आज माझ्या मनाने, मला आग्रह करकरून, तोच मुलायम शालू नेसायला सांगितला होता. मोतीया रंगाचा आणि सुंदर लालचुटूक फाटलेल्या किनारीचा, तोच जुना शालू. तशी मी पहिल्यापासून हौशी, प्रत्येक गोष्ट कशी, सुंदर, नीटनेटकी आणि पद्धतशीर व्हायला पाहिजे, हा माझा कायमचा आग्रह. आजही माझ्या वयाला साजेसाच रंग होता आणि माहेरचा खानदानी बाज होता, काठ स्वतःच्या हाताने फाडला होता त्याचा मी. भावाची जखम बांधायला, मागेपुढे का पाहावे ?? म्हणूनच……फाटका, तरी अत्यंत प्रिय मला आणि माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेला शालू ……
.......
.....
....
दार उघडलं आणि तो तीरासारखा आत घुसला, पायावर डोकं टेकवून केलेल्या दंडवताने माझी तंद्री भंगली.
त्याने निरोप दिला, 'आपल्याला तातडीने राजदरबारात बोलावले आहे, द्रौपादिदेवीजी ! '
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4793
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय कनेक्शन!
आवडली नेहमीप्रमाणे !!
कल्पना म्हणून छान आहे पण
हो ना!
In reply to कल्पना म्हणून छान आहे पण by दमामि
रजस्वला होती म्हणूनच,
In reply to कल्पना म्हणून छान आहे पण by दमामि
ओढून ताणून केलेले वाटते.
In reply to रजस्वला होती म्हणूनच, by पगला गजोधर
बरोबर आहे मग…
In reply to ओढून ताणून केलेले वाटते. by दमामि
छोटी दुरुस्ती सुचवतो..
हम… "राजदरबारात" जास्त प्रभावी वाटते. धन्स !
In reply to छोटी दुरुस्ती सुचवतो.. by तुषार काळभोर
गजोधरभैय्या नुसते सुटलेयंत. :
नोटेड …
In reply to गजोधरभैय्या नुसते सुटलेयंत. : by एस
भाअरी
काठ स्वतःच्या हाताने फाडला
क्रमशः राहिलां काय ?
म्म्म्म्म्म्म्म बरं . कथा
अप्रतिम कल्पना....
मॉगाम्बो (मी) खुश हुआ :)
In reply to अप्रतिम कल्पना.... by पद्मावति
द्रौपादिदेवीजी !.....?
ये (मराठी लिखनेवाले) हाथ मुझे दे दे ठाकूर
In reply to द्रौपादिदेवीजी !.....? by अनिता ठाकूर
असं वाचून वाचून येईलच मराठी
चुकुन तोच जुना भालू असे वाचले
कल्पना छान आहे.