सांग सांग भोलानाथ.. :)
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ
पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून
सुट्टी मिळेल काय?
परवाच कुठेतरी हे गाणं ऐकलं आणि मी एकदम १९७६/७७ सालात पोहोचलो. असेन काहीतरी तिसरी किंवा चवथीत..
तसे आम्ही पयल्यापासनंच आळशी.. निसर्गत:च शाळा-अभ्यासाचा जो कंटाळा येतो तसा तो मलाही यायचा.. नुसती मजा करावी.. आईकडून फक्त छान छान लाड करून घ्यावेत, यथेच्छ खेळा-बागडावं, खाऊ खावा असंच आम्हालाही वाटायचं. म्हणजे एका अर्थी एका नॉर्मल मुलाची जी लक्षणं असतात तीच सगळी माझ्यात होती. मग ही शाळेची भानगड कशाला पायजेल?!..
मिसळपाव
मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा
खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय
कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव