मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तंत्र

अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू) -भाग १

सतिश म्हेत्रे ·
टीप 1. या व येणार्‍या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल. 2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल. पार्श्वभूमी(थोडक्यात)

मोबाईलची शेजआरती

पाषाणभेद ·
*मोबाईलची शेजआरती* उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ|| दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश बॅटरी उतरवली दोन वेळा ||१|| घरी लपविले आई बापापासून मला ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ असा टाईमपास किती करावा? ||२|| असतात महत्वाची कामे घरी हापीसात न वापरावे कधी कितीही व्हाटसअप जरी आता मिळे फ्री डेटा ||३|| वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी जरी मी असे चांगला ||४|| काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?

संगणक व आंतरजालाचा वापर करणार्‍या उपकरणांवरच्या डेटाची चोरी : समज-गैरसमज

डॉ सुहास म्हात्रे ·
वैयक्तिक, व्यापारी आणि सरकारी स्तरांवर, संगणक आणि आंतरजालाचा वापर करून माहिती संकलन करणे व ती माहिती फायदेशीररीत्या वापरणे, ही गोष्ट आजकाल रोजच्या जेवणाइतकी सामान्य झाली आहे. अर्थातच, साठवलेला डेटा नष्ट होणार नाही हे पाहणे व त्याचे चोरीपासून संरक्षण करणे हे सर्वसामान्य काळजीचे विषय झाल्यास आश्चर्य ते काय? संगणक वापरून बनवलेल्या, विशेषतः चीनी बनावटीच्या उपकरणांवरच्या, (उदा : मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, सर्वर, इ) डेटाची चोरी हा सद्या सर्वसामान्य जनतेत काळजीने व भितीने चर्चिला जाणारा विषय आहे. या विषयाबाबत, लोकांच्या मनात अनेक समज, गैरसमज आणि भिती आहे.

डिजीटल डिजीटल

शिव कन्या ·
जी माणसे कुठल्याच डिजीटल प्रोफाईल मध्ये नसतात, त्यांचे जगणे कसे असेल, हा प्रश्न मला छळू लागला, आणि मला माझ्या डिजीटल विचारांची भिती वाटू लागली... जी माणसे ऑफलाईन असतात त्यांचे लाईफ कसे असेल या प्रश्नाने मला परेशान केले आणि मला माझ्या डिजीटल चिंतेची काळजी वाटू लागली... मग, या डिजीटल तुरुंगातून सुटका होण्याची वाट पाहताना मी विंडोजमध्ये डोकावून पाहते... तर, खऱ्या जगण्यातून सुटका म्हणून डिजीटल तुरुंगात येणारे लाखो, करोडो लोक समग्र पृथ्वीला वेढा घालून, प्रकाश डोळ्यांवर घेत 24/7 काल डिजीटल दोरीवर चालत असतात... मी ते डिजीटल जगाचे सत्यरूप पाहून हादरून जाते, आणि परत विंडोजमधून आत येऊन माझ्या

आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र २

डॉ सुहास म्हात्रे ·
या विषयावरचा पहिला धागा : आरोग्यशास्त्रातले युद्धशास्त्र *************************************************************************************** मानवी इतिहास युद्धांनी भरलेला आहे. मात्र त्या इतिहासात फक्त मानवांनी मानवांशी केलेल्या युद्धांचाच समावेश असतो. परंतू, मानवाला रोज इतर जीवांबरोबरही लढा द्यावा लागतो... सर्वसाधारणपणे, त्याला युद्ध न म्हणता "रोगाशी सामना" असे म्हटले जाते. पण, तरीही हे युद्धही काही कमी महत्त्वाचे नाही. किंबहुना, व्यक्तिगत स्तरावर ते जीवनमरणाचा प्रसंग असू शकते...

व्यावसायिक यशाला मदत करणारे मोफत आंतरजालशिक्षण

डॉ सुहास म्हात्रे ·
कोणत्याही व्यवसायात आणि नोकरीत यशस्वी होण्यासाठी त्यासंबंधीच्या विषयाचे ज्ञान असायला हवे हे सांगायला नकोच. मात्र, त्या ज्ञानाबरोबरच, आंतरजालाचा उपयोग करण्याचे ज्ञानही असले तर तर यशाचा मार्ग जास्त सुकर होतो, याबद्दलही संभ्रम नसावा. पारंपरिक पद्धतीने शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था आहेतच. पण, संगणकशास्राच्या प्रगतीच्या वेगाच्या तुलनेने त्यांच्यामध्ये असलेले संगणकीय अभ्यासक्रमांत होणारे बदल खूपच कमी वेगाने होतात. त्यामुळे, त्यांच्यातून बाहेर पडणार्‍या पदवी/पदविकाधारकांना बर्‍याचदा, उत्पादक घटक बनण्यासाठी, व्यावहारिक उपयोगासाठी लागणारे संगणकीय शिक्षण स्वतः प्रयत्न करून मिळवावे लागते.

निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी

सुधीर मुतालीक ·
निर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे. निर्लेप ब्रँडची भांडी हा विशेषतः मराठी माणसांसाठी अभिमानाचा विषय आहे. अडुसष्ट सालच्या सुमारास सरकारने स्टेनलेस स्टील आयात करण्यावर निर्बंध आणले त्यामुळे आताचे निर्लेपचे मालक श्री राम भोगले यांच्या वडिलांनी प्लास्टिकचे ( टेफ्लॉन ) कोटिंग असणारी भांडी बाजारात आणली. हा प्रयोग आपल्या देशात पहिलाच आणि अद्भुतच होता ! निर्लेप यंदा आपल्या उद्योगाचा सुवर्णमहोत्सव साजरे करतो आहे.

कवितेचे पान - ऑनलाईन कवितेची मैफिल

पारुबाई ·
कविता हा काही खास रसिकांचा प्रांत. कवितेवर प्रेम करणारे लोक नेहमीच एका सुरेख कल्पनाविश्वात वावरत असतात. वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचणे, ऐकणे, संग्रह करणे, काव्यवाचनाचे कार्यक्रम पाहणे आणि इतर रसिकांना आपल्याला स्वतःला आवडलेल्या कविता ऐकवणे, अश्या नादात ते मश्गुल असतात. या रसिकांची बातच निराळी.आणि एखाद्या प्रसंगी एखादी चपखल कविता किंवा अगदी अचूक अश्या कवितेच्या दोनच ओळी ऐकवणे अश्या गोष्टींमध्ये यांचे आनंद डुलत असतात. ऐकणारा आणि ऐकवणारा जर या धामधुमीत एकाच जातकुळीचा निघाला तर मग होणारा आनंद केवळ अवर्णनीय. मी देखील अशीच एक काव्य रसिक. लग्नापूर्वी २०-25 वर्षांपूर्वी पुण्यात असताना बी. जे.

जीवनात ही घडी अशीच राहू दे

पुष्कर ·
मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.