आरोग्यशास्त्रात सतत नवे शोध लागत असतात आणि त्यामुळे पूर्वी असाध्य समजल्या जाणार्या अनेक व्याधींवर नवनवीन उपाय निघाले आहेत हे आपण सर्वजण जाणतोच. पण हे सर्व कसे होते याबद्दल त्या क्षेत्रातले काही शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ सोडले तर इतर लोक अनभिज्ञ असतात. हे बरेचसे संशोधन रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्ये (अंडर लॅबोरेटरी कंडीशन्स) रुक्ष काटेकोर नियम पाळून केले जाते. मात्र हे सर्व करण्याअगोदर, करताना आणि ते करून मिळालेल्या निष्कर्षांचा अन्वयार्थ लावताना शात्रज्ञ आणि तंत्रज्ञ किती कल्पकता वापरतात याचा इतिहासही मनोरंजक असतो. एका रोगासाठी केलेले संशोधन इतर कुठल्यातरी व्याधीसाठी उपयोगी आहे हे अपघाताने पुढे आले, असे प्रसंगही कमी नाहीत. या संशोधनांमागे शात्रज्ञ अथवा तंत्रज्ञ यांची चाकोरीबाहेर जाऊन स्वतंत्र विचार करण्याची शक्ती (आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग) वापरण्याचे कौशल्य वादातीत असते. त्यातली काही उदाहरणे युद्धशास्त्रातला अथवा हेरशास्त्रातला वस्तुपाठ ठरू शकतील अशी आहेत.
अश्याच एका संशोधनाच्या रूपाने वरील परिस्थिती अधोरेखीत झाली आहे. त्याबद्दल थोडीशी रोचक माहिती.
गरोदर महिलांमध्ये मलेरिया जीवघेणा ठरू शकतो. डेन्मार्कमधील शास्त्रज्ञ हे कसे टाळता येईल यावर संशोधन करत असता त्यांना असे आढळून आले की मलेरियाचे जंतू एक प्रोटीन अणू तयार करतात. हा अणू गरोदर मातेच्या प्लासेंटाच्या (मातेपासून बाळाकडे अन्न व प्राणवायू नेणारा अवयव) पेशींकडे आकर्षित होतो व मलेरियाच्या जंतूंना प्लासेंटाला धोका पोहोचवण्यास मदत करतो.
बाळ आणि मातेमधील अनन्य दुव्याचे काम करणार्या प्लासेंटाच्या पेशींची वाढ फार वेगाने होते. केवळ काही महिन्यांच्या थोड्याश्या अवधीत, केवळ थोड्याश्या पेशींपासून सुरुवात करून, हा अवयव जवळ जवळ एक किलो वजनाचा होतो. ही वाढ होण्यास पेशींच्या आवरणातील एक कार्बोहायड्रेट अणू मदत करतो. मलेरियाच्या जंतूतील प्रोटीनचा अणू याच कार्बोहायड्रेट अणूंकडे आकर्षित होऊन प्लासेंटाच्या पेशींना चिकटतो.
ट्यूमर (कॅन्सर व इतर प्रकारच्या अनियंत्रित वाढी) या व्याधीमध्येही पेशींची वाढ फार मोठ्या वेगाने होते. प्लासेंटामध्ये होणारी पेशींची वाढ नियंत्रित व उपयोगी असते तर ट्यूमर या व्याधीत पेशींची वाढ अनियंत्रित व धोकादायक असते. मात्र दोन्हीमध्ये पेशींची वाढ होण्यास तोच एक कार्बोहायड्रेट अणू कारणीभूत असतो.
संपूर्णपणे वेगळ्या व्याधींसाठी (गरोदरपणातील मलेरिया व कॅन्सर) चाललेल्या संशोधनांतील हे साम्य कल्पक शास्त्रज्ञांनी हेरले. त्यांनी मलेरियाच्या जंतूचा प्रोटीन अणू घेतला व त्याचा पेशींचा नाश करू शकेल अश्या विषाच्या अणूशी संयोग केला. हा नवीन अणू वेगाने वाढणार्या ट्यूमरच्या पेशीवरील कार्बोहायड्रेट अणूकडे आकर्षित होऊन पेशीला चिकटतो व तिच्यात प्रवेश करतो. पेशीमध्ये विषाचा अणू वेगळा होऊन पेशीचा नाश करतो.
थोडक्यात, या संशोधनात, एका शत्रूकडून (मलेरिया) तंत्रज्ञान घेऊन शास्त्रज्ञांनी ते दुसर्या शत्रूविरुद्ध (कॅन्सर) वापरले आहे !
सद्या हे तंत्रज्ञान उंदरांमध्ये यशस्वीरीत्या वापरले गेले आहे. मानवात वापरण्यासाठी त्याला अजून बरेच गुंतागुंतीचे शास्त्रीय सोपस्कार पार पाडावे लागतील. मात्र, यशस्वी झाल्यास ते कॅन्सरच्या उपचारात एक क्रांतिकारक मैलाचा दगड ठरेल.
वाचने
17067
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम माहिती!
+१
In reply to उत्तम माहिती! by विद्यार्थी
+++११ १
In reply to उत्तम माहिती! by विद्यार्थी
+११११११
In reply to +++११ १ by अत्रुप्त आत्मा
+११११
In reply to उत्तम माहिती! by विद्यार्थी
सुरेख माहिती. जरा विस्तार हवा
और भी आने दो
छान लेख. याविषयी अधिक वाचायला
व्यायाम न करता कोलेस्ट्रॉल
सापडल्यास दुवा द्यावा , दुवा
In reply to व्यायाम न करता कोलेस्ट्रॉल by मोदक
हा हा हा.. हे तर आमच्या देशात
छान ........
शॉर्ट स्वीट किलर!! कसलं
रॅपिड रिजनरेशनचं माहिती नाही
In reply to शॉर्ट स्वीट किलर!! कसलं by कैलासवासी सोन्याबापु
माहिती आवडली. बर्याच
अरे वा, हे भलतंच इंट्रेस्टिंग प्रकरण
फुल्टु बाउंन्सर गेला.
कोलेस्टेरॉलबद्दल वरतीही प्रश्न विचारला आहे.
In reply to फुल्टु बाउंन्सर गेला. by कॅप्टन जॅक स्पॅरो
माहितीपूर्ण लेख
माहितीपुर्ण लेख....
शरीरशास्त्र खरंच अतिशय
छान माहीती
छान माहिती... और भी आने दो. :
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- नगाड़ा संग ढोल बाजे ढोल बाजे... :- Goliyon Ki Raasleela Ram-leelaसोप्या भाषेतली माहिती आवडली.
छान माहिती
महत्वपूर्ण माहिती
मस्त लेख एक्काकाका!
उत्तम लेख. कठीण वैद्यकीय
अरे वा! या जगातही असली खणाखणी
अज्जुन ल्हिहा की....अश्या
एक्का साहेब
बीबीसी वर
काल का परवाच ह्या संबंधीची
माहितीपुर्ण लेख
सर्व वाचकांना आणि
रोचक माहिती. धन्यवाद.
In reply to सर्व वाचकांना आणि by डॉ सुहास म्हात्रे
आशादायक माहिती.
रोचक माहिती
आवडला
खूप छान माहिती
तांत्रिक