मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वाङ्मय

अनुवादित पुस्तकं

पाटिल ·
लेखनप्रकार
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.

कुणास सांगू ? (कथा परिचय : ३)

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
विदेशी कथा परिचयमालेतील या आधीचे लेख : १. कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी ! २. एका आईचा सूडाग्नी …………………………………………………. वरील संदर्भ क्र. २ च्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे युरोपीय बिगर इंग्लिश कथाकारांमध्ये फ्रान्सचे मोपासां आणि रशियाचे चेकॉव्ह (Anton Chekhov) हे महान कथाकार होते. त्यांनी एकोणिसाव्या शतकात अनेक उत्तमोत्तम कथा लिहिल्या. त्यांच्यानंतरच्या पिढ्यांमध्ये कथाविश्वात त्यांच्या नावे कथाकारांची ही दोन घराणी निर्माण झाल्याचे मानले जाते.

सुखाचे हे सुख, श्रीहरी मुख - काव्यानुभव

arunjoshi123 ·
काव्यरस
Taxonomy upgrade extras

प्रारंभः

मनुष्य हा सुखाच्या शोधात असतो असं म्हणतात. एखादं सुख कधी लाभतं, कधी लाभत नाही. एखादं सुख लाभल्यानंतर ते सुख वाटत नाही. एखादं वाटलं तरीही ते क्षणभंगुर निघतं. एखाद्या सुखाचं रुपांतर नंतर दुःखात होतं. सुखाच्या अनेक प्रकारांचे आपलेच अनंत रंग आहेत. कधी कधी परिस्थिती इतकी विषण्ण करणारी होते की शेवटी आपण स्वतःवरच हसतो. ते देखील एक वेगळ्याच प्रकारचं सुखच आहे. साधारणपणे आंबा म्हटलं की आपल्याला आनंद होतो आणि तो खावासा वाटतो. परंतु त्याच क्षणी बरेच आंबे नासके असतात, बेचव असतात, उतरलेले असतात, किडे लागलेले असतात, तसंच काहीसं सुखांचं देखील आहे. सुखाचा शोध तसा सामान्यतः सुखकर नसतो.

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

पाषाणभेद ·
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_borase.pdf येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे. सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

आरसा (भाषांतर)

स्मिताके ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही वर्षांपूर्वी मी या कथेवर आधारित एक शशक लिहिली होती. त्याच संपूर्ण कथेचं हे भाषांतर. मूळ कथा : The Mirror by Catulle Mendes *** आरसा त्या देशात मुळी आरसेच नव्हते. किती शोधले, तरी अगदी औषधाला सुद्धा सापडले नसते. राणीची आज्ञाच होती ना, "तोडून टाका ते आरसे. फोडून अगदी बारीक चुरा करून टाका. कोणाच्या घरात एक एवढासा तुकडा जरी सापडला तर याद राखा. घरातल्या सगळ्यांना हाल हाल करून मारून टाकीन." यापुढे कोणाची काय बिशाद, आरसे बाळगायची! कसली ही विचित्र आज्ञा! हं.. त्यामागे एक रहस्य दडलं होतं.. राणी अतिशय कुरूप होती. पाहणाऱ्याचा भीतीने थरकाप होईल, इतकी कुरूप.

अकुपार : ध्रुव भट्ट

अन्या बुद्धे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अकुपार : ध्रुव भट्ट रसग्रहण फळांचं फ्रुटसलाद करतात ही झाली इन्फो. ते स्वतः करणं अनुभवणं हे ज्ञान. टोमॅटो हे देखील फळच आहे हेही अधिक स्पेसिफिक ज्ञान आणि माहिती. पण तरी ते फ्रुटसलाद मध्ये वापरायचं नसतं ही काही न शिकता आजीवगैरे लोकांना *जाण* होती. अमुक प्रकाश असेल की कितीवर अपरेचर ठेवायचं? शटरस्पीड किती? वगैरे शिकवता येतं पण फ्रेम कोणती सिलेक्ट करायची? छायाप्रकाश काय परिणाम करतात? हे शिकवता येत नाही. त्यासाठी जाण लागते. जगाकडे बघायचा एक विशिष्ट नजरिया आपल्या सवयीचा झाला आहे. तो अत्यन्त उपयोगी आहेच.

नाईट मेअर (गूढकथा)

vaibhav deshmukh ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नाईट मेअर (गूढकथा) त्या अरण्यात मी कसा पोहोचलो? हा प्रश्न गौण असला तरी, मी आता प्रचंड जखमी झालोय. अंगावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्यातून सारखे रक्त गळत आहे. आणि मी असाच काही वेळ या अवस्थेत राहिलो तर, मृत्यू मला कधीही गाठेल आणि मी गतप्राण होऊन जाईल, ही वस्तुस्थिती मात्र मला नाकारता येणार नव्हती. मी नुसता धावत आहे. किती वेळ झाला, मला माहित नाही. पण मी सलग धावत आहे. तेही प्रचंड वेगाने. अंगात जेवढे त्राण आहेत, तेवढ्या वेगाने. तो मागचा लांडग्यांचा कळप, मला कधी गाठेल याचा नेम उरला नव्हता. ते मोठ्या धुडाचे दहा- पंधरा लांडगे, कधीही माझा फडशा पाडू शकत होते.

मन आणि मांस

अनुस्वार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात?