४५ वर्षानंतरही एकदम नवीकोरी व नावीन्यपूर्ण वाटते.

देव आणि माणूस

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

शा वि कु 01/09/2020 - 17:09
वॉटरशिप डाऊन नावाचं कादंबरी आहे, साश्यांची. त्यात साश्यांच्या देवाच्या गोष्टी आहेत. मस्त आहे. अर्थात ही कल्पना.

Rajesh188 01/09/2020 - 19:44
पृथ्वी आणि पृथ्वी वर असलेल्या जीवसृष्टी मध्ये एक प्रकारचं परफेक्ट पना आहे. प्रतेक साजिवाची,वनस्पती ची इथे काही तरी ठराविक भूमिका आहे हे निसर्ग चक्र चालवण्यासाठी. ह्याचेच आश्चर्य माणसाला अनंत वर्षा पासून आहे. किती ही शोध घेतले तरी प्रश्न काही संपत नाहीत. कोणी तरी जुळवून आणल्या सारख्या सर्व घटना इथे घडत असतात. आणि हेच माणसाला संभ्रमात टाकत आहे.

आनन्दा 02/09/2020 - 11:54
बाकी सगळं ठीक आहे.. पण हे सगळे सगुण देव आहेत. अन्य धर्माना सगुण भक्ती मान्य नाही, त्यांचे देव कुठून आले असावेत?

काही तांत्रिक बिघाडामुळे आतापर्यंत ब्लॉगवर टिप्पण्या प्रकाशित होत नव्हत्या. कोणी खूप वेळ देऊन लिहिलेली टिप्पणी नाहीशी होत असे. आता मात्र टिप्पण्या प्रकाशित होऊ लागल्या. वाचकांच्या माहितीसाठी. धन्यवाद. ब्लॉगची बदललेली लिंक: http://sudhirdeore29.blogspot.com/

- डॉ. सुधीर रा. देवरे आधी देव का आधी माणूस? आज आपण जे देव भजतो ते सगळ्याच प्रकारच्या सजीवांचे देव आहेत का? (आहेत असं आपण समजतो. माणसाला बुध्दी आहे. म्हणून तो पूजा, पाठ, विधी, कर्मकांड वगैरे करतो. मुक्या प्राण्यांना बुध्दी नाही, म्हणून ते देवाला भजत नाहीत, असंही आपलं प्रामाणिक मत असू शकतं. ) प्राण्यांसाठी विशिष्ट एखादा देव असेल तर तो कोणता? प्राणी आपल्या देवाची प्रार्थना कशी करतात? पूजा कशी करतात? प्राण्यांच्या देवांची मंदिरं कुठं असतात? समजा प्राण्यांचा देव मूर्त स्वरूपात असला तर त्या देवाची मूर्ती कशी असेल? वाघांचा देव वाघासारखा असावा का?

सांग दर्पणा

ज्येष्ठागौरी ·

छान लेख. Mirror mirror on the wall I will get up after having a fall And whether I run walk or have to crawl I will set my goals and achieve them all.. हा attitude भारिये! हे आपलं असेच.. 1 मला दहा वर्षांपूर्वीचे दिवस आठवतात. मी पहिल्यांदा चेन्नई वरून घरी गेलो तेव्हा आवर्जून मरिना बीच वर खरेदी केली होती. त्यात असा एक आरसा होता. . घरी आलेल्या प्रत्येकाला तो इतका आवडायचा की पुढचे सहा महिने मी दरवेळी घरी येताना 3-4 आरसे आणायचो. हे आरश्या चं दुकान. .

टर्मीनेटर 01/09/2020 - 16:18
वाह! मस्तच लिहिलंय. आरशाशी रोजच संबंध येत असला तरी अशा व्यापक दृष्टीकोनातून त्याच्याकडे कधी बघितले नव्हते. आता विषय आरशाचा आहे म्हणून एक किस्सा लिहिण्याचा मोह टाळता येत नाहीये. काही वर्षांपूर्वी एका कुख्यात गुंडाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक अपक्ष लढवली होती. त्याच्या प्रचार साहित्याच्या डिझाईनींग आणि छपाईचे काम माझ्या मित्राच्या प्रिंटींग प्रेसला मिळाले होते. काही samples दाखवण्यासाठी मी त्या मित्राबरोबर त्या उमेदवाराच्या घरी गेलो होतो तेव्हा भिंतभर आरशा समोर उभा राहून कितीतरी वेळ त्याला भाषणाचा सराव करत असलेला पहिला होता. त्यावेळी तो प्रकार बघून हसू आले होते. प्रयत्न पूर्वक आत्मसात केलेल्या ह्या कलेच्या जीवावर त्याने प्रभागातील सोसायट्यांमध्ये जाऊन प्रभावी भाषणे ठोकली होती. त्या निवडणुकीत तो उमेदवार अपक्ष असूनही बहुमताने विजयी झाला आणि त्याने ह्या विजयात त्याच्या समाजात असलेल्या दहशतीपेक्षा भाषणाची कला शिकवणाऱ्या आरशाचा वाटा मोठा असल्याची कबुली दिली होती. काही काळाने प्रतिस्पर्धी टोळीने त्याची हत्या केल्यावर crime never pays ह्या वचनाची प्रचीतीही आलीच म्हणा!

Bhakti 01/09/2020 - 16:33
सुंदरच! **आरसा पुसताना तो आतला प्रवास असल्यानं सफाईही आतून व्हावी असं अगदी मनातून वाटतंय. आवडलं.. मस्त..

गणेशा 01/09/2020 - 17:27
अतिशय सुंदर लेखन.. फिलॉसॉफीकल विचारांचे प्रतिबिंब प्रत्येक वाक्या वाक्यात जाणवते आहे.. पुन्हा पुन्हा वाचावा असा सुंदर लेख.. खुप आवडला.

वामन देशमुख 02/09/2020 - 09:30
ज्येष्ठागौरी , तुमचं ललित लिखाण आवडलं आणि मग उगीच गालिब आठवला. उम्र भर हम यही गलती करते रहे.. धूल चेहरे पे थी और हम आईना साफ करते रहे..! धूल आईने पे थी और हम चेहरा साफ करते रहे..!

असे वाटले. धन्यवाद. माझ्या आजोळी दरवाजाशी चपलाबुटांचे तीनेक फूट उंचीचे नक्षीदार अलीशान कपाट होते. त्यावर उभ्या ओव्हल आकाराचा नक्षीदार फ्रेमचा आरसा होता. टेबलावरच्या दोन बाजूंनी उभ्या असलेल्या खांबावरील मध्यभागी असलेल्या सपोर्ट पिनाभोवती फिरवून तो आपल्या उंचीशी जुळवून घेता येई. आम्हा दोन अडीच फुटी छोट्यांसाठी उभे राहून आरशात पाहायला स्टूलही होते. हा आरसा अर्थातच हळव्या आठवणींचा कोपरा आहे.

सांग दर्पणा... एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले. शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते.