Skip to main content

सेन्टी - मेन्टी : वो शाम कुछ ...........

लेखक सुहास.. यांनी शनिवार, 07/12/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्‍या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ?

और नही बस और नही…

लेखक Atul Thakur यांनी बुधवार, 04/12/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
Mahendra Kapoor काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.

अरे रे, मन्ना दा गेले!

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 24/10/2013 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
वाईट वार्ता बहुधा खरी ठरते, आताच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायक मन्ना डे यांचं बेंगलुरु येथे दीर्घ आ़जाराने निधन झाल्याचं वाचलं, खूप वाईट वाटलं. Manna Dey त्याना श्रद्धांजली म्हणून काही गाणी खाली देतोय, वेळ मिळेल तशी भर रसिक घालतीलच.

राजीव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

लेखक एच्टूओ यांनी सोमवार, 30/09/2013 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सिनेदिग्दर्शक राजीव पाटील यांचे आज, सोमवारी मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन !!! अतिशय धक्कादायक बातमी!! एका वेगळ्या वाटेवरच्या कलाकाराच्या जाण्यामुळे होणारे नुकसान भरुन निघण्यासारखे नाही. असा कलाकार पुन्हा होणे नाही. भावपूर्ण श्रद्धांजली!!

हुस्ना..

लेखक शिवोऽहम् यांनी सोमवार, 26/08/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात कोण जायला बसलंय? जायलाच कशाला पाहिजे, तुमचा-आमचा, प्रत्येकाचा सेप्रेट, पाकिस्तान तुमच्या-आमच्या मनात आहे. तो कधी नव्हता? केन-एबलच्या मनात होताच की! महाभारतातल्या भाऊबंदकीत तो आहेच, मध्ययुगातल्या बेबंदशाहीत बेलगाम उधळला तो. हातपाय ऐसपैस पसरले त्याने. लांब का जा? आजही जनतेचे सेवक निढळाचा घाम गाळून पेरत असतातच की एकेका पाकिस्तानाची बीजं गल्ली-मोहल्ल्यात! तुमच्या-आमच्या फक्त मनातच असतो असं नाही पण मनातही असतो. आणि बाहेरही. मनातला असतो जरासा धूसर, पाचोळ्यानं झाकलेल्या विस्तवातुन येणार्‍या धुराच्या वळशांसारखा. आणि तोच जन्म देतो बाहेरच्याला. ते महत्त्वाचे.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

भिन्न षड्जच्या निमित्ताने..

लेखक शिवोऽहम् यांनी शनिवार, 17/08/2013 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
ताई देवल क्लबात शिकायला जायची तेव्हा हे नाव पहिल्यांदा ऐकले: किशोरी आमोणकर. ताईचा आवाज तेव्हा थोडा नाजुक होता, पेटीच्या आवाजातुन बाहेर येत नसे. तेव्हा गुलाबबाई म्हणायच्या अगं जरा उंच स्वर लाव की! किशोरीताईंचे ऐक जरा. त्यावेळी कॅसेट-प्लेअर वगैरे नव्हता घरी (आणि जेव्हा आला तेव्हा पहिले काही महिने सुगम संगीत, किशोर, लताबाई, गीतरामायण यांच्या कॅसेट्स ऐकण्यात गेली. त्याविषयी पुन्हा कधीतरी). शास्त्रीय ऐकणे हा प्रकार सोपा झाला नव्हता.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

केसरिया बालम...

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/05/2013 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
केसरिया बालमा आओनी पधारो म्हारे देस.. हे राजस्थानी लोकगीत अनेक कलाकार, अनेक शब्द वापरून गातात. काही चित्रपटातूनही हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं.. केसरिया.. ज्याची कांती केशरी रंगाची. केशरासारखी आहे असा.. शिवाय केशरी रंग हे शुद्धतेचं आणि शौर्याचं प्रतिक.. ज्याची कांती केशरी रंगाची आहे, ज्याचं मन केशरासारखं शुद्ध आहे आणि ज्याच्या ठायी शौर्य आहे असा केसरिया बालमा... किंवा केसरिया बालम. देशांतराला, लढाईला गेलेल्या मांगनियार राजस्थान्याची प्रेयसी/पत्नी त्याला बोलवत आहे..

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?