"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? "
"काय म्हणतेस सुले ?"
"होय रे माझ्या राजा "
-- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते.
-- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो.
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो....
कुठलेतरी कविराज कवत असतात --
"अशाच एका धुंद सकाळी -
मनात माझ्या स्फुरती ओळी -
जरतारी तो शालू आणिक -
धुंद मखमली नाजुक चोळी "
-- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ...
'तंग' वरून मला आठवतं,
"तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं -
आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही.
त्यावरून आणखी आठवतं की-
" ये चोली मेरी तंग होने लगी" हे तर फार म्हणजे फार दिवसातच बघितलेलं नाही.
ते हुडकायला जातो तर दुसरंच काहीतरी उघडतं --
हात उंच करून प्राजक्ता माळी किंचाळत असते -
"आणि कांजूर मार्ग - ईस्ट चा 'अक्षय कुमार' - बंडू बिल्लोरे... स्वागत करूया ...
टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात -
मोबाईलचा चार्ज संपून तो निष्प्राण होतो...
पिच्चरांमधल्या हिरो सारखं "ओ शिट" म्हणावं की आपलं साधं "धत्तेरी" म्हणावं-
हे ठरण्याच्या आतच कडकडाट कानावर पडतो -
"अहो किती वेळ बसणाराय अजून, मोबाईल घेऊन गेला असणार.
निघा लवकर, मला जोरात लागलीय "...
मी पटकन आटोपतं घेत -
"नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असं म्हणत बाहेर पडतो.
खरंतर मला यानंतर "तुम ने पुकारा और, हम चले आए " वगैरे पण म्हणायचं असतं,
पण तेवढ्यात ती आवेगाने धावत येऊन आत शिरते...
मग धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले टाकत मी परत पलंगाकडे वळतो...
तेवढ्यात -
"आता परत झोपू नका, चहा ठेवा" असा कडकडाट होतो.
- मग मी पुन्हा त्याच धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले वगैरे टाकत -
- किचनात जाऊन चहा ठेवतो.
अशी ही आमची एक धुंद गुलाबी सकाळ.
- आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेयर करा, कमेंट करा, आणि बेल-बटन दाबायला विसरू नका.
(--- च्यामारी हे यूट्यूबचं व्यसन आता सोडायलाच पायजेल. सबस्क्राईब करा म्हणे )
वाचने
7241
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
धत्तेरी लवकरच संपलं.
@कंजूसः ह्यो काय भालगड हाय ?
In reply to धत्तेरी लवकरच संपलं. by कंजूस
जबरदस्त, अगदी असेच होते.
@ सौंदाळा : आपणासरिखे आणिक असती ...
In reply to जबरदस्त, अगदी असेच होते. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
घरोघरी मातीच्याच चुली.
कविता नेमकी
In reply to घरोघरी मातीच्याच चुली. by कर्नलतपस्वी
कंजूस भौ...
In reply to कविता नेमकी by कंजूस
कर्नल दीवाने है मैफिल का मजा लेते है 'सुखसारक' कविता आवडली.
In reply to घरोघरी मातीच्याच चुली. by कर्नलतपस्वी
हाहाहा!!
चुभूदेघे
भारी :=)
मस्तच :)
धुंद , गुलाबी सकाळ
खिक् !
=)) भन्नाट एकदम
मस्त
मस्त!
मस्त, खुसखुशीत!
*सकाळी
In reply to मस्त, खुसखुशीत! by चौथा कोनाडा
हेहे.. मस्त खुसखुशीत
जबराव जबराव जबराव