मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अशीच एक धुंद, गुलाबी सकाळ

चित्रगुप्त · · जनातलं, मनातलं
"ए, परीक्षेनंतर आपण लग्न करूयात ? " "काय म्हणतेस सुले ?" "होय रे माझ्या राजा " -- असं म्हणत ती आवेगाने धावत येऊन त्याला बिलगते. -- मंचावरचे लाईट फेड होऊन पडदा पडतो. टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - 'आटो-प्ले' मोडमुळे पुढला व्हिडियो सुरु होतो.... कुठलेतरी कविराज कवत असतात -- "अशाच एका धुंद सकाळी - मनात माझ्या स्फुरती ओळी - जरतारी तो शालू आणिक - धुंद मखमली नाजुक चोळी " -- तिच्यामारी हे कवी पण फालतूमधे तंग करत असतात ... 'तंग' वरून मला आठवतं, "तंग आ चुके हे कश्म-कशे जिंदगी से हम" हे गाणं - आपण बरेच दिवसात बघितलेलं नाही. त्यावरून आणखी आठवतं की- " ये चोली मेरी तंग होने लगी" हे तर फार म्हणजे फार दिवसातच बघितलेलं नाही. ते हुडकायला जातो तर दुसरंच काहीतरी उघडतं -- हात उंच करून प्राजक्ता माळी किंचाळत असते - "आणि कांजूर मार्ग - ईस्ट चा 'अक्षय कुमार' - बंडू बिल्लोरे... स्वागत करूया ... टाळ्यांचा कडकडाट विरतो न विरतो तेवढ्यात - मोबाईलचा चार्ज संपून तो निष्प्राण होतो... पिच्चरांमधल्या हिरो सारखं "ओ शिट" म्हणावं की आपलं साधं "धत्तेरी" म्हणावं- हे ठरण्याच्या आतच कडकडाट कानावर पडतो - "अहो किती वेळ बसणाराय अजून, मोबाईल घेऊन गेला असणार. निघा लवकर, मला जोरात लागलीय "... मी पटकन आटोपतं घेत - "नच सुंदरी करू कोपा, मजवरी धरी अनुकंपा" असं म्हणत बाहेर पडतो. खरंतर मला यानंतर "तुम ने पुकारा और, हम चले आए " वगैरे पण म्हणायचं असतं, पण तेवढ्यात ती आवेगाने धावत येऊन आत शिरते... मग धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले टाकत मी परत पलंगाकडे वळतो... तेवढ्यात - "आता परत झोपू नका, चहा ठेवा" असा कडकडाट होतो. - मग मी पुन्हा त्याच धीरोदात्त नायकाप्रमाणे मंद मंद पावले वगैरे टाकत - - किचनात जाऊन चहा ठेवतो. अशी ही आमची एक धुंद गुलाबी सकाळ. - आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेयर करा, कमेंट करा, आणि बेल-बटन दाबायला विसरू नका. (--- च्यामारी हे यूट्यूबचं व्यसन आता सोडायलाच पायजेल. सबस्क्राईब करा म्हणे )

वाचने 7220 वाचनखूण प्रतिक्रिया 21

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/01/2023 - 22:08
@कंजूसः सिल्वर - गोल्ड - प्लाटिनम - ह्यो काय भालगड हाय, मज निरोपावे. लाईक सबस्क्राईब वगैरे केलेत ह्ये ब्येस.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चित्रगुप्त 20/01/2023 - 22:13
@ सौंदाळा : आपणासरिखे आणिक असती, मग कशाला मनात भीति ? तुमच्या प्रतिसादाने आश्वस्त झालो.

घरोघरी मातीच्याच चुली. केव्हातरी पहाटे उलटून रात गेली शारंगधर वटी ने अवचित जाग आली मिटले चुकून डोळे, बसता सुखासनी मी तेवढ्यात हाक कानी आली आटोपले का सर्व तुमचे? व्हा बाहेर झडकरी अन् ठेवा आधण चहाचे ऐकता हुकूम रणरागीणीचा कळले मला न केंव्हा उघडली चिटकणी दाराची उरले पोटात काही, आवाज Xदण्याचे तरी मला ढकलून ती आत गेली

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 19/01/2023 - 22:19
लागू. मिपाच्या पूर्वीच्या 'तांबे' कवींना मागे टाकणार बहुतेक. तांबे कवींनी बऱ्याच काळाने खरडफळ्यावर जळजळ व्यक्त केली गद्यात. असो. चालायचेच.

In reply to by कंजूस

काय बी समजलं नाय. उलगडून सांगता का? दैनंदिन कार्यक्रम म्हणून चार ओळी सुचल्या त्या खरडल्या. @राजेंद्र भौ,पहिल्यांदाच विमानात बसलो तेंव्हा टेन्शन आले होते. उंचावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणे..... बाकी अजुन तरी सब ठिक है...

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 21/01/2023 - 13:34
@कर्नल साहेबः व्वा. मजा आली. 'सुखसारक' कविता आवडली. कर्नल दीवाने है मैफिल का मजा लेते है ... शारंगधर लेके प्रतिसाद दिया करते है ... सुबा सुबा एक 'वटी' लेते है, बंद ताला भी हो तो खुल जाता है ... .

टर्मीनेटर 21/01/2023 - 13:49
मस्त! काही वर्षांपूर्वी कॅन्डी क्रश खेळण्याचा प्रचंड नाद लागला होता तेव्हा असा प्रकार माझ्याबाबतीत घडायचा. खरंतर कार्यभाग साधण्यास दोन मिनिटेच पुरेशी असली तरी सर्व लाईफस संपेपर्यंत 'आत'च बसून राहायचो 😀